“देवाच्या राज्यात भेटू”
“देवाच्या राज्यात भेटू”
“प्रिय रुपर्ट, आज मला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणि घरातील सर्वांना माझं प्रेम. आपण देवाच्या राज्यात भेटू.”
जून ८, १९४२ रोजी, फ्रान्ट्स ड्रोझ्ग याने, नात्सी सैनिकांनी त्याला गोळ्या घालण्याआधी हे लिहिले. पण त्याला ठार का मारण्यात आले?
स्लोव्हेनियामधील मारीबोर येथील म्युझियम ऑफ नॅशनल लिबरेशन येथे असलेल्या अहवालांनुसार, या ३८ वर्षीय लोहाराने, जर्मनांनी कब्जा केलेल्या स्लोव्हेनियातील एका जर्मन निमलष्करी तुकडीत अर्थात व्हेरमॅनशॉफ्ट यांत सामील होण्यास नकार दिला होता. तो एक बिबेलफोरशर अर्थात बायबल विद्यार्थी होता. यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी या नावाने या भागात ओळखले जात असे. यशया २:४ च्या एकमतात कार्य करण्याकरता त्याने नात्सी युद्धाला पाठिंबा देण्यास नकार दिला व तो स्वतःला देवाच्या राज्याच्या प्रजेचा एक भाग समजत होता.—मत्तय ६:३३.
प्टूये या त्याच्या गावी, फ्रान्ट्स देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करणारा म्हणून त्याला ओळखले जात होते. (मत्तय २४:१४) अनेक संकटांवर मात करत १९४२ सालच्या मे महिन्यात अटक होईपर्यंत तो प्रचार कार्य करीत होता.
नात्सींनी अनेक स्लोव्हेनियन यहोवाच्या साक्षीदारांचा कठोरपणे छळ केला. धार्मिक विश्वासांबद्दल मृत्यूदंड मिळालेल्यांपैकी फ्रान्ट्स हा पहिला होता. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणे त्याला: “आपणाला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते” या वचनातून बळकटी मिळाली होती. (प्रेषितांची कृत्ये १४:२२) “देवाच्या राज्यात भेटू” या त्याच्या शेवटल्या शब्दांवरून हे स्पष्ट होते, की स्वर्गीय सरकार हे खरोखर येणार आहे असा त्याला भक्कम विश्वास होता.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
फ्रान्ट्स ड्रोझ्ग: Photo Archive-Museum of National Liberation Maribor, Slovenia; पत्र: Original kept in Museum of National Liberation Maribor, Slovenia