येशू तारण करतो—कसे?
येशू तारण करतो—कसे?
“येशू तारण करतो!” “येशू आपला तारणकर्ता आहे!” संपूर्ण जगभरात अशाप्रकारचे संदेश आपल्याला इमारतींच्या भिंतींवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले आढळतात. येशू आपला तारणकर्ता आहे असा कोट्यवधी लोकांचा मनापासून विश्वास आहे. तुम्ही जर त्यांना विचारले, की “येशू आपले तारण कसे करतो?” तर ते कदाचित तुम्हाला असे उत्तर देतील, की “येशूने आपल्यासाठी त्याचे जीवन अर्पण केले,” किंवा “येशू आपल्या पापांसाठी मरण पावला.” होय, येशूच्या मृत्यूमुळेच आपले तारण शक्य होते. पण केवळ एका मनुष्याचा मृत्यू असंख्य लोकांच्या पापांची किंमत कशी काय भरून काढू शकतो? तुम्हाला कोणी विचारले, की “येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला तारण कसे मिळते?” तर तुम्ही काय उत्तर द्याल?
बायबल या प्रश्नाचे अगदी सरळ परंतु स्पष्ट व अर्थभरीत उत्तर देते. परंतु, या उत्तराचे महत्त्व समजून घेण्याआधी आपण पहिल्यांदा हे समजून घेतले पाहिजे की येशूचे जीवन आणि मृत्यू अतिशय कठीण समस्येवरील एक तोडगा होता. तरच आपल्याला येशूच्या मृत्यूचे मोल योग्यरीतीने समजू शकेल.
येशूला त्याचे जीवन अर्पण करायला सांगून देव एक अत्यंत महत्त्वपूर्ण समस्या सोडवत होता जिची सुरवात आदामाने पाप करण्याद्वारे केली होती. हे पाप मानवजातीसाठी किती घातक ठरले होते! पहिला पुरुष आदाम व त्याची पत्नी हव्वा परिपूर्ण होते. सुंदर व रमणीय एदेन बाग त्यांचे घर होते. बागरूपी घराची काळजी घेण्याचे अर्थपूर्ण काम देवाने या पहिल्या जोडप्याला दिले होते. पृथ्वीवरील इतर सर्व प्राण्यांवर या जोडप्याला प्रेमळपणे देखरेख करायची होती. या जोडप्याची संतती जसजशी उत्पत्ति १:२८) त्यांचे हे काम किती आनंदविणारे व मनोरंजक होते! याशिवाय, त्यांना एकमेकांचा प्रेमळ सहवास देखील लाभला होता. (उत्पत्ति २:१८) त्यांना कसलीच कमी नव्हती. त्यांच्यापुढे आनंदी चिरकालिक जीवन लुटायची संधी होती.
वाढणार होती तसतशा त्यांना त्यांच्या बागरूपी घराच्या सीमा देखील वाढवायच्या होत्या; म्हणजे संपूर्ण पृथ्वीला परादीस बनवायचे होते. (अशा परिपूर्ण स्थितीत असताना देखील आदामाने व हव्वेने पाप केलेच कसे याची कल्पना करणे कठीण आहे. या पहिल्या मानवी दांपत्याने, ज्याने त्यांना निर्माण केले होते, खुद्द त्याच्या विरुद्धच अर्थात यहोवाविरुद्ध बंड केले. आत्मिक व्यक्ती असलेल्या दियाबल सैतानाने एका सर्पाचा उपयोग करून हव्वेला फसवले आणि तिला यहोवा देवाची आज्ञा मोडायला लावले; त्यानंतर तिच्या पतीने, आदामानेही देवाची आज्ञा मोडली.—उत्पत्ति ३:१-६.
आता, आदाम आणि हव्वेला निर्माणकर्ता काय करेल याबाबत कसलाही प्रश्न नव्हता. कारण, आज्ञा मोडल्याचा काय परिणाम होईल हे त्याने आधीच सांगितले होते. तो म्हणाला होता: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) परंतु, आणखी एका अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळायचे होते.
मानवजातीसमोर कठीण समस्या
पहिल्या पापामुळे मानवजातीसमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली. आदामाने तर परिपूर्ण मानव म्हणून त्याच्या जीवनाचा आरंभ केला होता. त्याची मुले देखील सार्वकालिक जीवन उपभोगणार होती. परंतु, आदामाने मुलांचा जन्म होण्याआधीच पाप केले होते. “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील” ही दंडाज्ञा त्याला सुनावण्यात आली तेव्हा संपूर्ण मानववंश अद्याप त्याच्या पोटी निपजणार होता. (उत्पत्ति ३:१९) त्यामुळे आदामाने पाप केल्यावर, देवाने म्हटल्याप्रमाणे तो मरणाच्या पंथाला लागला; आणि त्याच्यामुळे संपूर्ण मानवजातीला मृत्यूदंड मिळाला.
प्रेषित पौलाने नंतर याविषयी अगदी उचितपणे असे लिहिले: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) या मूळ पापामुळे, परिपूर्ण असे जन्मणाऱ्या व अनंत जीवन जगण्याची संधी असलेल्या मुलांवर आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू ओढवला.
“पण, हा तर अन्याय आहे” असे काहीजण म्हणतील. “आम्ही देवाची आज्ञा मोडली का? आदामाने मोडली. मग आम्ही सार्वकालिक जीवनाची व आनंद उपभोगण्याची संधी का म्हणून गमवावी?” आपल्याला माहीत आहे की जर एखाद्या कोर्टाने, वडिलांनी कार चोरली म्हणून मुलाला तुरुंगात टाकले तर मुलगा उचितपणे अशी तक्रार करू शकतो, की “हा कसला न्याय? मी काही चूक केलेली नसताना मला का शिक्षा मिळतेय?”—अनुवाद २४:१६.
पहिल्या पुरुषाला व स्त्रीला पाप करण्यास प्रवृत्त करून आपण देवाला पेचात पाडू शकतो असा सैतानाने कदाचित विचार केला असेल. मानववंशाची सुरवात होण्याआधीच त्याने मानववंशाच्या जनकांवर हल्ला केला. आदामाने पाप केले तेव्हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे, आदाम आणि हव्वा यांना होणाऱ्या मुलांचे यहोवा काय करील?
यहोवा देवाने जे न्याय्य तेच केले. “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको,” असे धार्मिक मनुष्य अलीहूने म्हटले. (ईयोब ३४:१०) संदेष्टा मोशे याने यहोवाविषयी म्हटले की: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) आदामाच्या पापामुळे निर्माण झालेल्या समस्येवर खऱ्या देवाने पुरवलेल्या तोडग्यामुळे पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंत काळ जगण्याची आपली संधी आपण गमावत नाही.
देवाने पुरवलेला परिपूर्ण तोडगा
उत्पत्ति ३:१५) यहोवाने, आपल्या स्वर्गीय आत्मिक पुत्राने पृथ्वीवर येऊन परिपूर्ण मनुष्य येशू म्हणून जगावे आणि मग त्या निष्पाप अवस्थेत मरावे—त्याची टाच फोडली जावी—हा आपला उद्देश असल्याचे बायबलच्या या पहिल्या भविष्यवाणीत स्पष्ट केले.
दियाबल सैतानाला यहोवाने ठोठावलेल्या न्यायदंडातच या तोडग्याविषयी देखील सांगितले होते. यहोवा सैतानाला म्हणाला: “तू व स्त्री [देवाची स्वर्गीय संघटना], तुझी संतति [सैतानाच्या ताब्यात असलेले जग] व तिची संतति [येशू ख्रिस्त] यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे [सैतानाचे] डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील [येशूचा मृत्यू].” (पण एका परिपूर्ण मनुष्याने मरावे असे देवाला का वाटत होते? आदामाने पाप केल्यास त्याला कोणती शिक्षा मिळेल असे यहोवा देवाने त्याला सांगितले? त्याला मृत्यूदंड मिळेल असे यहोवाने सांगितले नव्हते का? (उत्पत्ति २:१६, १७) प्रेषित पौलाने लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) आदामाने स्वतःच्या मृत्यूनेच स्वतःच्या पापाची किंमती भरली. त्याला जीवन देण्यात आले होते पण त्याने पाप करण्याचे निवडले आणि त्याच्या पापाची शिक्षा म्हणून तो मरण पावला. (उत्पत्ति ३:१९) मग, या पापामुळे संपूर्ण मानवजातीवर मृत्यू ओढावला त्याबाबतीत काय? त्यांच्या पापांची भरपाई करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मरावे लागणार होते. पण कोणाच्या मृत्यूने संपूर्ण मानवजातीच्या पापांची भरपाई होणार होती?
प्राचीन इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या नियमशास्त्रानुसार “जिवाबद्दल जीव [प्राणाबद्दल प्राण]” देण्याची आवश्यकता होती. (निर्गम २१:२३) या कायद्यावर आधारित असलेल्या तत्त्वानुसार, मानवजातीच्या पापांची भरपाई करणाऱ्या मृत्यूचे मोल हे आदामाने गमावलेल्या जीवनाच्या तुल्य असावयास हवे होते. तेव्हा, एका परिपूर्ण मनुष्याचा मृत्यूच पापाची किंमत चुकवू शकत होता. येशू तो मनुष्य होता. होय, आदामाच्या वंशाचे तारण करण्याकरता येशू “समांतर मूल्याची खंडणी” देणार होता.—१ तीमथ्य २:६, NW; रोमकर ५:१६, १७.
येशूचा मृत्यू बहुमोल आहे
आदामाच्या मृत्यूला कसलीही किंमत नव्हती; पापामुळे त्याच्यावर मृत्यू ओढावला हे योग्यच होते. परंतु, येशूचा मृत्यू बहुमोल होता; कारण पाप न करता तो मरण पावला. पापी आदामाच्या आज्ञाधारक संततीसाठी खंडणी म्हणून यहोवा देवाने येशूच्या परिपूर्ण जीवनाचे मोल स्वीकारले. येशूच्या बलिदानाचे मूल्य आपल्या फक्त गतकाळातील पापांसाठी लागू होत नाही. तसे असते तर आपल्यासमोर कसलीच आशा नसती. कारण, आपल्या सर्वांचा पापातच जन्म झाल्यामुळे आपण अनेक वेळा पाप करतो. (स्तोत्र ५१:५) यहोवाने सर्वात आधी आदाम आणि हव्वेच्या मुलांसाठी परिपूर्णतेची योजना केली होती; येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला पुन्हा एकदा या योजनेचा फायदा होण्याची संधी मिळत आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!
आदामाची तुलना आपण एका अशा बापाबरोबर करू शकतो जो पुष्कळ कर्ज काढून मरून जातो खरा परंतु त्याने काढलेल्या कर्जाच्या भोवऱ्यातून वर येणे त्याच्या कुटुंबाला मुळीच शक्य होत नाही. आदामानेही आपल्याला पापाच्या कर्जात असे बुडवले आहे, की आपण स्वतःहून बाहेर येऊच शकत नाही. परंतु, येशू एका प्रेमळ पित्याप्रमाणे आहे जो आपल्यासाठी मरण पावला आणि ज्याने आदामाने लादलेल्या कर्जाच्या ओझ्यातून आपली मुक्ती केली शिवाय चिरकाल जगण्यासाठी आपल्याकरता समृद्ध वारसा दिला. येशूचा मृत्यू, आपली गत पातके केवळ रद्द करत नाही तर भवितव्यासाठी आपल्याकरता योजना देखील करतो.
येशू आपला तारणकर्ता आहे कारण तो आपल्यासाठी मरण पावला. त्याचा मृत्यू म्हणजे किती बहुमोल योजना आहे! येशूचा मृत्यू हा, आदामाच्या पापामुळे निर्माण झालेल्या क्लिष्ट समस्येवर यहोवाने पुरवलेल्या तोडग्याचा एक भाग आहे असा दृष्टिकोन आपण बाळगतो तेव्हा, यहोवा आणि त्याची कार्य करण्याची पद्धत यांवर आपला विश्वास आणखी भक्कम होतो. होय, ‘जो कोणी [येशूवर] विश्वास ठेवतो’ त्याला पाप, आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांतून येशूचा मृत्यू मुक्त करतो. (योहान ३:१६) आपल्या तारणासाठी देवाने केलेल्या या प्रेमळ तरतुदीबद्दल तुम्ही त्याचे आभारी आहात का?
[५ पानांवरील चित्र]
आदामामुळे मानवजातीवर पाप आणि मृत्यू ओढवला
[६ पानांवरील चित्र]
यहोवाने परिपूर्ण तोडगा काढला