व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुम्ही चुकीचा नंबर फिरवलात”

“तुम्ही चुकीचा नंबर फिरवलात”

राज्य घोषकांचा वृत्तान्त

“तुम्ही चुकीचा नंबर फिरवलात”

दक्षिण आफ्रिकेतील जोहानिसबर्ग येथील, लेस्ली आणि कॅरोलाइन, सेवानिवृत्त लोकांच्या वसाहतीत राहणाऱ्‍यांना टेलिफोनवर आळीपाळीने साक्ष देत होत्या; कारण या वसाहतीत अनोळख्यांना प्रवेश करण्यास मनाई होती. पुष्कळ लोक घरी नसल्यामुळे त्यांना फार कमी लोकांबरोबर बोलता आले शिवाय लोक त्यांच्या ख्रिस्ती संदेशामध्ये इतकी आवडही दाखवत नव्हते. परंतु एका स्त्रीने जेव्हा बोलण्याची तयारी दाखवली तेव्हा कॅरोलाइनला आनंद झाला.

कॅरोलाइनने तिला विचारले: “कोण, मिसेस. बी. का?”

पलीकडून मैत्रीपूर्ण आवाजात उत्तर आले: “नाही, मी मिसेस. जी. बोलतेय. मला वाटतं तुम्ही चुकीचा नंबर फिरवलात.”

हा मैत्रीपूर्ण आवाज ऐकून कॅरोलाइन म्हणाली: “बरं, मिसेस. बींना मी जो संदेश सांगणार होते तो मी तुम्हालाही सांगू इच्छिते.” आणि अशाप्रकारे कॅरोलाइनने देवाच्या येणाऱ्‍या राज्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल त्या स्त्रीला सांगितले. देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाची प्रत तिला देण्याची व्यवस्था करण्यात आल्यानंतर, मिसेस. जीने कॅरोलाइनला विचारले: “पण, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात?”

कॅरोलाइनने उत्तर दिले: “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत.”

यहोवाचे साक्षीदार का? मग मला तुम्हाला भेटायचं नाही.”

कॅरोलाइन तिला म्हणाली: “पण, मिसेस. जी., गेल्या २० मिनिटांपासून मी तुम्हाला सर्वात अद्‌भुत आशेविषयी म्हणजे, देवाचं राज्य मानवजातीसाठी काय काय करणार आहे हे बायबलमधून दाखवलं. या सर्व गोष्टी ऐकून तुम्हाला किती आनंद झाला आणि तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी होती. तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांविषयी नक्की काय माहीत आहे? हे बघा, आपण आजारी पडल्यावर कोणाकडे जातो? मेकॅनीककडे जात नाही, हो ना? त्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे हे इतरजण नव्हे तर मी तुम्हाला सांगू शकेन, हो ना?”

थोडा वेळ शांत राहिल्यावर ती स्त्री कॅरोलाइनला म्हणाली: “तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, या तुम्ही. पण हो, एक मात्र लक्षात ठेवा, धर्म बदलण्याविषयी मला काही बोलू नका!”

कॅरोलाइनने तिला उत्तर दिले: “मिसेस जी, मला इच्छा असली तरीही मी तुमचा धर्म बदलू शकणार नाही. ते फक्‍त यहोवाच करू शकतो.”

माहितीपत्रक देण्याकरता या दोघींची जी भेट होणार होती ती अगदी चांगली झाली. मिसेस. जी.—(बेटी) दुसऱ्‍या भेटीसाठीसुद्धा राजी झाल्या. दुसऱ्‍यांदा कॅरोलाइन, मिसेस. जींना भेटायला गेली तेव्हा त्यांनी कॅरोलाइनला म्हटले, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चर्चा करत असल्याचे मी माझ्या भोजनगृहातील इतर स्त्रियांना सांगितले तेव्हा, त्यांनी लगेच मला विचारले: “तुम्ही असं कसं बोलता त्यांच्याबरोबर? ते लोक तर येशूवरही विश्‍वास ठेवत नाहीत!”

तेव्हा कॅरोलाइनने मिसेस. जींना लगेच, देवाच्या राज्याविषयी मागे त्यांनी केलेल्या चर्चेतील एका मुख्य मुद्द्‌याची आठवण करून दिली.

कॅरोलाइनने त्यांना विचारले: “त्या राज्याचा राजा कोण असेल?”

“येशू!” असे मिसेस. जींनी उत्तर दिले.

कॅरोलाइन म्हणाली: “अगदी बरोबर.” येशू हा देवाचा पुत्र आहे परंतु तो त्रैक्यानुसार देवाच्या बरोबरीचा नाही असा विश्‍वास यहोवाचे साक्षीदार करतात, हे तिने मिसेस. जींना समजावून सांगितले.—मार्क १३:३२; लूक २२:४२; योहान १४:२८.

आणखी एकदोन भेटींनंतर कॅरोलाइनला समजले, की मिसेस. जी सहसा आशावादी आणि आनंदी असायच्या तरी त्यांची तब्येत म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यांना खरे तर कर्करोग जडला होता आणि मरणाची त्यांना भीती वाटत होती. त्यांनी एकदा कबूल केले, “मला या गोष्टी आधीच ऐकायला मिळाल्या असत्या आणि मलाही तुमच्यासारखा विश्‍वास आधीच ठेवता आला असता तर किती बरं झालं असतं.” शास्त्रवचनांमध्ये मृत्यूची तुलना गाढ झोपेशी करण्यात आली आहे व पुनरुत्थानाद्वारे या झोपेतून उठवले जाऊ शकते हे स्पष्ट करणारी काही शास्त्रवचने दाखवून कॅरोलाइनने त्यांचे सांत्वन केले. (योहान ११:११, २५) मिसेस. जींना हे ऐकून खूप दिलासा मिळाला; त्या आता अगदी आनंदाने नियमितरीत्या बायबल अभ्यास करतात. फक्‍त त्यांच्या ढासळत चाललेल्या तब्येतीमुळे त्या राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहू शकत नाहीत.

कॅरोलाइन म्हणते: “देवदूत या कार्याला मार्गदर्शन देत आहेत ही गोष्ट मला स्पष्ट झाली आहे. कारण, मी हा नंबर चुकीनं फिरवला होता शिवाय मिसेस. जी ८९ वर्षांच्या आहेत!”—प्रकटीकरण १४:६.