व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यिर्मया ७:१६ येथील देवाच्या निर्देशनाचा असा अर्थ होतो का, की पश्‍चात्ताप न करणाऱ्‍याला मंडळीतून बहिष्कृत केल्यावर ख्रिश्‍चनांनी त्याच्यासाठी प्रार्थना करणे योग्य नाही?

अविश्‍वासू यहूदा राष्ट्राविरुद्ध आपला न्यायदंड घोषित केल्यानंतर यहोवाने यिर्मयाला म्हटले: “तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको, आरोळी व विनंती करू नको, मजजवळ मध्यस्थी करू नको; कारण मी ऐकावयाचा नाही.”—यिर्मया ७:१६.

यहोवाने यिर्मयाला इस्राएली लोकांसाठी प्रार्थना करण्यास मनाई का केली? कारण ते यहोवाच्या नियमशास्त्राचे अगदी धडधडीतपणे उल्लंघन करीत होते. ते उघडपणे व निर्लज्जपणे ‘चोरी, खून, व्यभिचार करत होते, खोटी शपथ वाहत होते, बआलाच्या मूर्तीस धूप दाखवित होते व ज्यास ते ओळखत नाहीत अशा अन्य देवांच्या मागे लागले होते.’ त्यामुळे या अविश्‍वासू यहुद्यांना यहोवाने म्हटले: “तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान यांस घालवून दिले त्याप्रमाणे मी तुम्हास मजसमोरून घालवून देईन.” तेव्हा, अशा लोकांवर यहोवा देवाने ठोठावलेला न्यायदंड मागे घ्यावा अशी यिर्मयाने किंवा दुसऱ्‍या कोणीही प्रार्थना करणे उचित नव्हते.—यिर्मया ७:९, १५.

याच अनुषंगाने, प्रेषित योहानाने देवाला उचितरीत्या प्रार्थना करण्याविषयी लिहिले. पहिल्यांदा, त्याने ख्रिश्‍चनांना अशी हमी दिली, की “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) मग, इतरांसाठी प्रार्थना करण्याबद्दल योहान पुढे म्हणाला: “ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करितांना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात, ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्‍यांस ते देईल, ज्याचा परिणाम मरण आहे असेहि पाप आहे; आणि ह्‍याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.” (१ योहान ५:१६) पवित्र आत्म्याविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या पापाची “क्षमा होणार नाही,” असे येशूने देखील म्हटले होते.—मत्तय १२:३१, ३२.

याचा अर्थ असा होतो का की अपश्‍चात्तापीपणे पातके केल्याबद्दल ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत होणाऱ्‍या सर्वांनी अशी पातके केलेली असतात ‘ज्यांचा परिणाम मरण आहे,’ व त्यामुळे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे योग्य नाही? सर्वच बाबतीत असे नसते; कारण, काही बाबतीत ही पातके मरणदंड मिळण्याच्या योग्यतेची नसतात. खरे तर, ही मरणदंडाच्या योग्य आहेत की नाही हे सांगणे काहीवेळा जरा कठीणच असते. याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणजे, यहूदाचा राजा मनश्‍शे. त्याने खोट्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या, आपल्या पुत्रांचा अग्नीत होम केला, जादूटोणा केला, यहोवाच्या मंदिरात कोरीव मूर्ती ठेवली. बायबल तर म्हणते, की मनश्‍शे आणि यहुदाच्या लोकांनी, ‘परमेश्‍वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याहीपेक्षा त्यांनी अधिक दुष्कर्म केले होते.’ या सर्वांसाठी यहोवाने मनश्‍शेला शिक्षा दिली; बेड्या घालून कैदी म्हणून त्याला त्याने बाबेलास नेऊ दिले.—२ राजे २१:१-९; २ इतिहास ३३:१-११.

मनश्‍शेची पातके घोर होती खरी, परंतु ती इतकी घोर होती का, की त्याला मरणदंड मिळायला पाहिजे होता? नाही, कारण अहवाल त्याच्याविषयी पुढे असे सांगतो: “तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंति ऐकून त्यास पुनः यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. तेव्हा परमेश्‍वरच देव आहे असे मनश्‍शेस कळून आले.”—२ इतिहास ३३:१२, १३.

त्यामुळे, एखाद्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले आहे याचा अर्थ, तिने अथवा त्याने मरणदंडाच्या योग्य असे पाप केले असावे, असा आपण निष्कर्ष काढू नये. बहिष्कृत केलेल्या व्यक्‍तिच्या अंतःकरणाची खरी स्थिती समजायला कदाचित वेळ लागेल. खरे तर, पाप करणाऱ्‍याने पश्‍चात्ताप करून आपल्या पापांपासून मागे फिरावे ही आशा बाळगून त्याला शुद्धीवर आणणे, हे बहिष्कृत करण्यामागचे एक कारण आहे.

बहिष्कृत व्यक्‍ती मंडळीत नसल्यामुळे, तिच्यात होणारा बदल मग तो थोडा असला तरी पहिल्यांदा तिच्या जवळच्या लोकांना म्हणजे तिचा वैवाहिक सोबती अथवा कुटुंबातील इतर सदस्य यांना दिसून येईल. हा बदल पाहणारे कदाचित असा निष्कर्ष काढतील की पातक्याने मरणदंड मिळण्याइतपत पाप केले नव्हते. पातक्याने, देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या त्याच्या वचनांतून आध्यात्मिक शक्‍ती मिळवावी आणि यहोवाने आपल्या इच्छेच्या सामंजस्यात पातक्याशी व्यवहार करावा अशी ते यहोवाकडे प्रार्थना करतील.—स्तोत्र ४४:२१; उपदेशक १२:१४.

पातक्याने पश्‍चात्ताप केला आहे असा विश्‍वास ठेवण्यासाठी काहींनी त्याच्यातील पुरेसा बदल पाहिलेला असला तरी, मंडळीतील इतरांनी तो बदल पाहिलेला नसेल. त्यामुळे अशा लोकांनी, पातके करणाऱ्‍यासाठी मंडळीत कोणाला प्रार्थना करताना ऐकले तर ते कदाचित गोंधळून जातील, अस्वस्थ होतील, कदाचित हे त्यांच्यासाठी एक अडखळणही ठरू शकेल. म्हणूनच, अशा पश्‍चात्तापी पातक्यासाठी जर कोणी प्रार्थना करू इच्छित असेल तर ती त्याने खासगीत करावी आणि पातक्याच्या संबंधाने काय केले जावे याचा निर्णय घेण्याचे काम मंडळीतील जबाबदार पदी असलेल्या वडिलांच्या हाती सोपवून द्यावे.

[३१ पानांवरील चित्र]

मनश्‍शेने स्वतःला यहोवापुढे लीन केल्यावर त्याच्या घोर पातकांची यहोवाने क्षमा केली

[३० पानांवरील चित्राचे श्रेय]

Reproduced from Illustrierte Pracht - Bibel/Heilige Schrift des Alten und Neuen Testaments, nach der deutschen Uebersetzung D. Martin Luther’s