व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“डोळ्यात घालण्यास अंजन”

“डोळ्यात घालण्यास अंजन”

“डोळ्यात घालण्यास अंजन”

आशिया मायनर मधील लावदिकीया या पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीला येशू ख्रिस्ताने हा उपचार सुचवला होता.

येशू म्हणाला: “तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे.” (तिरपे वळण आमचे.) याचा अर्थ, हा खरोखरचा डोळ्यांचा आजार नव्हता; तर तो आध्यात्मिक आंधळेपणा होता ज्यावर उपचार करण्याची गरज होती. लावदिकीयातील ख्रिश्‍चन भौतिकरीत्या समृद्ध असलेल्या शहरात राहत असल्यामुळे भौतिकवादी प्रवृत्तीचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता आणि त्यांच्या खरोखरच्या आध्यात्मिक गरजांकडे ते दुर्लक्ष करीत होते.

त्यांची दृष्टी कशामुळे कमी झाली यावर विवेचन केल्यावर येशू पुढे म्हणाला: “‘मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, व मला काही उणे नाही’ असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.” (तिरपे वळण आमचे.) लावदिकीया मंडळीतील सदस्यांना याची जाणीव नसली तरी, केवळ येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकींच्या व शिस्तीच्या अधीन झाल्याने मिळणाऱ्‍या व बरे करणाऱ्‍या ‘अंजनाची’ त्यांना नितांत गरज होती. येशूने म्हटले: “माझ्यापासून विकत घे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रकटीकरण ३:१७, १८.

लावदिकीयातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आजही प्रामाणिक अंतःकरणाच्या ख्रिश्‍चनांनी, ते राहत असलेल्या भौतिकवादी व सुखवादी परिस्थितीचा अजाणतेतही का होईना प्रभाव होण्यापासून सावध राहिले पाहिजे. निरोगी आध्यात्मिक दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेला उपचार पुढील सल्ल्यात दिला आहे: “तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास [येशूकडून] अंजन विकत घे.”

येथे लक्ष देण्याजोगी एक गोष्ट म्हणजे, हे “अंजन” आपल्याला विकत घ्यावे लागते. म्हणजे आपल्याला काहीतरी खर्च करायची गरज आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर मनन करण्यासाठी वेळ खर्च करण्याची गरज आहे. स्तोत्रकर्ता आपल्याला हमी देतो त्याप्रमाणे देवाचे हे वचन ‘चोख आहे, ते [आध्यात्मिक] नेत्रांना प्रकाश देते.’—स्तोत्र १९:८.