व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालकहो आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करा!

पालकहो आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करा!

पालकहो आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करा!

मुलांना मार्गदर्शनाची आणि प्रेमळ शिस्तीची, आणि ती देखील त्यांच्या पालकांकडून मिळणे आवश्‍यक आहे. याबाबतीत, ब्राझीलच्या एक शिक्षणतज्ज्ञा, तान्या झागुरी म्हणतात: “प्रत्येक मुलाला मौजमजा करण्याची स्वाभाविक इच्छा असते. परंतु यावर काही मर्यादा घालणे आवश्‍यक आहे. आणि पालकांनी या मर्यादा घातल्या पाहिजेत. नाहीतर मुलांचे वागणे हाताबाहेर जाऊ शकते.”

परंतु अनेक देशांमध्ये, व्यक्‍तिगत स्वातंत्र्याला फाजील महत्त्व देणाऱ्‍या स्वच्छंदी समाजाच्या प्रभावामुळे वरील सल्ल्यानुसार वागणे कठीण होऊ शकते. अशावेळी पालक मदतीसाठी कोणाकडे पाहू शकतात? देवाचे भय बाळगणाऱ्‍या पालकांना याची जाणीव असते, की त्यांची मुले ही “परमेश्‍वराने दिलेले धन” आहेत. (स्तोत्र १२७:३) त्यामुळे, ते देवाचे वचन बायबल यातील मार्गदर्शनानुसार आपल्या मुलांचे संगोपन करतात. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १३:२४ म्हणते: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.”

बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “छडी” या शब्दाचा अर्थ नेहमीच केवळ शारीरिक शिक्षा असा होत नाही. त्याचा अर्थ, कोणत्याही प्रकारची सुधारणूक असा होतो. होय, आपल्या मुलाची स्वच्छंदी वागणूक सुधारण्यासाठी बहुतेकदा केवळ शाब्दिक शिस्त पुरेशी असू शकते. नीतिसूत्रे २९:१७ म्हणते: “तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.”

मुलांमधील वाईट गुण काढून टाकण्यासाठी त्यांना प्रेमळ शिस्तीची आवश्‍यकता आहे. आपल्या मुलांना ठाम व प्रेमळ सुधारणूक देणारे पालक खरोखरच आपल्या मुलांवर प्रेम करतात हेच यावरून दिसून येते. (नीतिसूत्रे २२:६) तेव्हा पालकहो, निराश होऊ नका! बायबलमधील उचित व व्यावहारिक सल्ल्याचे पालन करण्याद्वारे तुम्ही यहोवा देवाला संतुष्ट करू शकाल आणि आपल्या मुलांकडून आदर मिळवाल.