व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वेच्छेने लोक गिलियडला येतात

स्वेच्छेने लोक गिलियडला येतात

स्वेच्छेने लोक गिलियडला येतात

विदेशात, मिशनरी सेवा करणाऱ्‍या समर्पित पुरुषांना व स्त्रियांना प्रशिक्षण देणे हा वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा उद्देश आहे. गिलियडचे शिक्षण प्राप्त करण्यासाठी कोण पात्र आहेत? ज्यांच्याठायी स्वेच्छेचा आत्मा आहे. (स्तोत्र ११०:३) सप्टेंबर ८, २००१ रोजी १११ व्या वर्गाचा पदवीदान समारंभ झाला तेव्हाही हे स्पष्ट दिसून आले.

या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने आधीच, जास्त गरज असलेल्या देशात जाऊन सेवा करण्यासाठी आपले कुटुंब, मित्र आणि आपला देश सोडला होता. असे करून त्यांनी जणू स्वतःची प्रतीती पाहिली होती की ते एका वेगळ्या वातावरणात राहण्याकरता काही फेरबदल करू शकतील की नाही. उदाहरणार्थ, रीशे आणि नाताली यांनी बोलिव्हिया येथे जाऊन कार्य करण्यासाठी आपल्या जीवनात बरेच बदल केले; टॉड आणि मिशेलने डॉमिनिकन प्रजासत्ताक येथे जाण्याकरता आणि डेव्हीड व मोनीक यांनी आशियातील एका देशात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास जाण्याकरता बरेच फेरबदल केले. काही विद्यार्थ्यांनी आधीच निकाराग्वा, इक्वाडोर आणि अल्बानिया येथे सेवा केली होती.

क्रिस्टीला उच्च शाळेत स्पॅनिश भाषा शिकण्याचे प्रोत्साहन देण्यात आले ज्यामुळे लग्नाआधी इक्वाडोरमध्ये दोन वर्षांसाठी राहायला ती सज्ज झाली. इतर काही जण, आपल्याच देशांतील विदेशी भाषांच्या मंडळ्यांमध्ये जाऊ लागले. सॉल आणि प्रीशीला यांना एका वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यावे लागले; प्रशालेला उपस्थित राहण्याआधी आपली इंग्रजी सुधरवण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने बरेच परिश्रम घेतले.

मिशनरी प्रशिक्षणाचे २० आठवडे भराभर गेले आणि पदवीदानाचा दिवस उगवला. सुज्ञ सल्ला व प्रोत्साहनदायक निरोपाचे शब्द ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे मित्रजन आणि कौटुंबिक सदस्य एकत्र जमले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, थिओडोर जॅरस होते. बंधू जॅरस गिलियड प्रशालेच्या सातव्या वर्गाचे पदवीधर आहेत आणि सध्या ते यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी एका गोष्टीवर अधिक भर दिला; ती म्हणजे, संघटना या नात्याने, गिलियडच्या विद्यार्थ्यांना, संपूर्ण पृथ्वीवर राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराबाबतचे प्रशिक्षण देण्याच्या मुख्य हेतूपासून आपण कधीही भरकटलो नाही. (मार्क १३:१०) गिलियड प्रशाला योग्यताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रचाराचे हे कार्य, त्यांनी पूर्वी जितके केले त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाणावर करण्यास तसेच प्रशिक्षित मिशनऱ्‍यांची खासकरून जेथे गरज आहे, अशा जगातील ठिकाणी जाण्यास तयार करते. बंधू जॅरस यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गिलियड प्रशिक्षणाचा चांगला उपयोग करण्यास सांगितले; कारण, आता ज्या १९ देशांत मिशनरी आधीच कार्य करीत आहेत तेथे यांनाही नेमण्यात आले होते.

पदवी प्राप्त करणाऱ्‍यांना समयोचित सल्ला

उद्‌घाटनपर भाषणानंतर अनेक भाषणांची मालिका सुरू झाली. अमेरिकेतील शाखा समितीचे सदस्य बंधू विल्यम व्हॅन डी वोल यांनी “मिशनरी आवेश—खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे ओळखचिन्ह” या विषयावर भाषण दिले. त्यांनी मत्तय २८:१९, २० मध्ये ‘शिष्य करण्याच्या’ आज्ञेकडे सर्वांचे लक्ष आकर्षित केले आणि विद्यार्थ्यांना अशाप्रकारे आर्जवले: “येशूचे अनुकरण करा; त्याने आवेश व उत्साहाने आपले मिशनरी कार्य पूर्ण केले.” त्यांनी या भावी मिशनऱ्‍यांना, मिशनरी कार्याबद्दलचा आपला आवेश टिकवून ठेवावा म्हणून पुढील प्रकारे उत्तेजन दिले: “तुम्हाला जमेल असा एक आराखडा बनवून त्यानुसार वागा; व्यक्‍तिगत अभ्यासाच्या चांगल्या सवयी टिकवून ठेवा, ईश्‍वरशासित बाबतीत अद्ययावत राहा; तुम्ही तुमच्या नेमणुकीत का आहात ते कारण सतत डोळ्यापुढे ठेवा.”

कार्यक्रमात नंतर, नियमन मंडळाचे सदस्य गाय पिअर्स यांचे भाषण होते. “तुमची ‘तर्कशक्‍ती’ वाढवत राहा.” (रोमकर १२:१, NW) पदवी प्राप्त करणाऱ्‍या वर्गाला त्यांनी व्यावहारिक सल्ला दिला; विचार करून तर्क करण्याच्या देवाने दिलेल्या क्षमतेचा वापर करण्याचे त्यांनी त्यांना उत्तेजन दिले. ते म्हणाले: “यहोवा आपल्या वचनातून तुम्हाला जे सांगू इच्छितो त्यावर सतत मनन करा. असे केल्याने तुमचे संरक्षण होईल.” (नीतिसूत्रे २:११) हटवादी असू नका, असल्यास तुम्ही तुमच्या ‘तर्कशक्‍तीचा’ उपयोग करू शकणार नाही, असा बंधू पिअर्स यांनी वर्गाला सल्ला दिला. पदवीधारकांनी, उचित वेळी आठवण करून देण्यात आलेल्या या सर्व सूचनांचे पालन आपल्या मिशनरी कार्यात केल्यास त्यांना बराच फायदा होईल.

अध्यक्षांनी नंतर, एका गिलियड प्रशिक्षकांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले. त्यांचे नाव होते लॉरेन्स बावन. बंधू बावन यांनी “दुसरे काही जमेस धरू नये” या विषयावर भाषण दिले. प्रेषित पौलाने करिंथमधील त्याच्या मिशनरी कार्याच्या बाबतीत, ‘वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्‍याच्याशिवाय . . . दुसरे काहीही जमेस न धरण्याचा’ निश्‍चय केला होता, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले. (१ करिंथकर २:२) वचनयुक्‍त संततीद्वारे यहोवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण केले जाईल, या संपूर्ण बायबलमधून मिळणाऱ्‍या संदेशाला विश्‍वातील सर्वात प्रचंड शक्‍ती अर्थात पवित्र आत्मा आधार देतो, हे पौलाला माहीत होते. (उत्पत्ति ३:१५) सर्व ४८ विद्यार्थ्यांना पौल आणि तीमथ्य यांच्याप्रमाणे असण्यास, यशस्वी मिशनरी होण्यास व ‘सुवचनांच्या नमुन्यास’ धरून राहण्यास आर्जवण्यात आले.—२ तीमथ्य १:१३.

“देवाकडून देणगी म्हणून मिळालेल्या सुहक्काबद्दल कृतज्ञता बाळगा,” हा सुरवातीच्या भाषणांच्या मालिकेतील शेवटल्या भाषणाचा विषय होता. गिलियड प्रशालेचे रेजिस्ट्रार, बंधू वॉलस लिव्हरन्स यांनी पदवीधारकांना समजावून सांगितले, की सेवेच्या बाबतीत मिळणारे सुहक्क प्राप्त करण्याचा आपल्याला हक्क नव्हता किंवा आपण स्वतःहून ते कमावलेले नाहीत तर ते देवाच्या अपात्री कृपेमुळे मिळाले आहेत. प्रेषित पौलाचे उदाहरण देऊन बंधू लिव्हरन्स यांनी सांगितले: “पौलाच्या कार्यांनुसार ही नेमणूक मिळण्याचा हक्क त्याने कमावला होता किंवा त्यासाठी तो पात्र होता म्हणून यहोवाने त्याला राष्ट्रांकरता प्रेषित बनवले नव्हते. अनेक वर्षांपासून करत असलेल्या सेवेच्या किंवा अनुभवाच्या आधारावरही त्याला ही नेमणूक मिळाली नव्हती. मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यावर, बर्णबाची निवड ही अगदी उचित निवड होती असे भासले असावे. एखाद्या व्यक्‍तीच्या क्षमतेवरही ते अवलंबून नाही; कारण, खरे तर पौलापेक्षा अपुल्लो वाक्‌चतुर होता. तरीपण देवाने पौलाला निवडून आपली अपात्री कृपा दाखवली.” (इफिसकर ३:७, ८) बंधू लिव्हरन्स यांनी सर्व पदवीधारकांना, इतरांना देवाचे मित्र होऊन “देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन” प्राप्त करण्यास मदत करण्याकरता आपली देणगी अर्थात सेवेचा सुहक्क उपयोगात आणण्याचे उत्तेजन दिले.—रोमकर ६:२३.

यानंतर, आणखी एक गिलियड प्रशिक्षक बंधू मार्क न्यूमार यांनी, “तयारीने मिळतात उत्तम परिणाम” या विषयावर श्रोत्यांबरोबर उत्साही चर्चा केली. (नीतिसूत्रे २१:५) त्यात अनुभवांद्वारे हे सांगण्यात आले, की एक प्रचारक सेवेची चांगली तयारी करतो अर्थात त्याच्या मनाची तयारी करतो तेव्हा त्या लोकांबद्दल खरी आस्था बाळगता येईल. त्याला केव्हाही शब्द अपुरे पडणार नाहीत. उलट, लोकांना आध्यात्मिकरीत्या मदत करणाऱ्‍या गोष्टी तो बोलेल आणि तसे कार्य करेल. “यशस्वी मिशनरी होण्यासाठी याच गोष्टीची प्रामुख्याने आवश्‍यकता आहे,” असे बंधू न्यूमार म्हणाले. आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करतानाचा स्वतःचा अनुभवही त्यांनी त्या वेळी सांगितला.

मिशनरी सेवा—मनाला समाधान देणारे करिअर

बंधू राल्फ वोल्स आणि चार्ल्स वुडी यांनी खास प्रशिक्षणासाठी पॅटरसन शैक्षणिक केंद्र येथे आलेल्या काही अनुभवी मिशनऱ्‍यांची मुलाखत घेतली. लोकांबद्दल असलेल्या प्रीतीमुळे मिशनरी सेवेत आनंद मिळतो या गोष्टीवर या मुलाखतींत जोर देण्यात आला. मिशनरी सेवा मनाला समाधान देणारे करिअर का आहे हे, मिशनरी सेवेत मुरलेल्या बांधवांकडून ऐकायला मिळाल्यामुळे, पदवीधारकांना, श्रोत्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या कौटुंबिक सदस्यांना व मित्रांना खूप प्रोत्साहन मिळाले.

नियमन मंडळाचे सदस्य बंधू जॉन ई. बार यांनी पदवीदानाच्या दिवसाचे प्रमुख भाषण दिले. त्यांच्या भाषणाचा विषय होता: “परमेश्‍वराला नवगीत गा.” (यशया ४२:१०) “नवगीत गा” हा वाक्यांश बायबलमध्ये एकूण नऊ वेळा आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असा प्रश्‍न केला: “पण हे नवगीत काय आहे?” मग त्यांनीच याचे उत्तर दिले: “वचनाचा संदर्भ दाखवतो, की यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या संदर्भात नवीन घडामोडी होत असल्यामुळे हे नवगीत गायिले जाते.” येशू ख्रिस्त देवाच्या विजयी राज्याचा मशिही राजा आहे; त्या राज्याच्या स्तुतीगीतांमध्ये आपलाही सूर मिळवण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना आर्जवले. ते म्हणाले, की गिलियडमध्ये त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणामुळे या ‘नवगीताचे’ विविध पैलू आणखी खोलवर समजायला त्यांना मदत मिळाली. “तुम्ही जाल तेथे आपल्या बंधूभगिनींबरोबर यहोवाची स्तुतीगीते ‘गा;’ आणि नेमणुकीत असताना इतरांबरोबर ऐक्याने राहा, या गोष्टीवर या प्रशालेने जोर दिला.”

विद्यार्थ्यांना त्यांचा डिप्लोमा दिल्यानंतर, वर्गाच्या वतीने एका बांधवाने मनःपूर्वक आभारप्रदर्शनाचे एक पत्र श्रोत्यांना वाचून दाखवले; गिलियडमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी या पत्राद्वारे आभार व्यक्‍त केले.

जास्त प्रमाणावर देवाची सेवा करण्याची व ती आणखी फलदायी करण्याची तुमची इच्छा आहे का? असल्यास, पदवी प्राप्त करणाऱ्‍या या विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्हीही सेवेसाठी पुढे या. त्यांच्या या स्वेच्छेने त्यांना मिशनरी कार्यासाठी पात्र ठरण्यास मदत केली आहे. देवाची सेवा करण्यासाठी आपण स्वेच्छेने पुढे येतो तेव्हा जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे!—यशया ६:८.

[२५ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: १०

नेमलेले देश: १९

एकूण विद्यार्थी: ४८

सरासरी वय: ३३.२

सत्यात सरासरी वर्षे: १६.८

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२.६

[२६ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १११ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) योमन्स, सी.; टोकारी, ए.; नूनीझ, एस.; फिलिप्स, जे.; डॉकन, एम.; सिल्वेस्ट्री, पी. (२) मोरीन, एन.; बायनी, जे.; लोपेझ, एम.; वॅन हाऊट, एम.; कॅन्टू, ए.; सिल्वाशी, एफ. (३) विल्यम्स, एम.; इटो, एम.; वॅन कोईली, एस.; लेवरिंग, डी.; फ्युझल, एफ.; गायस्लर, एस. (४) योमन्स, जे.; मॉस, एम.; हॉजिन्स, एम.; डडींग, एस.; ब्रिसेन्यो, जे.; फिलिप्स, एम. (५) लोपेझ, जे.; इटो, टी.; सोमरुड, एस.; कोझा, सी.; फ्युझल, जी.; मॉस, डी. (६) विल्यम्स, डी.; डडींग, आर.; गायस्लर, एम.; मोरीन, आर.; बिनी, एस.; कॅन्टू, एल. (७) डॉकन, एम.; हॉजिन्स, टी.; लेवरिंग, एम.; सिल्वेस्ट्री, एस.; वॅन हाऊट, डी.; ब्रिसेन्यो, ए. (८) वॅन कोईली, एम.; नूनीझ, ए.; कोझा, बी.; सोमरुड, जे.; टोकारी, एस.; सिल्वाशी, पी.