व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आठवा हेन्री आणि बायबल

आठवा हेन्री आणि बायबल

आठवा हेन्री आणि बायबल

इंग्रजी भाषिकांचा इतिहास (खंड २) (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात विन्स्टन चर्चिल यांनी असे लिहिले: “धार्मिक विश्‍वासांच्या संदर्भात रिफॉर्मेशन अर्थात धर्मसुधारणेने आमूलाग्र बदल घडवून आणले. बायबल हे, अनेक क्षेत्रांत प्रभावी ठरलेल्या निपुण सल्ल्याचा नवीन सर्वसंमत उगम आहे असे समजले जाऊ लागले. जुन्या पिढीचे मात्र असे मत होते की पवित्र लिखाणे अशिक्षितांच्या हातात पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे फक्‍त पाळकांनीच ही पवित्र लिखाणे वाचली पाहिजेत.”

अहवाल पुढे म्हणतो: “टिंडेल व कव्हरडेल यांनी इंग्रजीत भाषांतरीत केलेले संपूर्ण छापील बायबल, १५३५ सालच्या शरद ऋतुच्या शेवटी, सर्वात प्रथम निघाले होते आणि आता त्याच्या अनेकानेक आवृत्त्या तयार केल्या जात होत्या. सरकारने सर्वसामान्य लोकांना बायबलचे वाचन करण्याची शिफारस करण्याचा पाळकांना हुकूम दिला.” अनेक शतकांपर्यंत लोक बायबलविषयी अज्ञानी होते; पण चर्चऐवजी आठवा हेन्री याच्या सरकारामुळेच इंग्लंड बायबलच्या बाबतीत शिक्षित होणार होते. *

“पॅरिसमधील सरकारने, आधीच्या आवृत्तीपेक्षा उच्च प्रतीच्या इंग्रजी भाषेच्या बायबलच्या भरपूर प्रती छापण्याचा हुकूम दिला तेव्हा बायबलविषयी जुनी मते बाळगणाऱ्‍या लोकांना आणखी एक तडाखा मिळाला. शिवाय, १५३८ सालच्या सप्टेंबर महिन्यात असेही फर्मान काढले, की देशातील प्रत्येक चर्चने मोठ्या आकाराचे इंग्रजीतील बायबल विकत घ्यावे जेणेकरून चर्चचे सदस्य त्याचा सहजासहजी उपयोग करू शकतील आणि ते वाचूही शकतील. सिटी ऑफ लंडनमधील सेंट पॉल चर्चमध्ये बायबलच्या सहा प्रती ठेवण्यात आल्या व आम्हाला असे सांगण्यात आले, की कोणी मोठ्याने बायबल वाचून दाखवणारा असल्यास दिवसभर लोकांची चर्चमध्ये गर्दी होत असे.”

परंतु दुःखाची गोष्ट अशी, की अनेक देशांतील बहुतेक लोक नियमितपणे बायबल वाचन करण्याकरता त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयीचा फायदा घेत नाहीत. ही खरोखरच चिंतेची बाब आहे, कारण फक्‍त बायबलच “परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख” आहे जे “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

[तळटीप]

^ परि. 3 आठवा हेन्री याने १५०९ पासून १५४७ पर्यंत इंग्लंडवर राज्य केले.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

हेन्री आठवा: Painting in the Royal Gallery at Kensington, from the book The History of Protestantism (Vol. I)