वर्गभेद नसलेला समाज वास्तवात उतरणे शक्य?
वर्गभेद नसलेला समाज वास्तवात उतरणे शक्य?
अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष, जॉन ॲडम्स, ऐतिहासिक स्वातंत्र्य घोषणेवर सही करणाऱ्यांपैकी एक होते; त्या घोषणेत असे म्हटले होते: “सर्व मानवांना समान असे निर्माण करण्यात आले आहे हे उघड असल्याचे करतो.” तरीसुद्धा, लोकांमधील समानतेविषयी जॉन ॲडम्स यांना शंका होती कारण त्यांनी असे लिहिले: “सर्वशक्तिमान देवाने, मानवी देहस्वभावात बुद्धी आणि शरीरासंबंधीची असमानता अशाप्रकारे रुजवली आहे की कोणत्याही विचाराने किंवा धोरणाने ती मिटवली जाऊ शकत नाही.” याच्या उलट, ब्रिटिश इतिहासकार एच. जी. वेल्स यांना तीन गोष्टींच्या आधारे एका समान मानव समाजाची कल्पना करता आली: शुद्ध आणि भ्रष्ट नसलेला समान जागतिक धर्म, विश्वव्यापी शिक्षण आणि शस्त्रधारी सैन्याचा अभाव.
आतापर्यंत तरी, वेल्स यांनी कल्पना केलेला समान मानव समाज इतिहासाने पाहिलेला नाही. मानवांमध्ये समानतेचा जरासाही अंश नाही आणि वर्गभेद आजही
समाजात ठळकपणे दिसून येतो. या वर्गभेदामुळे एकंदर समाजाला काही फायदे झाले आहेत का? नाही. सामाजिक वर्गभेदामुळे लोकांमध्ये विभाजन होते आणि त्यामुळे हेवा, द्वेष, दुःख व पुष्कळसा रक्तपात घडतो. एकेकाळी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेत गोरे लोक श्रेष्ठ आहेत या मनोवृत्तीमुळे गोरे नसलेल्या लोकांचे पुष्कळ हाल झाले—व्हॅन दीमनचा प्रदेश (सध्याचे टास्मानिया) येथील ॲबोरिजनल लोकांचा संपूर्ण नरसंहार हा देखील याचाच परिणाम होता. युरोपमध्ये, यहूद्यांना कनिष्ठ समजल्यामुळे सामुदायिक हत्याकांडाला सुरवात झाली. अमीर उमरावांची धनसंपत्ती आणि खालच्या व मध्यम वर्गातील लोकांचे असमाधान, हे १८ व्या शतकातील फ्रेंच क्रांतीला व रशियातील २० व्या शतकातील बोल्शेव्हिक क्रांतीला कारणीभूत ठरले.गतकाळातील एका सुज्ञ पुरुषाने असे लिहिले: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) त्याचे हे शब्द अगदी खरे आहेत—मग ही सत्ता एकट्या व्यक्तीची असो नाहीतर समूहाची. एका गटाचे लोक दुसऱ्या गटाच्या लोकांपेक्षा स्वतःला वरचढ ठरवतात तेव्हा त्याचा परिणाम दुःख आणि कष्ट हाच होतो.
देवापुढे सर्व मानव समान
काही लोकांचे गट इतरांपेक्षा स्वभावतःच श्रेष्ठ आहेत का? देवाच्या नजरेत तसे नाही. बायबल म्हणते: “[देवाने] एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६) शिवाय, निर्माणकर्ता “अमिरांची भीड राखीत नाही, [तो] श्रीमंताला गरिबांहून अधिक मानीत नाही, कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.” (ईयोब ३४:१९) सर्व मानव एकाच कुळातून आले आहेत आणि देवापुढे सर्वजण समान जन्मले आहेत.
हेसुद्धा लक्षात असू द्या की, एक व्यक्ती मरते तेव्हा इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची तिची प्रौढी नाहीशी होते. प्राचीन ईजिप्शियन लोकांचा यावर विश्वास नव्हता. एखादा फारो मरण पावल्यावर त्याच्या कबरेत मौल्यवान वस्तू ठेवल्या जायच्या जेणेकरून मृत्यूपश्चात जीवनातील उच्च पद त्याला पुन्हा मिळाल्यावर तो या वस्तूंचा उपभोग घेऊ शकेल. हे खरे होते का? नाही. त्यातील बहुतेक मौल्यवान वस्तू कबरा लुटणाऱ्यांच्या हाती पडल्या आणि लुटारूंच्या हाती न पडलेल्या वस्तू आज संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात.
तो फारो मृत असल्यामुळे त्या महागड्या वस्तूंचा त्या फारोला काही उपयोग झाला नाही. मृतावस्थेत उच्च-नीच, अमीर-गरीब हे भेदभाव नसतात. बायबल म्हणते: “ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशूतुल्य नष्ट होतात. मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे.” (स्तोत्र ४९:१०, १२) आपण राजा असलो किंवा गुलाम, पुढील शब्द आपल्याला लागू होतात: “मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते . . . ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:५, १०.
देवाच्या नजरेत आपण सर्वजण जन्मतः समान आहोत आणि मेल्यावरही समान असतो. मग, आपल्या क्षणभंगूर आयुष्यात एका गटाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करणे किती वायफळ आहे!
वर्गभेद नसलेला समाज—कसा?
तथापि, जिवंतांमध्ये समाजातील वर्गांना महत्त्व दिले जाणार नाही अशा वेळेची आशा आपण ठेवू शकतो का? होय, निश्चितच. सुमारे २,००० वर्षांआधी येशू या पृथ्वीवर होता तेव्हा या समाजाचा पाया घालण्यात आला होता. सर्व विश्वासू मानवांकरता येशूने आपल्या जीवनाचे खंडणी बलिदान दिले जेणेकरून “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
आपल्या कोणत्याही अनुयायांनी त्यांच्या सहविश्वासूंपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानू नये म्हणून येशू म्हणाला: “तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो मत्तय २३:८-१२) देवाच्या नजरेत, येशूचे सर्व खरे शिष्य विश्वासात समान आहेत.
स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल.” (प्रारंभिक ख्रिस्ती एकमेकांना समान मानत होते का? येशूच्या शिकवणींची समज ज्यांना प्राप्त झाली ते एकमेकांना समान मानत होते. विश्वासात सगळे सारख्या दर्जावर आहेत असे त्यांचे मत होते; एकमेकांना ‘बंधू’ म्हणण्याद्वारे त्यांनी हे स्पष्ट केले. (फिलेमोन १, ७, २०) आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असा विचार करण्यास कोणालाही उत्तेजन दिले जात नव्हते. उदाहरणार्थ, पेत्राने आपल्या दुसऱ्या पत्रात स्वतःचे वर्णन नम्रपणे कसे केले ते पाहा: “आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून.” (२ पेत्र १:१) पेत्राला व्यक्तिगतरित्या येशूकडून शिकवण मिळाली होती आणि प्रेषित यानात्याने तो महत्त्वाच्या जबाबदार पदी होता. तरीसुद्धा, त्याने स्वतःला दास मानले आणि इतर ख्रिश्चनांना देखील त्याच्यासारखाच विश्वास मिळाला होता याची त्याला जाणीव होती.
काहींचे म्हणणे असे असेल: पण देवाने ख्रिस्तपूर्व काळात इस्राएलला आपले खास राष्ट्र म्हणून निवडले ही गोष्ट समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. (निर्गम १९:५, ६) त्यांचे असे म्हणणे असेल की, हा जातीयवाद झाला; पण हे खरे नाही. हे मान्य आहे की, अब्राहामाचे वंशज म्हणून इस्राएली लोकांचा देवासोबत एक खास नातेसंबंध होता आणि देवाचे संदेशही त्यांच्याद्वारेच प्रकट केले जात होते. (रोमकर ३:१, २) पण त्यांना उंचावण्याच्या उद्देशाने हे केले गेले नव्हते. उलट, ‘सर्व राष्ट्रे आशीर्वादित व्हावीत’ म्हणून हे केले होते.—उत्पत्ति २२:१८; गलतीकर ३:८.
पण असे झाले की, बहुतांश इस्राएल लोकांनी आपला कुलपिता अब्राहाम यासारखा विश्वास दाखवला नाही. ते अविश्वासू होते आणि त्यांनी येशूला मशीहा म्हणून स्वीकारले नाही. यामुळेच, देवाने त्यांना नाकारले. (मत्तय २१:४३) परंतु, यामुळे मानवजातीतील लीन जनांना देवाने वचन दिलेल्या आशीर्वादांना मुकावे लागले नाही. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी, ख्रिस्ती मंडळीचा जन्म झाला. पवित्र आत्म्याने अभिषिक्त असलेली ही ख्रिश्चनांची संघटना ‘देवाचे इस्राएल’ होती आणि तिच्याकरवी आशीर्वाद दिले जाणार होते.—गलतीकर ६:१६.
त्या मंडळीतील काही सदस्यांना समानतेविषयी थोडेफार समजावण्याची गरज होती. उदाहरणार्थ, काहीजण गरीब ख्रिश्चनांपेक्षा धनवान ख्रिश्चनांना जरा जास्त सन्मान देत होते तेव्हा शिष्य याकोबाने त्यांना समजावले. (याकोब २:१-४) त्यांचे हे वागणे चुकीचे होते. तसेच, प्रेषित पौलाने दाखवले की, विदेशी ख्रिश्चन यहुदी ख्रिश्चनांपेक्षा कनिष्ठ नव्हते किंवा ख्रिश्चन महिला पुरुषांपेक्षा कनिष्ठ नव्हत्या. त्याने लिहिले: “तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहा. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे, यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.”—गलतीकर ३:२६-२८.
आज वर्गभेद मानत नसलेले लोक
आज यहोवाचे साक्षीदार बायबलमधील तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ठाऊक आहे की, देवाच्या नजरेत समाजातील विविध वर्गांना काही महत्त्व नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये पाळक वर्ग आणि सामान्य लोक अशी १ योहान २:१५-१७) उलट, विश्वाचा सार्वभौम, यहोवा देव याची उपासना करण्यात ते सर्व संयुक्त आहेत.
वर्गवारी नाही आणि वर्ण व संपत्तीच्या आधारेही भेदभाव नाहीत. त्यांच्यातील काहीजण श्रीमंत असले तरीही “संसाराविषयीची फुशारकी” ते मारत नाहीत कारण या गोष्टी आज आहेत उद्या नाहीत याची त्यांना बऱ्यापैकी कल्पना आहे. (त्यांच्यातील प्रत्येकजण आपल्या सहमानवांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्यात भाग घेण्याची जबाबदारी स्वीकारतो. येशूप्रमाणे ते जुलूम सहन करणाऱ्या व दुर्लक्षित लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाचे वचन शिकवण्याची तयारी दाखवून त्यांचा सन्मान करतात. काही गरीब जण उच्च वर्गीय म्हणवणाऱ्या काहींसोबत मिळून कार्य करतात. येथे महत्त्वाचे ठरतात ते आध्यात्मिक गुण, सामाजिक वर्ग नाही. पहिल्या शतकातील लोकांप्रमाणे, सर्वजण विश्वासात बंधू-बहिणी आहेत.
समानतेत विविधतेला मुभा
अर्थात, समानता म्हणजे एकसारखेपणा नाही. या ख्रिस्ती संघटनेत स्त्री-पुरुष, अबाल-वृद्ध असे सगळे आहेत तसेच वेगवेगळ्या जातीचे, भाषेचे, राष्ट्राचे आणि आर्थिक पार्श्वभूमीचे लोकही आहेत. व्यक्ती यानात्याने त्यांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता वेगवेगळ्या आहेत. परंतु या वेगळेपणामुळे काहीजण श्रेष्ठ किंवा काहीजण कनिष्ठ ठरत नाहीत. उलट, अशा वेगळेपणामुळे आनंददायक विविधता निर्माण होते. त्या ख्रिश्चनांना ठाऊक आहे की, त्यांच्याजवळ असलेल्या क्षमता देवाकडून त्यांना मिळालेले दान आहे आणि म्हणून इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजण्याचे काही कारण नाही.
देवाकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी स्वतःच स्वतःवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वर्गभेद निर्माण झाले आहेत. लवकरच, देवाचे राज्य पृथ्वीचा कारभार आपल्या हाती घेईल आणि मग मानवाने निर्माण केलेल्या वर्गभेदाचा त्याचप्रमाणे आतापर्यंत दुःखाला कारणीभूत ठरलेल्या सर्व गोष्टींचा अंत केला जाईल. मग, खऱ्या अर्थाने, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:११) तेव्हा आपल्या श्रेष्ठत्वाची फुशारकी मारण्यासाठी काहीच कारण उरणार नाही. त्यानंतर पुन्हा कधी मानवांमधील जागतिक बंधुत्वामध्ये समाजातील वर्गांमुळे फूट पडू दिली जाणार नाही.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
निर्माणकर्ता “श्रीमंताला गरिबांहून अधिक मानीत नाही, कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.”—ईयोब ३४:१९.
[६ पानांवरील चित्र]
यहोवाचे साक्षीदार आपल्या शेजाऱ्यांना आदर देतात
[७ पानांवरील चित्रे]
खरे ख्रिस्ती आध्यात्मिक गुणांना अधिक महत्त्व देतात