चांगुलपणाने वागत राहा
चांगुलपणाने वागत राहा
“प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.”—इफिसकर ५:९.
१. लाखो लोक स्तोत्र ३१:१९ यातील शब्दांशी सहमत आहेत हे आज कसे दाखवत आहेत?
कोणताही मानव जी सर्वात चांगली गोष्ट करू शकतो ती म्हणजे यहोवाला गौरव आणणे. आज लाखो लोक देवाच्या चांगुलपणाविषयी त्याची स्तुती करण्याद्वारे हेच करत आहेत. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेविले आहे, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे.” यहोवाचे निष्ठावान साक्षीदार या नात्याने आपण स्तोत्रकर्त्याशी पूर्णपणे सहमत आहोत.—स्तोत्र ३१:१९.
२, ३. शिष्य बनवण्याच्या कार्यासोबत जर आपले आचरण चांगले नसेल तर काय घडू शकते?
२ यहोवाबद्दल असलेले श्रद्धायुक्त भय आपल्याला त्याच्या चांगुलपणाविषयी त्याची स्तुती करण्यास प्रेरित करते. तसेच ते आपल्याला ‘परमेश्वराची स्तुति गाण्यास, त्याचा धन्यवाद करण्यास आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य मानवजातीस कळवण्यास’ देखील प्रेरित करते. (स्तोत्र १४५:१०-१३) म्हणूनच आपण राज्याच्या प्रचाराच्या कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात उत्साहाने सहभाग घेतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) अर्थात प्रचार करण्यासोबतच आपले आचरण देखील चांगले असले पाहिजे. नाहीतर कदाचित आपल्यामुळे यहोवाच्या नावावर ठपका येण्याची शक्यता आहे.
३ बरेच लोक आपण देवाची उपासना करतो असे म्हणतात पण त्यांचे आचरण त्याच्या प्रेरित वचनातील आदर्शांनुसार नसते. चांगले करण्याचा दावा करून त्याप्रमाणे न वागणाऱ्या काही लोकांबद्दल प्रेषित पौलाने असे लिहिले: “दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय? . . . ‘तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे शास्त्रात लिहिलेले आहे.”—रोमकर २:२१, २२, २४.
४. आपल्या चांगल्या आचरणामुळे कोणता चांगला परिणाम घडून येतो?
४ यहोवाच्या नावावर अप्रतिष्ठा आणण्याऐवजी आपण आपल्या चांगल्या आचरणाने त्याला गौरव आणण्याचा प्रयत्न करतो. यामुळे ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्या लोकांवर चांगला प्रभाव पडतो. एक तर यामुळे आपला विरोध करणाऱ्यांचे आपण तोंड बंद करू शकतो. (१ पेत्र २:१५) पण अधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या चांगल्या आचरणामुळे लोक यहोवाच्या संघटनेकडे आकर्षित होतात आणि यामुळे त्यांना देखील यहोवाचे गौरव करण्याची व सार्वकालिक जीवन उपभोगण्याची संधी मिळते.—प्रेषितांची कृत्ये १३:४८.
५. आता आपण कोणते प्रश्न विचारात घेतले पाहिजेत?
५ आपण अपरिपूर्ण असल्यामुळे, यहोवाचा अनादर होईल आणि सत्य शोधणाऱ्यांना अडखळण ठरेल अशाप्रकारचे आचरण आपण कसे टाळू शकतो? दुसऱ्या शब्दांत, आपण चांगुलपणाने वागण्यात कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो?
प्रकाशाचे फळ
६. ‘अंधाराच्या निष्फळ कर्मांपैकी’ काही कोणती आहेत पण ख्रिस्ती लोकांमध्ये कोणते फळ दिसून आले पाहिजे?
६ समर्पित ख्रिस्ती या नात्याने, आपल्याजवळ असे काहीतरी आहे ज्यामुळे आपल्याला ‘अंधाराची निष्फळ कर्मे’ इफिसकर ४:२५, २८, ३१; ५:३, ४, ११, १२, १८) अशा कामांत स्वतःला गुंतवण्याऐवजी आपण ‘प्रकाशाच्या प्रजेसारखे चालतो.’ प्रेषित पौल म्हणतो, “प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.” (इफिसकर ५:८, ९) त्याअर्थी प्रकाशात चालण्याद्वारेच आपण सतत चांगुलपणाने वागू शकतो. पण हा कशाप्रकारचा प्रकाश आहे?
टाळण्यास मदत मिळते. या निष्फळ कर्मांत, खोटे बोलणे, चोरी, दुर्भाषण, लैंगिक विषयांवर अनुचित चर्चा, घृणित आचरण, असभ्य विनोद आणि मद्याचे अतिसेवन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. (७. चांगुलपणाचे फळ आपल्या वागण्यातून सतत दिसावे म्हणून आपण काय केले पाहिजे?
७ आपण अपरिपूर्ण असलो तरीसुद्धा, जर आपण आध्यात्मिक प्रकाशात चालत राहिलो तर चांगुलपणाने वागू शकू. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” (स्तोत्र ११९:१०५) जर आपण ‘प्रकाशाचे फळ सर्व प्रकारच्या चांगुलपणासह’ दाखवू इच्छितो तर मग देवाच्या वचनात सापडणाऱ्या, ख्रिस्ती प्रकाशनांत लक्षपूर्वक तपासल्या जाणाऱ्या आणि आपल्या उपासनेच्या सभांमध्ये नियमितरित्या चर्चिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक प्रकाशाचा सातत्याने फायदा उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (लूक १२:४२; रोमकर १५:४; इब्री लोकांस १०:२४, २५) “जगाचा प्रकाश” व “[यहोवाच्या] गौरवाचे तेज,” असणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या आदर्शाकडे व शिकवणुकींकडेही आपण विशेष लक्ष दिले पाहिजे.—योहान ८:१२; इब्री लोकांस १:१-३.
आत्म्याचे फळ
८. चांगुलपणा दाखवणे का शक्य आहे?
८ आध्यात्मिक प्रकाश निश्चितच आपल्याला चांगुलपणाने वागण्यास मदत करतो. पण त्यासोबतच आपण हा गुण दाखवू शकतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचे, अर्थात त्याच्या कार्यकारी शक्तीचे मार्गदर्शन लाभले आहे. चांगुलपणाचा “आत्म्याच्या फळात” समावेश आहे. (गलतीकर ५:२२, २३) जर आपण यहोवाच्या पवित्र आत्म्याचे हे मार्गदर्शन स्वीकारले तर त्याचा आत्मा आपल्यामध्ये चांगुलपणाचे अद्भुत फळ उत्पन्न करेल.
९. लूक ११:९-१३ येथे दिलेल्या येशूच्या शब्दांनुसार आपण कसे वागू शकतो?
९ चांगुलपणा हे आत्म्याचे फळ आपल्या वागण्यातून प्रकट करण्याद्वारे यहोवाला संतुष्ट करण्याची उत्कट इच्छा जर आपल्याला असेल तर तिने आपल्याला येशूच्या पुढील शब्दांप्रमाणे वागण्यास प्रेरित केले पाहिजे: “मागत राहा, म्हणजे तुम्हाला दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; ठोठावत राहा म्हणजे तुमच्याकरता उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही [अपरिपूर्ण आणि म्हणून तुलनात्मकरित्या] वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:९-१३, NW) यहोवाच्या आत्म्याकरता प्रार्थना करण्याद्वारे आपण येशूच्या सल्ल्याचे पालन करूया जेणेकरून आपल्या वागण्यातून चांगुलपणाचे फळ दाखवत राहणे आपल्याला शक्य होईल.
“चांगले ते करत राहा”
१०. निर्गम ३४:६, ७ येथे यहोवाच्या चांगुलपणाच्या कोणत्या पैलूंविषयी उल्लेख केला आहे?
१० देवाच्या वचनातील आध्यात्मिक प्रकाश आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपण ‘चांगले ते करत राहू शकतो.’ (रोमकर १३:३, NW) नियमित बायबल अभ्यासाद्वारे आपण यहोवाच्या चांगुलपणाचे अधिकाधिक अनुकरण करायला शिकतो. याआधीच्या लेखात निर्गम ३४:६, ७ (पं.र.भा.) येथे मोशेने ऐकलेल्या घोषणेतील देवाच्या चांगुलपणाच्या विविध पैलूंबद्दल आपण पाहिले. त्या वचनात आपण असे वाचतो: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, आणि प्रेमदया व सत्य यात उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे, आणि तो दोष्यांस निर्दोष ठरवणारच नाही.” यहोवाच्या चांगुलपणाच्या या प्रत्ययांकडे जवळून पाहिल्यास आपल्याला ‘चांगले ते करत राहण्यास’ मदत मिळेल.
११. यहोवा दयाळू व कृपाळू आहे हे जाणल्यामुळे आपल्यावर याचा कसा परिणाम झाला पाहिजे?
११ देवाने स्वतः केलेली ही घोषणा आपल्याला दयाळू व कृपाळू असण्याद्वारे यहोवाचे अनुकरण करणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून देते. येशूने म्हटले, “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.” (मत्तय ५:७; लूक ६:३६) यहोवा कृपाळू आहे हे लक्षात घेतल्यावर आपल्याला इतरांसोबत, तसेच ज्यांना आपण प्रचार करतो त्या सर्वांसोबतही आपल्या सर्व व्यवहारांत कृपाळूपणे व प्रेमळपणे वागण्याची प्रेरणा मिळते. हे पौलाच्या पुढील सल्ल्याशी सुसंगत आहे: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सैकर ४:६.
१२. (अ) देव मंदक्रोध आहे, त्याअर्थी आपण इतरांसोबत कशाप्रकारे वागले पाहिजे? (ब) यहोवाची प्रेमदया आपल्याला काय करण्यास प्रेरित करते?
१२ देव मंद्रक्रोध आहे. त्याअर्थी जर आपलीही ‘चांगले ते करत राहण्याची’ इच्छा असेल तर आपण सहविश्वासू बांधवांच्या लहानमोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या चांगल्या गुणांवर अधिक लक्ष देण्यास प्रवृत्त होऊ. (मत्तय ७:५; याकोब १:१९) यहोवाची प्रेमदया आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीतही एकनिष्ठ प्रीती प्रदर्शित करण्यास मदत करते. आणि हे निश्चितच प्रशंसनीय आहे.—नीतिसूत्रे १९:२२, पं.र.भा.
१३. यहोवा ‘सत्यात उदंड’ आहे हे आपल्या वागणुकीतून कशाप्रकारे प्रकट होऊ शकेल?
१३ आपला स्वर्गीय पिता ‘सत्यात उदंड’ असल्यामुळे आपणही ‘सत्याच्या वचनाने देवाचे सेवक म्हणून आपली लायकी पटवून देण्याचा’ प्रयत्न करतो. (२ करिंथकर ६:३-७) यहोवाला वीट आणणाऱ्या सात गोष्टींत “लबाड बोलणारी जिव्हा” व “लबाड बोलणारा खोटा साक्षी” यांचा समावेश आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९) त्यामुळे देवाला संतुष्ट करण्याच्या इच्छेने आपल्याला ‘लबाडी सोडून देऊन खरे बोलण्यास’ प्रवृत्त केले आहे. (इफिसकर ४:२५) या महत्त्वपूर्ण मार्गाने चांगुलपणा दाखवण्यात आपण कधीही चुकू नये.
१४. आपण क्षमाशील का असले पाहिजे?
१४ देवाने मोशेला केलेल्या घोषणेमुळे आपल्याला क्षमाशील असण्याचीही प्रेरणा मिळाली पाहिजे कारण यहोवा क्षमा करणारा आहे. (मत्तय ६:१४, १५) अर्थात, पश्चात्ताप न करणाऱ्यांना यहोवा शिक्षा देतो. म्हणूनच मंडळीची आध्यात्मिक शुद्धता कायम राखण्याच्या बाबतीत आपण यहोवाच्या चांगुलपणाच्या आदर्शांचे समर्थन केले पाहिजे.—लेवीय ५:१; १ करिंथकर ५:११, १२; १ तीमथ्य ५:२२.
‘सभोवार नजर ठेवा’
१५, १६. इफिसकर ५:१५-१९ येथे दिलेला पौलाचा सल्ला आपल्याला सतत चांगुलपणाने वागण्यास कशी मदत करू शकतो?
१५ आपल्याभोवती कितीतरी वाईट गोष्टी दिसत असताना सतत चांगुलपणाने वागण्यासाठी आपण देवाच्या आत्म्याने भरून जाऊन, जपून चालले पाहिजे. म्हणूनच इफिसकर ५:१५-१९) या कठीण शेवटल्या दिवसांत हा सल्ला निश्चितच आपल्याकरता अगदी यथायोग्य आहे.—२ तीमथ्य ३:१.
पौलाने इफिसस येथील ख्रिस्ती बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा.” (१६ चांगुलपणाने वागत राहण्यासाठी आपण देवाच्या बुद्धीनुसार चालणाऱ्यांप्रमाणे चालत आहोत किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. (याकोब ३:१७) आपण गंभीर पाप करण्याचे टाळले पाहिजे आणि आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. (गलतीकर ५:१९-२५) ख्रिस्ती सभा, संमेलने, अधिवेशने यांत मिळणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणाचे पालन करण्याद्वारे आपण चांगले ते करत राहू शकतो. इफिसकरांना पौलाने लिहिलेले शब्द आपल्याला याचीही आठवण करून देतात की आपण उपासनेकरता एकत्र येतो तेव्हा आपल्या ‘आध्यात्मिक गायनानेही’ बराच फायदा होतो; यातील बरीच गीते चांगुलपणासारख्याच आध्यात्मिक गुणांवर आधारित आहेत.
१७. गंभीर आजारपणात असलेल्या ख्रिस्ती बांधवांना सभांना नियमित येणे शक्य नसले तरीसुद्धा ते कशाची खात्री बाळगू शकतात?
१७ गंभीर आजारपणामुळे जे आपले बांधव ख्रिस्ती सभांना नियमित येऊ शकत नाहीत त्यांच्याविषयी काय? आपल्या आध्यात्मिक बंधू व भगिनींसोबत मिळून ते यहोवाची उपासना करू शकत नसल्यामुळे त्यांना अगदी हताश वाटत असेल. पण यहोवा त्यांची परिस्थिती समजू शकतो याची त्यांनी खात्री बाळगावी; तो त्यांना प्रकाशात ठेवून आपला पवित्र आत्मा देईल आणि चांगले ते करत राहण्यास त्यांना साहाय्य करेल याविषयीही त्यांनी आश्वस्त राहावे.—यशया ५७:१५.
१८. चांगले ते करत राहण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
१८ सतत चांगुलपणाने वागण्याकरता आपण कोणाशी संगती करतो याकडे लक्ष देणे आणि ‘चांगल्याविषयी प्रेम न बाळगणाऱ्यांपासून’ दूर राहणे आवश्यक आहे. (२ तीमथ्य ३:२-५; १ करिंथकर १५:३३) या सल्ल्याचे पालन केल्यामुळे, पवित्र आत्म्याच्या सूचनांच्या विरोधात जाऊन त्याला ‘खिन्न करण्याचे’ आपण टाळू शकतो. (इफिसकर ४:३०) तसेच ज्यांच्या जीवनाकडे पाहून ते चांगुलपणाचे चाहते आहेत आणि यहोवाच्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शित आहेत हे दिसून येते अशा बांधवांशी घनिष्ट संबंध जोडल्यामुळेही आपल्याला चांगले ते करण्यास मदत मिळते.—आमोस ५:१५; रोमकर ८:१४; गलतीकर ५:१८.
चांगुलपणाचे उत्तम परिणाम
१९-२१. चांगुलपणा दाखवण्यामुळे होणाऱ्या उत्तम परिणामांची काही उदाहरणे द्या.
१९ आध्यात्मिक प्रकाशात चालणे, देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारणे आणि सभोवार नजर ठेवून आपण कसे चालत आहोत याकडे लक्ष देण्याद्वारे आपल्याला वाईट गोष्टी टाळून ‘चांगले ते करत राहण्यास’ मदत मिळेल. यामुळे अनेक उत्तम परिणाम घडून येतील. दक्षिण आफ्रिकेतील झाँगझीले याचा अनुभव पाहा. एकदा सकाळी शाळेत जाताना त्याने बँकेत थांबून आपल्या खात्यात किती रक्कम आहे हे पाहिले. तसे त्याच्या खात्यात फारसे पैसे नव्हतेच. पण खात्यात किती पैसे शिल्लक आहेत हे सांगणाऱ्या ऑटोमॅटिक मशीनने त्याच्या खात्यात ४२,००० रॅन्ड्स (२,७०,००० रूपये) जास्तीचे दाखवले. बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने व इतरांनीही त्याला हे पैसे बँकेतून काढून आपल्या नावाने दुसऱ्या बँकेत ठेवण्याचा सल्ला दिला. केवळ तो ज्या साक्षीदार जोडप्यासोबत राहात होता त्यांनीच त्याला ते पैसे बँकेतून न काढल्याबद्दल शाबासकी दिली.
२० दुसऱ्या दिवशी, झाँगझीलेने बँकेची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. एका श्रीमंत उद्योगपतीच्या खात्याचा क्रमांकही जवळजवळ सारखाच असल्यामुळे त्याने चुकून झाँगझीलेच्या खात्यात पैसे जमा केले होते असे उघडकीस आले. झाँगझीलेने त्या रकमेतील एकही पैसा खर्च केला नव्हता याचे त्या उद्योगपतीला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला विचारले: “तुझा धर्म कोणता?” झाँगझीलेने आपण यहोवाच्या साक्षीदारांपैकी असल्याचे सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी झाँगझीलेचे खूप कौतुक केले आणि म्हटले: “सर्व लोक यहोवाच्या साक्षीदारांइतकेच प्रामाणिक असते तर किती बरे झाले असते!” खरोखर प्रामाणिकतेची व चांगुलपणाची अशी कृत्ये इतरांनाही यहोवाचे गौरव करण्यास प्रवृत्त करतात.—इब्री लोकांस १३:१८.
२१ पण अगदी असामान्य घटना घडल्यावरच चांगुलपणाचे उत्तम परिणाम घडून येतात असे नाही. उदाहरणार्थ: सामोआ बेटांवर राहणाऱ्या व पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्या एका तरुण साक्षीदाराला एकदा इस्पितळात जावे लागले. तेथे अनेक लोक
डॉक्टरांना भेटायला थांबले होते. साक्षीदार बांधवाने पाहिले की त्याच्या बाजूला बसलेली एक वृद्ध महिला खूपच आजारी होती. त्याची पाळी आली तेव्हा त्या वृद्ध महिलेला आधी डॉक्टरांनी तपासावे आणि काही औषध द्यावे म्हणून त्याने तिला जाऊ दिले. काही काळानंतर त्या साक्षीदाराला तीच वृद्ध महिला बाजारात भेटली. त्या दिवशी इस्पितळात त्याने केलेले चांगले कृत्य ती विसरलेली नव्हती. ती म्हणाली: “यहोवाचे साक्षीदार खरोखरच आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करतात हे मला पटले आहे.” पूर्वी या महिलेने राज्य संदेशाला कधीही प्रतिसाद दिला नव्हता, पण या साक्षीदाराच्या चांगल्या वागणुकीमुळे उत्तम परिणाम घडून आला. तिने बायबल अभ्यासाचा प्रस्ताव स्वीकारला आणि ती देवाच्या वचनाचे ज्ञान घेऊ लागली.२२. ‘चांगले ते करत राहण्याचा’ एक महत्त्वपूर्ण मार्ग कोणता?
२२ कदाचित तुमच्याकडेही चांगुलपणामुळे झालेल्या उत्तम परिणामांचे काही अनुभव असतील. ‘चांगले ते करत राहण्याचा’ एक अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणजे देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात नियमित सहभाग घेणे. (मत्तय २४:१४) या महत्त्वाच्या कार्यात आपण आवेशी सहभाग घेत राहू या कारण हा चांगले ते करण्याचा एक मार्ग आहे. खासकरून जे या संदेशाला प्रतिसाद देतात त्यांचे यामुळे भले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सेवाकार्याद्वारे आणि चांगल्या वागणुकीद्वारे यहोवाचे अर्थात चांगुलपणाच्या मूळ स्रोताचे गौरव होते.—मत्तय १९:१६, १७.
सतत “बरे करावे”
२३. ख्रिस्ती सेवाकार्य एक चांगले कार्य का आहे?
२३ आपले सेवाकार्य हे निश्चितच एक चांगले काम आहे. यामुळे आपलेच नव्हे तर बायबलचा संदेश ऐकून सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर येणाऱ्या लोकांचेही तारण होईल. (मत्तय ७:१३, १४; १ तीमथ्य ४:१६) आपल्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा चांगले करण्याची इच्छा, आपल्या स्वतःला हे विचारण्यास प्रवृत्त करील की ‘या निर्णयामुळे माझ्या राज्य प्रचाराच्या कार्यावर कशाप्रकारे परिणाम होईल? मी ज्या मार्गावर जाण्याच्या विचारात आहे तो खरोखरच चांगला आहे का? हा निर्णय, इतरांना “सार्वकालिक सुवार्ता” स्वीकारण्यास आणि यहोवा देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करण्यास मला सहायक ठरेल का?’ (प्रकटीकरण १४:६) राज्याकरता अधिक कार्य करण्यास मदत करणारा निर्णय घेतल्यामुळे अतिशय आनंददायक परिणाम होतात.—मत्तय ६:३३; प्रेषितांची कृत्ये २०:३५.
२४, २५. मंडळीत चांगुलपणा दाखवण्याचे कोणते काही मार्ग आहेत आणि आपण चांगुलपणा दाखवत राहिल्यास कशाची खात्री बाळगू शकतो?
२४ चांगुलपणाच्या हितकारक परिणामांना आपण कधीही कमी लेखू नये. ख्रिस्ती मंडळीला आधार देण्याद्वारे आणि तिच्या हिताकरता व कल्याणाकरता आपल्याने जे काही होईल ते करण्याद्वारे आपण चांगुलपणाचा हा गुण नेहमी प्रदर्शित करू शकतो. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व त्यांत सहभाग घेणे हे निश्चितच चांगले आहे. कारण या सभांना केवळ उपस्थित राहण्याद्वारेही आपण सहविश्वासू बांधवांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि आपण चांगली तयारी करून दिलेली उत्तरे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला हातभार लावू शकतात. तसेच राज्य सभागृह सुस्थितीत ठेवण्याकरता जेव्हा आपण आर्थिक हातभार लावतो आणि त्याची काळजी घेण्यात आपले योगदान देतो तेव्हा देखील आपण चांगले करत असतो. (२ राजे २२:३-७; २ करिंथकर ९:६, ७) “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०.
२५ जेथे चांगुलपणा दाखवता येईल अशा प्रत्येक प्रसंगाचे आपण विवेचन करू शकत नाही. पण आपल्यासमोर जसजशी नवनवीन आव्हाने येतील तसतसे आपण शास्त्रवचनांतून मार्गदर्शन मिळवू, यहोवाच्या पवित्र आत्म्याकरता प्रार्थना करू आणि त्याची चांगली आणि परिपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करू. (रोमकर २:९, १०; १२:२) आपण याची खात्री बाळगू शकतो की आपण चांगुलपणाने वागत राहिल्यास यहोवा आपल्याला विपुल आशीर्वाद देईल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आपण करू शकतो असे सर्वात चांगले कार्य कोणते आहे?
• चांगुलपणाला ‘प्रकाशाचे फळ’ का म्हणण्यात आले आहे?
• चांगुलपणाला ‘आत्म्याचे फळ’ का म्हणण्यात आले आहे?
• आपल्या चांगल्या आचरणामुळे काय परिणाम घडून येतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चित्र]
देवाचे वचन आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्याला चांगुलपणा दाखवण्यास साहाय्य करतात
[१८ पानांवरील चित्रे]
चांगुलपणा दाखवल्याने अनेक उत्तम परिणाम घडून येतात