यहोवा–चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण
यहोवा–चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण
“सेनाधीश परमेश्वराची स्तुति असो, कारण परमेश्वर चांगला आहे.”—यिर्मया ३३:११.
१. आपण देवाच्या चांगुलपणाची स्तुती करण्यास का बरे प्रवृत्त होतो?
यहोवा देव अगदी परिपूर्ण अर्थाने चांगला आहे. संदेष्टा जखऱ्याने, “त्याचे चांगुलपण केवढे!” असे विस्मित होऊन म्हटले. (जखऱ्या ९:१७, पं.र.भा.) खरोखर, देवाने आपल्या आनंदाकरता ही पृथ्वी तयार करताना जे काही केले त्यातून त्याचे चांगुलपण दिसून येते. (उत्पत्ति १:३१) हे विश्व निर्माण करताना यहोवाने क्रियाशील केलेले सर्व गुंतागुंतीचे नैसर्गिक नियम आपण कधीही पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाही. (उपदेशक ३:११; ८:१७) पण आपल्याकडे असलेले मर्यादित ज्ञान देखील देवाच्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करण्यास आपल्याला प्रवृत्त करते.
२. तुम्ही चांगुलपणाची व्याख्या कशी कराल?
२ चांगुलपण म्हणजे काय? चांगुलपण म्हणजे नैतिक गुणवत्ता किंवा सद्गुणीपणा. पण वाईट नसणे म्हणजे चांगले असणे, इतकाच चांगुलपणाचा अर्थ नाही. चांगुलपणा हा पवित्र आत्म्याच्या फळात समाविष्ट आहे व तो आपल्या आचरणातून स्पष्टपणे दिसून येणारा गुण आहे. (गलतीकर ५:२२, २३) इतरांच्या भल्याकरता व फायद्याकरता कार्य करण्याद्वारे आपण चांगुलपणा दाखवतो. या व्यवस्थीकरणात काही लोक ज्या गोष्टीला चांगले समजतात तीच गोष्ट कदाचित इतर ठिकाणी वाईट समजली जाण्याची शक्यता आहे. पण जीवनात शांती व आनंद उपभोगण्याकरता चांगुलपणाचा एक निश्चित आदर्श असणे आवश्यक आहे. असा एक यथायोग्य आदर्श कोण पुरवू शकतो?
३. उत्पत्ति २:१६, १७ या वचनांत चांगुलपणाच्या आदर्शाविषयी काय सूचित करण्यात आले आहे?
३ देव हा चांगुलपणाचा आदर्श पुरवतो. मानवाच्या इतिहासाच्या सुरवातीला यहोवानेच पहिल्या मनुष्याला अशी उत्पत्ति २:१६, १७) होय, चांगल्यावाइटाच्या ज्ञानाकरता मानवांनी आपल्या निर्माणकर्त्याकडेच पाहिले पाहिजे.
आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (लायकी नसताना दाखवलेला चांगुलपणा
४. आदामाने पाप केल्यानंतर देवाने मानवजातीकरता काय केले?
४ आदामाने पाप करण्याद्वारे, चांगल्यावाईटाचा आदर्श घालून देण्याच्या देवाच्या अधिकाराला अमान्य केले तेव्हा मानवजात परिपूर्ण अवस्थेत सार्वकालिक आनंद उपभोगण्याची आशा गमावून बसली. (उत्पत्ति ३:१-६) पण आदामाचे संतान पाप व मृत्यूचा वारसा घेऊन जन्माला येण्याआधीच देवाने एक परिपूर्ण संतती येईल असे भाकीत केले. “जुनाट साप,” अर्थात, दियाबल सैतान याला उद्देशून बोलताना यहोवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ति ३:१५) पापी मानवजातीला सोडवण्याचा यहोवाचा संकल्प होता. त्यामुळे मानवजातीची लायकी नसताना यहोवाने त्यांना चांगुलपणा दाखवला व त्याच्या प्रिय पुत्राच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवून चालणाऱ्यांच्या तारणाकरता त्याने तरतूद केली.—मत्तय २०:२८; रोमकर ५:८, १२.
५. आपली उपजत मनोवृत्ती वाईट असली तरीसुद्धा आपण चांगुलपणाने का वागू शकतो?
५ अर्थात, आदामाच्या पापामुळे आपल्या सर्वांना वाईट गोष्टींकडे झुकण्याची उपजत मनोवृत्ती मिळाली आहे. (उत्पत्ति ८:२१) पण निराश होण्याची गरज नाही, कारण यहोवा आपल्याला चांगुलपणा दाखवण्यास मदत करतो. त्याच्या मोलवान पवित्र वचनांतून शिकलेल्या गोष्टींनुसार चालत राहिल्यामुळे, आपण ‘विश्वासाच्या द्वारे तारणासाठी ज्ञानी’ आणि “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” तर होतोच पण देवाच्या नजरेत जे चांगले ते करण्यासही आपण समर्थ होतो. (२ तीमथ्य ३:१४-१७) शास्त्रवचनांतील मार्गदर्शनाचा फायदा करून घेण्यासाठी आणि चांगुलपणाने वागण्यासाठी आपली मनोवृत्ती स्तोत्रकर्त्याप्रमाणे असावी ज्याने आपल्या भजनात असे म्हटले: “तू [यहोवा] चांगला आहेस, तू चांगले करितोस. तुझे नियम मला शिकीव.”—स्तोत्र ११९:६८.
यहोवाच्या चांगुलपणाचा गौरव
६. राजा दाविदाने कराराचा कोश जेरूसलेमला आणल्यानंतर लेवीय कोणता शब्दांश असलेले गीत गात असत?
६ प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदाने देवाचा चांगुलपणा मान्य केला आणि त्याच्याकडे मार्गदर्शनाची विनंती केली. दावीदाने म्हटले: “परमेश्वर उत्तम [चांगला] व सरळ आहे, म्हणून तो पातक्यास सन्मार्ग दाखवितो.” (स्तोत्र २५:८) इस्राएल लोकांना देवाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शनात दहा महत्त्वाच्या नियमांचा समावेश होता—अर्थात दहा आज्ञा. या दगडाच्या दोन पाट्यांवर लिहिल्या होत्या आणि कराराचा कोश म्हटलेल्या एका पवित्र पेटीत ठेवल्या जात असत. दाविदाने हा कराराचा कोश इस्राएलची राजधानी जेरूसलेम येथे आणला तेव्हा लेवीयांनी एक गीत गायिले ज्याचे बोल पुढीलप्रमाणे होते: “परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.” (१ इतिहास १६:३४, ३७-४१) ते शब्द लेवीय गायकांच्या तोंडून ऐकणे किती आनंददायक असेल!
७. कराराचा कोश परमपवित्रस्थानात आणल्यानंतर आणि शलमोनाने समर्पणाची प्रार्थना केल्यानंतर काय घडले?
७ दाविदाचा पुत्र शलमोन याने बांधलेले यहोवाचे मंदिर समर्पित करण्यात आले त्याप्रसंगी देखील याच शब्दांवर जोर देण्यात आला. नवीन मंदिराच्या परमपवित्र स्थानात कराराचा कोश ठेवण्यात आल्यानंतर लेवीयांनी यहोवाची असे म्हणून स्तुती करण्यास प्रारंभ केला की “तो उत्तम आहे, त्याची दया [“प्रेमदया,” NW] सनातन आहे.” तेव्हा २ इतिहास ५:१३, १४) शलमोनाने समर्पणाची प्रार्थना केल्यानंतर, “स्वर्गातून अग्नीने येऊन होमबलि व यज्ञबलि भस्म केले.” हे सर्व पाहून, ‘सर्व इस्राएल लोकांनी जमिनीवरल्या फरसबंदीपर्यंत आपली मुखे लववून नमन केले आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया [“प्रेमदया”] सनातन आहे असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले.’ (२ इतिहास ७:१-३) १४ दिवसांच्या सणानंतर, इस्राएल लोक आपापल्या घरी परतले; “परमेश्वराने दाविदावर, शलमोनावर व आपल्या इस्राएल प्रजेवर जी कृपा केली होती तीमुळे ते आनंदित, हर्षितचित्त झाले होते.”—२ इतिहास ७:१०.
मंदिर यहोवाच्या तेजाचे प्रतीक असलेल्या ढगाने भरून गेले. (८, ९. (अ) इस्राएल लोकांनी यहोवाच्या चांगुलपणाची स्तुती केली तरीसुद्धा शेवटी ते कोणत्या मार्गाने चालले? (ब) यिर्मयाद्वारे जेरूसलेमविषयी काय भाकीत करण्यात आले आणि ही भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली?
८ दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएली लोक देवाच्या स्तुतीकरता गीत गायचे, पण त्यानुसार ते वागले नाहीत. कालांतराने यहुदाचे लोक केवळ ‘आपल्या तोंडच्या शब्दांनी यहोवाचा सन्मान करू लागले.’ (यशया २९:१३) चांगुलपणाच्या संदर्भात देवाच्या आदर्शांना जडून राहण्याऐवजी ते वाईट गोष्टी करू लागले. कोणत्या प्रकारच्या वाईट गोष्टी? मूर्तिपूजा, अनैतिकता, गोरगरिबांचा छळ, आणि इतर भयंकर पाप देखील ते करत होते! यामुळे जेरूसलेमचा नाश करण्यात आला आणि यहुदाच्या रहिवाशांना सा.यु.पू. ६०७ साली बंदिवान करून बॅबिलोनला नेण्यात आले.
९ अशा रितीने देवाने आपल्या लोकांना शिक्षा दिली. पण संदेष्टा यिर्मया याच्या माध्यमाने त्याने असे भाकीत केले की जेरूसलेममध्ये पुन्हा एकदा असे म्हणणाऱ्यांचा आवाज ऐकू येईल: “सेनाधीश परमेश्वराची स्तुति असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया [“प्रेमदया”] सर्वकाळची आहे.” (यिर्मया ३३:१०, ११) आणि असेच घडले. ७० वर्षे देश ओसाड राहिल्यानंतर सा.यु.पू. ५३७ साली यहुदी शेषजन जेरूसलेमला परतले. (यिर्मया २५:११; दानीएल ९:१, २) त्यांनी मंदिर होते त्या ठिकाणी, अर्थात मोरिया डोंगरावर वेदीची पुनर्बांधणी केली आणि तेथे बलिदान वाहण्यास सुरवात केली. बंदिवासातून परतल्यानंतर दुसऱ्या वर्षी मंदिराचा पाया घालण्यात आला. तो किती उत्साही काळ असावा! एज्राने वर्णन केल्याप्रमाणे, “बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोषाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी यांस उभे केले. ‘परमेश्वर चांगला आहे व इस्राएलांवर त्याची दया [“प्रेमदया”] सनातन आहे’ असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुति व धन्यवाद आळीपाळीने केला.”—एज्रा ३:१-११
१०. स्तोत्र ११८ कोणत्या अर्थपूर्ण शब्दांनी सुरू होते व संपते?
१० यहोवाच्या चांगुलपणाविषयी अशाचप्रकारचे प्रशंसात्मक उद्गार स्तोत्रसंहितेतही अनेकदा आढळतात. एक उदाहरण म्हणजे स्तोत्र ११८. वल्हांडण सणाच्या शेवटी इस्राएल घराणी हे स्तोत्र गात असत. या स्तोत्राची सुरवात आणि शेवट पुढील शब्दांनी होतो: “परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया [“प्रेमदया”] सनातन आहे.” (स्तोत्र ११८:१, २९) सा.यु. ३३ साली येशूने आपला मृत्यू होण्याआधी विश्वासू प्रेषितांसोबत गायिलेले कदाचित हेच स्तुतीपर शेवटले शब्द असावेत.—मत्तय २६:३०.
“कृपा करून मला तुझे तेज दाखीव”
११, १२. मोशेला देवाच्या तेजाची झलक मिळाली तेव्हा त्याने कोणती घोषणा ऐकली?
११ यहोवाच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या प्रेमदयेचा संबंध पहिल्यांदा, एज्राच्या काळाआधी कित्येक शतकांपूर्वीच लावण्यात आला होता. अरण्यात इस्राएल लोकांनी सोनेरी वासराची उपासना केल्यावर व पातक्यांना मरणदंड देण्यात आल्यानंतर मोशेने यहोवाला अशी विनंती केली की “कृपा करून मला तुझे तेज दाखीव.” मोशे आपला चेहरा पाहून जिवंत राहू शकणार नाही हे जाणून यहोवाने म्हटले: “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन.”—निर्गम ३३:१३-२०.
१२ दुसऱ्या दिवशी सीनाय पर्वतावर यहोवाचे चांगुलपण मोशेपुढे प्रकट झाले. त्याप्रसंगी त्याला देवाच्या तेजाची झलक मिळाली आणि ही घोषणा ऐकायला मिळाली: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, आणि प्रेमदया व सत्य यात उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे, आणि तो दोष्यांस निर्दोष ठरवणारच नाही, तर तो बापांच्या अन्यायाचे शासन लेकरांवर व लेकरांच्या लेकरांवर, तिसऱ्या व चवथ्या पिढीवरही घालणारा आहे.” (निर्गम ३४:६, ७, पं.र.भा.) या शब्दांवरून दिसून येते की यहोवाचा चांगुलपणा त्याच्या प्रेमदयेशी व त्याच्या व्यक्तिमत्त्वातील इतर गुणांशीही संबंधित आहे. यांवर विचार केल्यामुळे आपल्यालाही चांगुलपणाने वागण्यास मदत होईल. देवाच्या चांगुलपणाविषयीच्या या अद्भुत घोषणेत दोनदा उल्लेख करण्यात आलेल्या गुणाचा आपण आधी विचार करू या.
‘प्रेमदयेत उदंड असणारा देव’
१३. देवाच्या चांगुलपणाविषयीच्या घोषणेत कोणत्या गुणाचा दोन वेळा उल्लेख केला आहे आणि हे उचित का आहे?
१३ ‘यहोवा, प्रेमदयेत उदंड, हजारोंवर दया करणारा आहे.’ “प्रेमदया” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “एकनिष्ठ प्रीती” असाही होतो. देवाने मोशेला केलेल्या घोषणेत हा एकच असा गुण आहे ज्याचा दोनदा उल्लेख केलेला आढळतो. आणि हे योग्यच आहे कारण यहोवाचा प्रमुख गुण प्रीती आहे. (१ योहान ४:८) यहोवाच्या गौरवाकरता गायिले जाणारे सुपरिचित स्तुतिपद, अर्थात “तो चांगला आहे, कारण त्याची प्रेमदया सनातन आहे” यात देखील त्याच्या याच गुणावर भर दिला आहे.
१४. देवाचा चांगुलपणा व प्रेमदया खासकरून कोण अनुभवू शकतात?
१ पेत्र ५:६, ७) यहोवाचे साक्षीदार स्वानुभवाने हे सांगू शकतात की जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याची सेवा करतात त्यांना तो ‘प्रेमदया दाखवतो.’ (निर्गम २०:६) नैसर्गिक इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या पुत्राचा अव्हेर केल्यामुळे त्यांना त्याची प्रेमदया किंवा एकनिष्ठ प्रीती पुढे अनुभवायला मिळाली नाही. पण सर्व राष्ट्रांच्या विश्वासू ख्रिस्ती जनांप्रती देवाचा चांगुलपणा व एकनिष्ठ प्रीती कायम टिकून राहील.—योहान ३:३६.
१४ यहोवाची ‘प्रेमदया उदंड’ आहे हा त्याच्या चांगुलपणाचाच एक पुरावा आहे. तो आपल्या समर्पित विश्वासू मानवी सेवकांची ज्याप्रकारे कोमलतेने काळजी घेतो त्यातून हे विशेषतः दिसून येते. (यहोवा—दयाळू व कृपाळू देव
१५. (अ) मोशेने सीनाय पर्वतावर ऐकलेल्या घोषणेच्या सुरवातीला कोणते पद आढळते? (ब) दया दाखवण्यात कशाचा समावेश आहे?
१५ मोशेने सीनाय पर्वतावर ऐकलेल्या घोषणेच्या सुरवातीला हे पद आढळते: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव.” “दया” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा संबंध “आंतड्यांशी” असून “उदर” या शब्दाशीही त्याचा जवळचा संबंध आहे. त्याअर्थी, दया ही एखाद्या व्यक्तीच्या अगदी आतल्या कोमल सहानुभूतीशील भावनांशी संबंधित आहे. पण केवळ कणव असणे म्हणजे दया नव्हे. तिने आपल्याला इतरांचे दुःख दूर करण्यासाठी काहीतरी हालचाल करण्यास प्रेरित केले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रेमळ ख्रिस्ती वडील सह उपासकांप्रती दयाळू असण्याचे व जेथे योग्य तेथे ‘संतोषाने दया करण्याचे’ महत्त्व ओळखतात.—रोमकर १२:८; याकोब २:१३; यहूदा २२, २३.
१६. यहोवा कृपाळू आहे असे का म्हटले जाऊ शकते?
१६ देवाचा चांगुलपणा त्याच्या कृपाळूपणातूनही दिसून येतो. कृपाळू व्यक्ती “इतरांच्या भावनांची खास दखल घेते” आणि ‘खासकरून आपल्यापेक्षा दर्जाने लहान असलेल्यांशी प्रेमळपणे वागते.’ आपल्या विश्वासू सेवकांशी व्यवहार करताना कृपाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. उदाहरणार्थ त्याने आपल्या देवदूतांच्या माध्यमाने वयोवृद्ध संदेष्टा दानीएल याला धैर्य दिले आणि कुमारी मरियेला येशूला जन्म देण्याचा विशेष सुहक्क प्राप्त होणार असल्याचे तिला कळवले. (दानीएल १०:१९; लूक १:२६-३८) यहोवाचे लोक या नात्याने आपल्याला तो बायबलच्या वचनांतून प्रोत्साहन देतो याकरता आपण निश्चितच कृतज्ञ आहोत. याप्रकारे तो आपला चांगुलपणा दाखवत असल्यामुळे आपण त्याची स्तुती करतो आणि इतरांसोबत व्यवहार करताना आपण देखील कृपाळूपणे वागण्याचा प्रयत्न करतो. आध्यात्मिक योग्यता असलेले बांधव “सौम्य वृत्तीने” एखाद्या सहविश्वासू बांधवाची चूक सुधारतात तेव्हा ते देखील कोमलतेने व कृपाळूपणे वागण्याचा प्रयत्न करतात.—गलतीकर ६:१.
मंदक्रोध देव
१७. यहोवा “मंदक्रोध” आहे याबद्दल आपण कृतज्ञ का आहोत?
१७ ‘यहोवा मंदक्रोध आहे.’ हे शब्द यहोवाच्या चांगुलपणाच्या आणखी एका पैलूकडे लक्ष वेधतात. आपल्यात अनेक उणिवा असूनही यहोवा आपल्याविषयी धीर धरतो आणि काही गंभीर कमतरता आपल्यात असल्यास तो आपल्याला त्यांवर मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी वेळ देतो. (इब्री लोकांस ५:१२-६:३; याकोब ५:१४, १५) जे अद्याप देवाचे उपासक बनलेले नाहीत अशा लोकांनाही देवाच्या धीर धरण्यामुळे फायदा होतो. देवाच्या राज्याचा संदेश ऐकून पश्चात्ताप करण्यासाठी त्यांच्याकडे अद्यापही अवधी आहे. (रोमकर २:४) यहोवा धीर धरतो हे खरे आहे, पण काही वेळा त्याचा चांगुलपणा त्याला स्वतःचा क्रोध व्यक्त करण्यासही प्रेरित करतो. सीनाय पर्वतावर इस्राएल लोकांनी सोनेरी वासराची उपासना केली तेव्हा त्याने आपला क्रोध प्रकट केला. लवकरच, देव सैतानाच्या या दुष्ट व्यवस्थेचा नाश करेल तेव्हा देवाचा क्रोध आणखी मोठ्या प्रमाणात प्रकट केला जाईल.—यहेज्केल ३८:१९, २१-२३.
१८. सत्याच्या बाबतीत यहोवा आणि मानवी पुढारी यांत कोणता फरक आहे?
१८ ‘यहोवा सत्यात उदंड आहे.’ मोठमोठी आश्वासने देऊन ती पूर्ण न करणाऱ्या मानवी पुढाऱ्यांपेक्षा यहोवा किती वेगळा आहे! त्याचे उपासक त्याच्या प्रेरित वचनातील सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू शकतात. देव सत्यात उदंड असल्यामुळे आपण नेहमी त्याच्या प्रतिज्ञांवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. आपल्या स्वर्गीय पित्याच्या चांगुलपणामुळेच तो आध्यात्मिक सत्याकरता केलेल्या आपल्या प्रार्थनांचे खात्रीने उत्तर देतो आणि विपुल प्रमाणात हे आध्यात्मिक सत्य आपल्याला पुरवतो.—स्तोत्र ४३:३; ६५:२.
१९. यहोवाने पश्चात्ताप करणाऱ्या पातक्यांप्रती कोणत्या उल्लेखनीय मार्गाने चांगुलपणा दाखवला आहे?
१ योहान २:१, २) जे कोणी खंडणीवर विश्वास ठेवतात ते यहोवासोबत एक कृपायुक्त नातेसंबंध उपभोगू शकतात आणि त्याने प्रतिज्ञा केलेल्या नवीन जगात सर्वकाळ राहण्याचीही त्यांना आशा मिळेल याबद्दल आपल्याला आनंद वाटतो. मानवजातीप्रती चांगुलपणा दाखवण्याबद्दल यहोवाची स्तुती करण्याची ही खरोखरच उल्लेखनीय कारणे नाहीत का?—२ पेत्र ३:१३.
१९ “यहोवा . . . अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे.” यहोवा चांगला असल्यामुळे पश्चात्ताप करणाऱ्या पातक्यांना क्षमा करण्यास तो तयार असतो. येशूच्या बलिदानाच्या माध्यमाने आपल्या पापांची क्षमा मिळण्याची तरतूद आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने केली याबद्दल आपण निश्चितच अतिशय कृतज्ञ आहोत. (२०. देव वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही याचा कोणता पुरावा आपल्याकडे आहे?
२० ‘यहोवा दोष्यांस निर्दोष ठरवणार नाही.’ यहोवाच्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करण्याचे हे आणखी एक कारण आहे. का? कारण त्याच्या चांगुलपणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तो वाईट गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. शिवाय, “प्रभु येशू . . . आपल्या सामर्थ्यवान् दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.” “युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) बचावणारे यहोवाचे उपासक यानंतर ‘चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणाऱ्या’ अधार्मिक मनुष्यांना न घाबरता जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकतील.—२ तीमथ्य ३:१-३.
यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करा
२१. आपण चांगुलपणाने का वागले पाहिजे?
२१ यहोवाच्या चांगुलपणाबद्दल त्याची उपकारस्तुती करण्याची कित्येक कारणे आपल्याकडे आहेत. त्याचे सेवक या नात्याने आपण त्याच्या या गुणाचे अनुकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न करू नये का? निश्चितच, कारण प्रेषित पौलाने सह ख्रिस्ती बांधवांना असे आर्जवले: “देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) आपला स्वर्गीय पिता नेहमी चांगुलपणाने वागतो आणि आपणही असेच केले पाहिजे.
२२. पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
२२ यहोवाला पूर्ण मनाने समर्पण केले असल्यामुळे निश्चितच त्याच्या चांगुलपणाचे अनुकरण करण्याची आपली मनस्वी इच्छा आहे. पण आपण आदामाचे वंशज असल्यामुळे चांगले करणे आपल्याला नेहमी सोपे जात नाही. पुढील लेखात आपण पाहणार आहोत की चांगुलपणाने वागणे आपल्याकरता अशक्य का नाही. तसेच चांगुलपणाचा सर्वोत्कृष्ट आदर्श यहोवा देव याचे अनुकरण ज्यांद्वारे आपण करू शकतो व केले पाहिजे अशा विविध मार्गांविषयीही आपण विचार करणार आहोत.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• चांगुलपणा म्हणजे काय?
• बायबलमधील कोणता वाक्यांश देवाच्या चांगुलपणावर जोर देतो?
• यहोवाच्या चांगुलपणाचे काही पुरावे कोणते?
• आपण यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण का करावे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चित्र]
एकीकडे यहोवाची स्तुती करून दुसरीकडे त्याप्रमाणे न वागणाऱ्या प्राचीन काळातील लोकांना यहोवाने शिक्षा दिली
[१२ पानांवरील चित्र]
विश्वासू शेषजन जेरूसलेमला परतले
[१३ पानांवरील चित्र]
मोशेला देवाच्या चांगुलपणाविषयी एक अद्भुत घोषणा ऐकायला मिळाली
[१५ पानांवरील चित्र]
यहोवा बायबलच्या वचनांतून आपल्याला ज्याप्रकारे प्रोत्साहन देत आहे त्यातून त्याचा चांगुलपणा दिसून येतो