व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक काळातील हुतात्मे स्वीडनमध्ये साक्ष देतात

आधुनिक काळातील हुतात्मे स्वीडनमध्ये साक्ष देतात

राज्यघोषकांचा वृत्तान्त

आधुनिक काळातील हुतात्मे स्वीडनमध्ये साक्ष देतात

“साक्ष” यासाठी असलेला ग्रीक शब्द माटर्‌ ज्यापासून इंग्रजीतील “माटर्‌” (हुतात्मा) हा शब्द येतो त्याचा अर्थ “आपल्या मृत्यूने साक्ष देणारा” असा होतो. पहिल्या शतकातील अनेक ख्रिश्‍चनांनी, विश्‍वासासाठी मरण पत्करून यहोवाविषयी साक्ष दिली.

त्याचप्रमाणे, २० व्या शतकात, हजारो साक्षीदारांनाही राजकारणाच्या व राष्ट्रीयवादाच्या संदर्भात तटस्थ भूमिका घेतल्यामुळे हिटलरच्या समर्थकांच्या हाती मरण पत्करावे लागले. हे आधुनिक काळातील हुतात्मे देखील प्रभावशाली साक्ष देतात. स्वीडनमध्ये अलीकडे हेच घडले.

दुसऱ्‍या महायुद्धाला संपून ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने स्वीडिश सरकारने हिटलरच्या शासनादरम्यान घडलेल्या हत्याकांडाविषयी माहिती करून देण्यासाठी राष्ट्रभरात एक मोहीम काढली. याला जिवंत इतिहास असे नाव देण्यात आले. यहोवाच्या साक्षीदारांना भाग घेण्यास व आपले अनुभव सांगण्यास निमंत्रण देण्यात आले.

साक्षीदारांनी हत्याकांडातील विसरलेले बळी या शीर्षकाखाली एक प्रदर्शन भरवून याला प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन स्ट्रंगनेस येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन सभागृहात भरवण्यात आले होते. पहिल्याच दिवशी आलेल्या ८,४०० प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभव सांगायला हत्याकांडातून बचावलेले साक्षीदार तेथे उपस्थित होते! १९९९ च्या शेवटापर्यंत, हे प्रदर्शन स्वीडनमधील १०० हून अधिक संग्रहालयांमध्ये व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये भरवण्यात आले आणि सुमारे १,५०,००० लोकांनी ते पाहिले. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्‍यांचाही मोठा समावेश होता; त्यांनी यासंदर्भात प्रशंसा व्यक्‍त केली.

स्वीडनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यहालचालींसंबंधी इतर कोणत्याही घटनेला इतक्या व्यापक प्रमाणात व उत्तम प्रतिसादासह प्रसिद्धी मिळाली नव्हती. प्रदर्शन पाहायला आलेल्या अनेकांनी म्हटले: “तुम्ही [हिटलरच्या शासनात झालेल्या] हत्याकांडाबद्दलच्या तुमच्या अनुभवांविषयी याआधी का सांगितले नाही?”

एका परिसरात प्रदर्शन भरवल्यानंतर तेथील एका मंडळीच्या वृत्तानुसार गृह बायबल अभ्यासांमध्ये ३०-टक्के वाढ झाली! एका साक्षीदाराने आपल्यासोबत काम करणाऱ्‍या एकाला प्रदर्शनाला बोलावले! सहकर्मचाऱ्‍याने निमंत्रण स्वीकारले आणि सोबत एका मैत्रिणीलाही आणले. नंतर, ती मैत्रीण म्हणाली की, आपला विश्‍वास त्यागण्यासाठी केवळ एका दस्ताऐवजावर सही करण्याऐवजी मरण पत्करायला तयार असलेल्या लोकांचा विश्‍वास इतका दृढ असावा ही गोष्टी तिच्या समजेपलीकडची होती. यामुळे अधिक चर्चा झाल्या आणि तिच्यासोबत एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

पहिल्या शतकातल्या आपल्या प्रतिरूपांप्रमाणे, २० व्या शतकातील या विश्‍वासू हुतात्म्यांनी अढळ विश्‍वास आणि एकनिष्ठा स्वीकारण्यास योग्य असलेला यहोवा हा एकच खरा देव आहे अशी धिटाईने साक्ष दिली आहे.—प्रकटीकरण ४:११.

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

बंधनागृहातील कैदी: Państwowe Muzeum Oświęcim-Brzezinka, courtesy of the USHMM Photo Archives