व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

जवळच्या नातेवाईकाबरोबर विवाह न करण्यासंबंधी मोशेच्या नियमशास्त्रातील बंधने आज ख्रिश्‍चनांना कितपत लागू होतात?

इस्राएल राष्ट्राला यहोवाने दिलेल्या नियमशास्त्रात, विवाहसोहळे आणि पद्धती यांची सविस्तर माहिती दिलेली नाही. परंतु ते विशिष्ट वैवाहिक नातेसंबंध निषिद्ध मानते. उदाहरणार्थ, लेवीय १८:६-२० वचनांत, ‘जवळच्या आप्तांमध्ये’ निषिद्ध नातेसंबंधांची एक मोठी यादी दिलेली आहे. जवळच्या नातेवाईकांपैकी कोणासोबत लैंगिक संबंध येऊ नये त्याबद्दलचे बरेच सविस्तर वर्णन त्यात केले आहे. अर्थात ख्रिस्ती लोकांना आज मोशेचे नियमशास्त्र व त्यातील नियम लागू होत नाहीत. (इफिसकर २:१५; कलस्सैकर २:१४) तरीसुद्धा, विवाह साथीदाराची निवड करताना या नियमांकडे दुर्लक्ष केले तरी चालेल असा याचा अर्थ होत नाही. याकडे दुर्लक्ष का करू नये याची अनेक कारणे आहेत.

सर्वप्रथम, जवळच्या नातेवाईकांमध्ये विवाह करण्यासंबंधी लौकिक नियम आहेत आणि ख्रिस्ती लोक ज्या देशांत राहतात तेथील नियमांच्या आज्ञेत राहण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. (मत्तय २२:२१; रोमकर १३:१) अर्थात, प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे असतात. या प्रकारचे बहुतेक आधुनिक नियम प्रामुख्याने अनुवंशिकतेच्या आधारावर आहेत. जवळच्या नातेवाईकांमधील विवाहामुळे, त्यांना होणाऱ्‍या अपत्यात अनुवंशिकतेचे दोष व रोग जडण्याची जास्त शक्यता असते ही गोष्ट अगदी खरी समजली जाते. या कारणासाठी आणि ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना अधीनता’ दाखवण्यासाठी ख्रिस्ती लोक स्थानीय विवाह नियमांचे पालन करतात.

यानंतर, आपण राहतो त्या समाजात काय स्वीकारयोग्य व अस्वीकारयोग्य आहे हाही प्रश्‍न आहे. जवळजवळ प्रत्येक समाजात, रक्‍ताचे नातेसंबंध असलेल्या लोकांमधील विवाह निषिद्ध आहे; अशाप्रकारच्या विवाहांना गोत्रगमनीय समजून त्यांना प्रतिबंध केला जातो. विशिष्ट नातेसंबंध वेगवेगळ्या समाजात निषिद्ध मानले जात असले तरी, “स्पष्ट बोलायचे झाले तर, दोन व्यक्‍तींमध्ये जितका घनिष्ठ आनुवंशिक नातेसंबंध येईल तितक्याच गंभीरपणे त्यांच्यामधला लैंगिक नातेसंबंध निषिद्ध मानला पाहिजे,” असे द एनसायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो. यास्तव, गोत्रगमनाचा प्रश्‍न येत नसला तरी, ख्रिस्ती लोक असे काहीही करू इच्छित नाहीत ज्यावरून स्थापित रीतीरिवाजांप्रती किंवा समाजाच्या योग्य संवेदनशीलतेप्रती त्यांना अनादर आहे असे भासेल; कारण त्यांच्या अशा वागण्यामुळे ख्रिस्ती मंडळीला किंवा देवाच्या नावाला कलंक लागू शकतो.—२ करिंथकर ६:३.

याशिवाय, देवाने आपल्याला दिलेल्या विवेकाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्व लोकांना जन्मतःच बरोबर व चूक, चांगले आणि वाईट हे समजण्याची कुवत असते. (रोमकर २:१५) घाणेरड्या प्रथांमुळे जोपर्यंत त्यांचा विवेक विकृत किंवा निबर होत नाही तोपर्यंत तरी, सामान्य व असामान्य आणि उचित व अनुचित काय आहे हे त्यांचा विवेक त्यांना सांगत असतो. जवळच्या नातेवाईकांसोबत विवाह न करण्याविषयी यहोवाने इस्राएल लोकांना नियम दिला तेव्हा त्याने या वस्तुस्थितीविषयीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. त्याविषयी आपण असे वाचतो: “तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका.” (लेवीय १८:३) ख्रिस्ती आपल्या बायबल आधारित विवेकाला सांभाळून ठेवतात; बरोबर आणि चूक यांविषयी परराष्ट्रीयांच्या भ्रष्ट विचारसरणीचा ते आपल्या विवेकावर प्रभाव पडू देत नाहीत.—इफिसकर ४:१७-१९.

यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नसले तरी, त्यांचा विवेक त्यांना स्पष्टरीत्या सांगतो, की जवळच्या नात्यातला विवाह, जसे की पिता आणि मुलगी, माता आणि मुलगा, भाऊ आणि बहीण यांच्यातला विवाह हा ख्रिस्ती समाजात पूर्णपणे निषिद्ध आहे. * जवळच्या नातेवाईकांची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे ख्रिश्‍चनांना याची जाणीव आहे, की कायदेशीर विवाहाकरता नियम व कायदे आहेत व समाजाने व संस्कृतीने स्वीकारलेले दर्जेही आहेत. यासर्वांचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे जेणेकरून आपण “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे” या शास्त्रवचनांतील आज्ञेचे पालन करू शकू.—इब्री लोकांस १३:४.

[तळटीप]

^ परि. 7 या विषयाची सविस्तर माहिती हवी असेल तर कृपया टेहळणी बुरूज (इंग्रजी) मार्च १५, १९७८, पृष्ठे २५-६ वरील “गोत्रगमनाच्या विवाहांविषयी ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन असावा?” हा लेख पाहा.