शुद्ध विवेकाची काय किंमत?
शुद्ध विवेकाची काय किंमत?
“आपले २०,००० रियाल पुन्हा घेण्याचा सरकारला आदेश.” या मथळ्याची एक अनोखी बातमी कोरेयू डू पोवू नावाच्या ब्राझीलच्या वृत्तपत्रात आली होती. या बातमीत लुईझ अल्वो डी ऑरॉझु नावाच्या एका स्थानिक पोस्टमनबद्दलची हकिकत होती ज्याने स्वतःची जमीन राज्य सरकारला विकली होती. सर्व कागदपत्रांवर सही झाल्यावर, लुईझला एक गोष्ट पाहून खूप आश्चर्य वाटले; ठरवलेल्या किंमतीपेक्षा त्याला २०,००० (जवळजवळ, ८,००० यु.एस. डॉलर) रियाल ज्यादा दिल्याचे त्याला आढळले!
पण आता मिळालेले हे ज्यादा पैसे पुन्हा सरकारला देणे इतके सोपे नव्हते. सरकारी विभागांना अनेक खेपा टाकल्यावर लुईझला सांगण्यात आले, की त्याने एका वकिलाद्वारे कोर्टात आपली समस्या सोडवावी. आपले पैसे पुन्हा घ्यावेत व सर्व कायदेशीर किंमती चुकत्या कराव्यात असा सरकारला आदेश देणाऱ्या त्याच्या न्यायाधीशाने म्हटले, “कोणाच्या तरी चुकीनं हे झालं होतं आणि दिरंगाईमुळे ही समस्या कशी सोडवायची हे कुणाला समजत नव्हतं. माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी केस कधी पाहिली नव्हती.”
यहोवाचा साक्षीदार असलेल्या लुईझने म्हटले: “जे माझ्या हक्काचे नाही ते घ्यायला माझा बायबल प्रशिक्षित विवेक मला परवानगी देत नव्हता. मला काहीही करून ते पैसे परत करायचे होते.”
पुष्कळ लोकांना ही मनोवृत्ती विचित्र वाटेल, कदाचित त्यांना ती समजणारही नाही. परंतु देवाचे वचन दाखवते, की खरे ख्रिस्ती, लौकिक अधिकाऱ्यांबरोबरच्या त्यांच्या व्यवहारांत शुद्ध विवेक बाळगण्यावर जास्त जोर देतात. (रोमकर १३:५) ‘सर्व बाबतीत चांगले वागण्याचा व आपला विवेकभाव चांगला’ ठेवण्याचा यहोवाच्या साक्षीदारांचा निर्धार आहे.—इब्री लोकांस १३:१८.