व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आमचे प्रेम अधिकच वाढले”

“आमचे प्रेम अधिकच वाढले”

“आमचे प्रेम अधिकच वाढले”

शुक्रवार, मार्च ३१, २००० रोजी, जपानच्या होकायडो येथील उसू पर्वतावर २३ वर्षांच्या सुप्तावस्थेनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हजारो रहिवाशांना धोकेदायक परिसरातून पळ काढावा लागला. अनेक लोक बेघर झाले, त्यांच्या नोकऱ्‍या गेल्या पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही. पळ काढाव्या लागणाऱ्‍या लोकांमध्ये ४६ यहोवाचे साक्षीदार होते, पण त्यांना वाऱ्‍यावर सोडण्यात आले नाही.

ज्या दिवशी उद्रेक झाला त्याच दिवशी त्या भागात कार्य करणाऱ्‍या एका ख्रिस्ती प्रवासी सेवकाच्या साहाय्याने मदतकार्याची व्यवस्था करण्यात आली. पाहता पाहता, जवळपासच्या मंडळ्यांमधून मदत मिळू लागली. लवकरच जपानी शाखा दफ्तराच्या देखरेखीखाली, एक मदत समिती ठरविण्यात आली आणि मदत निधीत सबंध जपानमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या देणग्या ओसंडून वाहू लागल्या. आध्यात्मिक कार्यहालचालींना पाठिंबा देण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण-वेळेच्या सेवकांना सर्वात जास्त नुकसान झालेल्या मंडळीत पाठवण्यात आले आणि विभागीय पर्यवेक्षक वारंवार त्या भागाला भेट देऊन भावनिक व आध्यात्मिक मदत देत होते.

अशा संकटाच्या काळातही विपत्तीग्रस्त भागातील साक्षीदार सुरक्षित ठिकाणच्या खासगी घरांमध्ये आपल्या ख्रिस्ती सभा भरवत राहिले. ज्या भागात राज्य सभागृह होते त्या धोक्याच्या परिसरातून बाहेर निघण्याचा आदेश उठवण्यात आला तेव्हा बांधव तेथे गेले आणि त्यांना दिसले की, सभागृहाची इमारत कलली होती, तिला भेगा पडल्या होत्या आणि थोडेफार नुकसान झाले होते. या उद्रेकामुळे जवळच निर्माण झालेल्या ज्वालामुखातून अद्यापही दाट धूर निघत होता. अशा परिस्थितीत, ‘या ठिकाणी सभा भरवणे योग्य राहील का? सभागृहाची दुरुस्ती करता येईल का?’ असा साक्षीदार विचार करू लागले.

जवळपासच्या एका सुरक्षित ठिकाणी नवीन राज्य सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रादेशिक बांधणी समितीने आवश्‍यक मदत दिली. या बांधकामासाठी सबंध देशाभरातील साक्षीदारांनी दिलेल्या देणग्यांचा उपयोग करण्यात आला. लगेचच जमीन घेण्यात आली आणि शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने थोडक्याच अवधीत एक नवीन राज्य सभागृह उभारण्यात आले. रविवार, जुलै २३, २००० रोजी, या नवीनच बांधलेल्या राज्य सभागृहातील पहिल्याच सभेकरता ७५ लोक उपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या पुष्कळांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्याच वर्षी, ऑक्टोबरमध्ये राज्य सभागृहाचे समर्पण झाले तेव्हा, स्थानिक मंडळीतील एका वडिलांनी म्हटले: “या उद्रेकामुळे आम्हा सर्वांना खूप कष्ट सोसावे लागले, आमचे हाल झाले. परंतु, या बांधकामामुळे आमच्या भीतीचे रूपांतर आनंदात झाले आहे. यहोवाकरता आणि आमच्या प्रिय ख्रिस्ती बांधवांकरता आमचे प्रेम अधिकच वाढले आहे!”

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

उसू पर्वतावरील ज्वालामुखीचा उद्रेक: AP Photo/Koji Sasahara