व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जरा दुखेल, बरं का?”

“जरा दुखेल, बरं का?”

“जरा दुखेल, बरं का?”

हे शब्द तुम्ही कधी ऐकलेत का? तुमच्यावर उपचार करताना एखादा डॉक्टर किंवा नर्स तुम्हाला असे कदाचित बोलले असतील.

पण तुम्हाला होणाऱ्‍या दुखण्यामुळे तुम्ही तो उपचार नाकारला नसेल. उलट, बरे होण्यासाठी तुम्ही दुखणे सहन केले. टोकाच्या काही परिस्थितीत, वेदनादायक उपचार स्वीकारणे किंवा नाकारणे हा जीवन-मरणाचा प्रश्‍न ठरू शकतो.

अर्थातच, आपल्याला नेहमीच डॉक्टरांच्या निगराणीची आवश्‍यकता भासत नाही; परंतु, आपणासर्वांना सर्व अपरिपूर्ण मानव या नात्याने, कधीकधी वेदनादायक शिक्षेची किंवा सुधारणुकीची आवश्‍यकता भासतेच. (यिर्मया १०:२३) मुलांना खासकरून लागणाऱ्‍या या शिक्षेवर जोर देत बायबल म्हणते: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देतो.”—नीतिसूत्रे २२:१५.

या ठिकाणी वेत्र [वेत] हा जो शब्द वापरला आहे तो पालकांच्या अधिकाराला सूचित करतो. हे खरे आहे, की मुलांना अनुशासन आवडत नाही. या अनुशासनात कोणत्याही प्रकारच्या शिक्षेचा समावेश असला तर ते प्रतिकार करतील. परंतु, सुज्ञ आणि प्रेमळ आईवडील मुलाच्या फायद्यांकडे पाहतात; शिक्षेमुळे त्याला किती वाईट वाटेल यापेक्षा या शिक्षेमुळे कालांतराने त्याचे किती भले होईल याकडे त्यांचे जास्त लक्ष असते. “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते,” या देवाच्या वचनातील शब्दांत किती सत्यता आहे, ते ख्रिस्ती आईवडिलांना माहीत आहे.—इब्री लोकांस १२:११; नीतिसूत्रे १३:२४.

अर्थात, शिक्षा ही फक्‍त मुलांनाच लागत नाही. प्रौढांनाही शिक्षेची आवश्‍यकता आहे. प्रौढांना बायबल म्हणते: “तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे.” (नीतिसूत्रे ४:१३) होय, सर्व सुज्ञ लोक—आबालवृद्ध—देवाचे वचन, बायबल याच्या आधारावर दिल्या जाणाऱ्‍या शिक्षेचा स्वीकार करतील कारण त्यांना माहीत आहे की असे केल्याने भवितव्यात त्यांचे जीवन वाचेल.