तुम्ही या जगाच्या नाशापासून कसे वाचू शकता?
तुम्ही या जगाच्या नाशापासून कसे वाचू शकता?
बायबलमध्ये, सद्य व्यवस्थीकरणाच्या शेवटाचे वर्णन, “हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे,” असे करण्यात आले आहे. (सफन्या १:१५) अर्थातच, अशा या दिवसाची कोणीही वाट पाहणार नाही! तरीपण, प्रेषित पेत्राने सहख्रिश्चनांना सल्ला दिला: “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत [राहा] . . . त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१२, १३.
पेत्र येथे खऱ्या स्वर्ग आणि पृथ्वीच्या नाशाविषयी बोलत नव्हता. पेत्र येथे ज्या ‘आकाशाविषयी’ व ‘पृथ्वीविषयी’ बोलत होता ते लाक्षणिक अर्थाने सध्याच्या भ्रष्ट मानवी सरकारांना व अभक्त मानवी समाजाला सूचित करते. “परमेश्वराचा दिवस” पृथ्वीचा नाश करणार नाही तर “त्यातील पातक्यांचा संहार करील.” (यशया १३:९) त्यामुळे, आजच्या दुष्ट मानवी समाजातील “अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप” करणाऱ्या लोकांसाठी यहोवाचा दिवस तारणाचा दिवस असेल.—यहेज्केल ९:४.
तेव्हा, ‘परमेश्वराच्या महान व भयंकर दिवसापासून’ कोणाचा बचाव कसा होऊ शकतो? परमेश्वराच्या एका संदेष्ट्याला मिळालेले “परमेश्वराचे वचन” या प्रश्नाचे उत्तर देते. ते म्हणते: “जो कोणी यहोवाच्या नावाचा धावा करील तोच तरेल.” (योएल १:१; २:३१, ३२, NW) यहोवाच्या नावाचा धावा करण्याचा काय अर्थ होतो ते शिकण्यास तुम्हाला मदत करण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल.