व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देणाऱ्‍या सभा

प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देणाऱ्‍या सभा

“माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन”

प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देणाऱ्‍या सभा

टोरोंटोपासून टोकियोपर्यंत, मॉस्कोपासून मॉन्टेव्हिडिओपर्यंत—दर आठवडी कित्येक वेळा लाखो यहोवाचे साक्षीदार आणि त्यांचे स्नेही त्यांच्या उपासनेच्या ठिकाणी जमतात. या लोकांमध्ये, दिवसभर कष्टाचे काम करून थकलेले, घरदार असलेले पुरुष, लहान मुलांसह आलेल्या मेहनती पत्नी आणि माता, शाळेत दिवस घालवून आलेले उत्साही तरुण, दुखण्याखुपण्यांमुळे मंदगतीने चालणाऱ्‍या नाजूक प्रकृतीचे वृद्धजन, धाडसी विधवा आणि अनाथ व सांत्वनाची गरज असलेल्या खिन्‍न व्यक्‍ती असतात.

यहोवाचे हे साक्षीदार वाहतुकीच्या वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करतात—कधी अति वेगवान बुलेट ट्रेनमधून तर कधी गाढवांवरून; कधी खचाखच भरलेल्या सबवे ट्रेनमधून तर कधी ट्रकमधून. काहींना मगरी असलेल्या नद्या पार करून यावे लागते तर काहींना मोठमोठ्या शहरांमधील भीतीदायक वाहतुकीतून प्रवास करावा लागतो. पण हे सगळे लोक इतका त्रास का घेतात?

याचे प्रमुख कारण म्हणजे, ख्रिस्ती सभांमध्ये जाणे आणि त्यांत भाग घेणे हा यहोवा देवाची उपासना करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. (इब्री लोकांस १३:१५) प्रेषित पौलाने आणखी एक कारण दिले; त्याने लिहिले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण . . . आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १०:२४, २५) येथे पौल स्तोत्रकर्त्या दावीदाच्या भावनांची पुनरुक्‍ती करत होता; दावीदाने असे गायिले: “आपण परमेश्‍वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.”—स्तोत्र १२२:१.

सभांमध्ये जाण्यासाठी ख्रिश्‍चनांना आनंद का होतो? कारण तेथे येणारे लोक केवळ दर्शक नसतात. तर, सभांमुळे एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळते. खासकरून या सभांमध्ये फक्‍त घेण्याची नव्हे तर देण्याचीही संधी मिळते आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास एकमेकांना उत्तेजन देण्याचीही संधी मिळते. यामुळे सभा, उभारणीचे प्रसंग ठरतात. शिवाय, ख्रिस्ती सभा हा एक मार्ग आहे ज्यांद्वारे येशू आपले वचन पूर्ण करतो की, “माझ्याकडे या . . . मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.

सांत्वन आणि आपुलकीचे आश्रयस्थान

सभा तजेलादायक असतात असा विचार करायला यहोवाच्या साक्षीदारांकडे चांगली कारणे आहेत. एक गोष्ट म्हणजे, सभांमध्ये, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ योग्य समयी आध्यात्मिक भोजन देतात. (मत्तय २४:४५) यहोवाच्या सेवकांना कुशल बनवण्यात आणि देवाच्या वचनाचे आवेशी शिक्षक बनवण्यातही सभा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शिवाय, राज्य सभागृहात, प्रेमळ, आपुलकी दाखवणारे व काळजीने विचारपूस करणारे मित्रमैत्रिणी असतात जे संकटकाळी एकमेकांची मदत करायला व सांत्वन द्यायला तयार असतात.—२ करिंथकर ७:५-७.

फिलसला हाच अनुभव आला. तिचे एक मूल पाच आणि दुसरे आठ वर्षांचे असताना तिचा पती मरण पावला. ख्रिस्ती सभांचा तिच्या व तिच्या मुलांवर कशाप्रकारे तजेलादायक परिणाम झाला याचे वर्णन करताना ती म्हणाली: “राज्य सभागृहांमध्ये जाणे सांत्वनदायक होते कारण सहउपासक नेहमी आलिंगन देऊन, एखादा शास्त्रवचनातील विचार सांगून किंवा फक्‍त हात हातात घेऊन आपले प्रेम आणि काळजी व्यक्‍त करायचे. या ठिकाणी मला नेहमी राहावेसे वाटायचे.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

मॅरीची एक मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला बरे व्हायला सहा आठवडे लागतील असे तिच्या डॉक्टरांनी सांगितले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या काही आठवड्यांमध्ये मॅरी सभांना जाऊ शकली नाही. तिच्या डॉक्टरांनी हे देखील पाहिले की ती पूर्वीसारखी आनंदी नव्हती. तिला सभांना जाता येत नाही हे त्याचे कारण आहे असे त्यांना कळताच त्यांनी तिला सभांना जाण्याचे प्रोत्साहन दिले. पण मॅरीने सांगितले की, सत्यात नसलेला तिचा पती तिच्या प्रकृतीची चिंता असल्यामुळे तिला सभांना जाऊ देणार नाही. तेव्हा डॉक्टरांनी मॅरीला प्रोत्साहन व उभारणीकारक सहवासासाठी राज्य सभागृहात जाण्याचा चक्क “आदेश” लिहून दिला. मॅरी म्हणते: “मी फक्‍त एकाच सभेला गेले तर मला किती बरं वाटलं. मी जेवू लागले, रात्रभर शांत झोपू शकले, वारंवार घ्यावी लागणारी वेदनाशामक औषधंही मला लागली नाहीत. मी पुन्हा आनंदी दिसू लागले!”—नीतिसूत्रे १६:२४.

ख्रिस्ती सभांमधील प्रेमळ वातावरण बाहेरून येणाऱ्‍यांना चटकन जाणवते. एका कॉलेज विद्यार्थिनीने तिच्या मानवजातीशास्त्र विषयासाठी एक लेख लिहिण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांचा अभ्यास करायचे ठरवले. सभांमधील वातावरणाविषयी तिने तिच्या लेखात लिहिले: “माझं स्नेहपूर्ण स्वागत करण्यात आलं . . . यामुळे मी अतिशय प्रभावित [झाले]. . . . यहोवाच्या साक्षीदारांमधील मैत्रीचा गुण अगदी ठळक होता आणि माझ्या मते तोच त्या वातावरणातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.”—१ करिंथकर १४:२५.

या कष्टमय जगात, ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक अर्थाने मरुवनासारखी आहे. ते शांती आणि प्रेमाचे आश्रयस्थान आहे. सभांमध्ये उपस्थित राहण्याद्वारे तुम्हाला स्तोत्रकर्त्याचे शब्द किती सत्य आहेत याचा प्रत्यय येईल: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तोत्र १३३:१.

[२५ पानांवरील चौकट/चित्र]

एक खास गरज भागवणे

ज्यांना ऐकू येत नाही ते ख्रिस्ती सभांचा लाभ कसा मिळवू शकतात? संपूर्ण जगभरात यहोवाचे साक्षीदार मुकबधिरांच्या भाषेत मंडळ्या स्थापन करत आहेत. गेल्या १३ वर्षांमध्ये, अमेरिकेत मुकबधिरांच्या भाषेतील २७ मंडळ्या आणि ४३ गट तयार करण्यात आले आहेत. निदान ४० इतर देशांमध्ये, सध्या मुकबधिरांच्या भाषेतील सुमारे १४० मंडळ्या आहेत. आणि मुकबधिरांच्या १३ भाषांमध्ये ख्रिस्ती प्रकाशने व्हिडिओवर सादर करण्यात आली आहेत.

ख्रिस्ती मंडळीत मुकबधिरांना यहोवाची स्तुती करण्याची संधीही दिली जाते. फ्रान्समध्ये, पूर्वी कॅथलिक असलेल्या ओडिलला तीव्र नैराश्‍य होत असे आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत असत. परंतु ख्रिस्ती सभांमध्ये मिळालेल्या बायबल शिक्षणाबद्दल ती अत्यंत कृतज्ञ आहे. ती म्हणते: “माझी प्रकृती सुधारली आणि जीवनाचा आनंद मला पुन्हा लाभला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सत्य मिळालं. आता माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे.”