व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

कुमारी मरीयेच्या अपूर्णतेचा येशूच्या गर्भधारणेवर प्रतिकूल प्रभाव पडला का?

‘येशूच्या जन्माविषयी,’ प्रेरित अहवाल म्हणतो: “त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.” (मत्तय १:१८) निश्‍चितच, मरीयेच्या गरोदर राहण्यामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याची प्रमुख भूमिका होती.

परंतु, मरीयेविषयी काय? तिच्या गरोदर राहण्यामध्ये तिच्या अंड पेशीचा किंवा स्त्रीबीजाचा काही भाग होता का? अब्राहाम, इसहाक, याकोब, यहूदा आणि राजा दावीद या मरीयेच्या पूर्वजांना देवाने दिलेल्या वचनांचा विचार करता, जन्माला येणारे मूल खरोखर त्यांच्याच वंशावळीतून असणे भाग होते. (उत्पत्ति २२:१८; २६:२४; २८:१०-१४; ४९:१०; २ शमुवेल ७:१६) नाहीतर, मरीयेच्या पोटी जन्मणारे मूल देवाच्या वचनांचा हक्काचा वारसदार कसा असणार? तो तिचा खरोखरचा मुलगा असणे आवश्‍यक होते.—लूक ३:२३-३४.

यहोवाच्या देवदूताने कुमारी मरीयेला दर्शन देऊन म्हटले: “मरीये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे; पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव.” (लूक १:३०, ३१) गर्भधारणेसाठी अंडबीजाचे फलन व्हावे लागते. स्पष्टतः, यहोवा देवाने आत्मिक क्षेत्रातून आपल्या एकुलत्या एक पुत्राचा जीव पृथ्वीवर बदली करून मरीयेच्या गर्भशयात एका अंडबीजाचे फलन साध्य केले.—गलतीकर ४:४.

पण, गर्भधारणा होऊन एका अपरिपूर्ण स्त्रीला झालेले मूल परिपूर्ण आणि शरीरात पापापासून मुक्‍त असणे शक्य होते का? परिपूर्णता आणि अपरिपूर्णता यांचा मेळ होतो तेव्हा आनुवंशिकतेचे नियम कसे कार्य करतात? हे लक्षात घ्या की, देवाच्या पुत्राच्या परिपूर्ण जीवन शक्‍तीची बदली करण्यामध्ये आणि गर्भधारणा घडवून आणण्यामध्ये पवित्र आत्म्याचा उपयोग करण्यात आला होता. यामुळे मरीयेच्या अंडबीजातील कोणतीही अपरिपूर्णता निकामी होऊन अगदी सुरवातीपासूनच परिपूर्ण असलेली जननिक रचना उत्पन्‍न झाली.

आपण मात्र एवढी निश्‍चिती बाळगू शकतो की, देवाचा पवित्र आत्मा त्या वेळी क्रियाशील राहिल्यामुळे देवाचा उद्देश सफल झाला. गब्रीएल देवदूताने मरीयेला असे समजावले: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल. त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” (लूक १:३५) होय, देवाच्या पवित्र आत्म्याने जणू एक संरक्षक आवरण निर्माण केले ज्यामुळे गर्भधारणेनंतर तिच्या उदरात वाढणाऱ्‍या गर्भावर अपरिपूर्णतेचा परिणाम किंवा हानीकारक प्रभाव झाला नाही.

यावरून हे स्पष्ट होते की, येशूला त्याचे परिपूर्ण मानवी जीवन त्याच्या स्वर्गीय पित्याकडून मिळाले होते, कोणा मानवाकडून नव्हे. यहोवाने त्याच्यासाठी “शरीर तयार केले” आणि येशू—गर्भधारणेपासून—खरोखर “निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा” होता.—इब्री लोकांस ७:२६; १०:५.

[१९ पानांवरील चित्र]

“तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल”