व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास तर्कशक्‍तीवर आधारलेला असावा का?

विश्‍वास तर्कशक्‍तीवर आधारलेला असावा का?

विश्‍वास तर्कशक्‍तीवर आधारलेला असावा का?

“केवळ स्वतःच्या तर्कशक्‍तीचा उपयोग करायला नको असल्यामुळे बरेच लोक ‘धार्मिक’ बनले आहेत” असे अमेरिकेतील एका थिओलॉजिकल सेमिनरीच्या डीनने लिहिले. ते पुढे म्हणतात, “त्यांना फक्‍त ‘विश्‍वासाच्या आधारे’ सगळ्या गोष्टी मान्य करायला हव्या असतात.”

यावरून असा अर्थ निघतो की, धार्मिक विश्‍वास बाळगण्याचा दावा करणारे बहुतांश लोक आपण एखाद्या गोष्टीवर का विश्‍वास ठेवतो किंवा आपल्या विश्‍वासासाठी बायबलचा योग्य पुरावा आहे का असा क्वचितच विचार करतात. त्यामुळेच, धर्माविषयी लोकांना बोलायला आवडत नाही यात काहीच नवल नाही.

खेदाची गोष्ट म्हणजे, धार्मिक प्रतिमांचा उपयोग आणि पाठांतर केलेल्या प्रार्थना वारंवार उच्चारणे यांमुळेही तर्कशक्‍तीचा वापर करण्यास उत्तेजन मिळत नाही. आणि कोट्यवधी लोकांकरता धर्म म्हणजे या प्रथा तसेच भव्य वास्तू, सुंदर रंगीत काचेच्या खिडक्या आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत एवढ्यापुरताच मर्यादित असतो. काही चर्च असा दावा करतात की, बायबलवर त्यांचा विश्‍वास आधारलेला आहे तरीपण ‘येशूवर विश्‍वास ठेवा आणि तुमचे तारण होईल’ या त्यांच्या संदेशामुळे गंभीर बायबल अभ्यासाला प्रोत्साहन दिले जात नाही. इतरजण सामाजिक किंवा राजकीय कार्यांद्वारे सुवार्तेचा प्रसार करू लागतात. याचा परिणाम काय होतो?

उत्तर अमेरिकेतील परिस्थितीविषयी, एका धार्मिक लेखकाने म्हटले: “ख्रिस्ती धर्म . . . वरपांगी वाटतो [आणि] त्याच्या अनुयायांना त्या विश्‍वासाविषयी फारशी माहिती नसते.” इतकेच काय तर, एका सर्व्हे घेणाऱ्‍याने असे म्हटले की, अमेरिका “हा बायबलबद्दल अज्ञानी असलेल्यांचा देश आहे.” प्रामाणिकपणे पाहिल्यास, इतर देशांच्या बाबतीतही हे खरे ठरेल जेथे तथाकथित ख्रिस्ती धर्म आचरला जातो. तसेच, गैर-ख्रिस्ती धर्म देखील तर्कशक्‍तीचा वापर करायला प्रोत्साहन देत नाहीत आणि तर्कशुद्ध व विधायकपणे विचार करण्यावर जोर देण्याऐवजी मंत्र जपणे, विधीपूर्वक प्रार्थना आणि विविध प्रकारे ध्यान करून गूढ आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे यांवर जोर देतात.

परंतु, आपल्या धार्मिक विश्‍वासांची अचूकता किंवा सत्यता यांचा फारसा विचार न करणारे लोक आपल्या दररोजच्या जीवनात मात्र इतर गोष्टींचा फार काळजीपूर्वक विचार करतात. एखादी कार विकत घेण्याआधी (जी एक दिवशी भंगारात टाकली जाईल) जी व्यक्‍ती पुष्कळ माहिती गोळा करते तीच धर्माच्या बाबतीत मात्र असे म्हणते: ‘माझ्या आईवडिलांकरता तो चांगला होता त्याअर्थी तो माझ्याकरताही चांगलाच असेल.’ हे तुम्हाला विचित्र वाटत नाही का?

आपल्याला खरोखरच देवाला प्रसन्‍न करायचे असेल तर, त्याच्याविषयी आपण करत असलेला विश्‍वास योग्य आहे की नाही याचा आपण गंभीरपणे विचार करायला नको का? प्रेषित पौलाने त्याच्या काळातील विशिष्ट धार्मिक लोकांविषयी असे म्हटले: “त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) अशा लोकांची तुलना रंगरंगोटीसाठी बोलवलेल्या पेंटरशी करता येते; तो घराला रंग लावायला मेहनत घेतो पण घराच्या मालकाच्या सूचनांकडे लक्ष न दिल्यामुळे तो चुकीचे रंग वापरतो. रंग देणाऱ्‍याला आपले काम चांगले वाटेल पण मालकाला ते आवडेल का?

खऱ्‍या उपासनेच्या बाबतीत देवाला काय ग्रहणीय आहे? बायबल उत्तर देते: “हे आपला तारणारा देव ह्‍याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) काहींना वाटेल की, आजच्या पुष्कळ धर्मांमध्ये हे ज्ञान मिळणे अशक्य आहे. पण जरा विचार करा—लोकांनी सत्याचे परिपूर्ण ज्ञान घ्यावे अशी देवाची इच्छा असल्यास तो लोकांपासून हे ज्ञान लपवून ठेवेल का? बायबलनुसार असे होणार नाही कारण ते म्हणते: “जर तू [देवाचा] शोध करशील तर तो तुला सापडेल.”—१ इतिहास २८:९, पं.र.भा.

जे प्रामाणिकपणे देवाचा शोध घेतात त्यांना देव स्वतःची ओळख कशी करून देतो? पुढील लेखात याचे उत्तर दिले जाईल.