व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिकायला वयाचे बंधन नाही

शिकायला वयाचे बंधन नाही

शिकायला वयाचे बंधन नाही

सेन्या यांचा जन्म १८९७ साली झाला होता. त्यांना ३ मुली, एक मुलगा, १५ नातवंडे आणि २५ पतवंडे होती. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर जे संस्कार केले होते त्यानुसारच त्या संपूर्ण आयुष्य जगल्या होत्या. काळा समुद्र आणि कॉकसस यांच्यामध्ये असलेले अब्कास प्रजासत्ताक या युद्ध-ग्रस्त ठिकाणाहून त्या निर्वासित म्हणून मॉस्कोला आल्या होत्या तरीपण त्या आपल्या जीवनात समाधानी होत्या; खासकरून त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्मात त्या संतुष्ट होत्या.

१९९३ साली, सेन्या यांची मुलगी मेरी यहोवाची साक्षीदार झाली. मेरी यहोवा देवाविषयी, बायबलविषयी सेन्या यांना सांगू लागली; पण सेन्याला हे सर्व ऐकण्यात रस नव्हता. सेन्या तिला सांगत राहिल्या, की “आता नवीन काही शिकून घेण्याचं हे माझं वय नाही.”

तरीपण मेरी, सेन्या यांची नातसून लॉन्डा आणि पतवंडे नॉनॉ आणि झॉझॉ हे सर्व त्यांना बायबलबद्दल सांगत राहायचे; ते सर्व यहोवाचे साक्षीदार झाले होते. १९९९ सालच्या एका संध्याकाळी त्यांनी सेन्या यांना एक वचन वाचून दाखवले जे त्यांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. आपल्या विश्‍वासू प्रेषितांबरोबर प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी येशूने उद्‌गारलेले ते शब्द होते. (लूक २२:१९, २०) त्याच संध्याकाळी सेन्या यांनी बायबलचा अभ्यास करायचे ठरवले; त्या तेव्हा १०२ वर्षांच्या होत्या.

सेन्या म्हणतात: “१०२ वर्ष जगल्यानंतर मला जीवनाचा खरा अर्थ गवसला होता. आपला प्रेमळ देव यहोवा याची सेवा करण्यासारखं दुसरं काहीही जगात नाही हे मला समजलं. मी अजूनही चालू-फिरू शकते आणि तंदुरुस्त आहे. मी बिना चष्म्याची वाचू शकते आणि माझ्या कुटुंबाबरोबर सर्व कार्यांत सामील होते.”

नोव्हेंबर ५, २००० साली सेन्या यांचा बाप्तिस्मा झाला. त्या म्हणतात: “आता मी, प्रेमानं यहोवाची सेवा करण्यासाठी माझं जीवन त्याला बहाल करते. माझ्या घराजवळच्या बसथांब्यावर बसून मी लोकांना मासिकं आणि पत्रिका देते. आमचे नातेवाईक सहसा मला भेटायला येतात तेव्हा त्यांनाही यहोवाविषयीचं सत्य सांगायला मला आनंद वाटतो.”

सेन्या त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत जेव्हा त्यांचे ‘शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होईल व त्यांचे तारुण्याचे दिवस त्यांना पुन्हा प्राप्त होतील.’ (ईयोब ३३:२५) शंभरी उलटलेल्या व्यक्‍तीला जर वाटते, की जीवनाचा अर्थ शिकायला वयाचे बंधन नाही तर मग तुमच्याबद्दल काय?