व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमची सुरक्षा कशात आहे?

तुमची सुरक्षा कशात आहे?

तुमची सुरक्षा कशात आहे?

पश्‍चिम आफ्रिकेतील एका लहानशा गावातील जोझ्वेने, कुटुंबाचा व मित्रांचा अखेरचा निरोप घेतला. * आणि एका मोठ्या शहरात आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी गेला. पण, शहरात पोहंचल्यावर त्याने पाहिले, की येथे झाडांवर पैसे लागलेले नाहीत; तो निराश झाला.

शहरी जीवनाशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करता करता, त्याची फार निराशा होते. त्याने कल्पना केली होती त्यापेक्षा हे मोठे शहर फारच वेगळे होते. त्याला आपल्या लहानशा गावी कुटुंबाकडे आणि मित्रांकडे परतण्याची सारखी इच्छा होत असते. पण गावकरी आपली थट्टा करतील अशी भीती त्याला वाटते. ‘शहरामध्ये जाऊन मी काही करू शकलो नाही म्हणून ते मला नावं ठेवतील,’ अशी चिंता त्याला वाटते.

पण याहीपेक्षा जास्त काळजी त्याला याची वाटत असते की, आपल्या आईवडिलांना काय वाटेल. आर्थिक मदतीसाठी ते त्याच्यावरच अवलंबून आहेत. या एक ना अनेक काळज्या मनात असताना हलक्या दर्जाचे आणि जास्त वेळेचे एक काम तो स्वीकारतो ज्याची मिळकत त्याच्या अपेक्षेपेक्षा निम्मी देखील नसते. जास्त काम करून तो थकून जातो. मग, ज्या ख्रिस्ती कार्यहालचाली त्याला महत्त्वाच्या वाटत असतात त्यांच्यासाठी दिला जाणारा वेळ दिवसागणिक कमी होत जातो. घरापासून आणि मित्रांपासून दूर राहून तो दुःखी होतो, त्याला एकटेपणा जाणवतो. हवी असलेली सुरक्षा त्याला शहरात मिळत नाही.

जोझ्वेची ही दुःखद कहाणी अत्यंत सामान्य आहे. शहरात राहायला जाऊन जोझ्वे स्वार्थी बनत नव्हता; त्याला फक्‍त सुरक्षा हवी होती. त्याला अगदी मनापासून वाटत होते की, त्याच्या लहानशा गावापेक्षा त्याला शहरात जास्त वाव होता. अर्थात, काही वेळा एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते परंतु त्याला खरोखरच सुरक्षा मिळाली आहे असे म्हणता येणार नाही. निदान जोझ्वेच्या बाबतीत तरी असे झाले नाही किंवा अशीच स्वप्ने बाळगून शहरात जाणाऱ्‍या बहुतांश लोकांच्या बाबतीत तरी असे घडेल असे म्हणता येणार नाही. त्यामुळे, आपल्याला असा प्रश्‍न पडतो की, ‘शेवटी सुरक्षा म्हणजे काय?’

सुरक्षा ही वेगवेगळ्या लोकांकरता वेगवेगळे अर्थ राखून आहे. एका शब्दकोशानुसार, सुरक्षा म्हणजे, “धोक्यापासून सुटका” किंवा “भीती आणि चिंता यांपासून सुटका.” आज बहुतेक लोकांना याची जाणीव आहे की, पूर्णतः “धोक्यापासून सुटका” मिळवणे शक्य नाही. अवतीभोवती धोक्याचे वातावरण असतानाही जर त्यांना सुरक्षित वाटले तर ते समाधानी असतात.

तुमच्याबद्दल काय? तुम्हाला कशात सुरक्षा वाटते? जोझ्वेने विचार केल्याप्रमाणे, गावाऐवजी ती शहरात आहे का? की पैशात आहे, मग तो कसाही किंवा कोठूनही मिळवलेला असला तरी? समाजात मोठे स्थान मिळवण्यात? तुमच्या मते, ही सुरक्षा कशातही असली तरी ती तुमच्याकरता व तुमच्या कुटुंबाकरता किती काळ टिकेल?

आपण तीन गोष्टींचा विचार करू या ज्यांमध्ये लोक सुरक्षा मिळवण्याचा प्रयत्न करतात—भौगोलिक ठिकाण; पैसा; पद किंवा स्थान. त्यानंतर, आपण परीक्षण करून पाहू या की, खरी व कायमची सुरक्षा कशात आहे.

[तळटीप]

^ परि. 2 नाव बदलण्यात आले आहे.