व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

तणावापासून मुक्‍त होण्याकरता तुम्ही डोंगरावरील प्रवचनाचा तुमच्या व्यक्‍तिगत अभ्यासात उपयोग कसा करू शकता?

त्या प्रवचनात किंवा शुभवर्तमानात येशूने दिलेली एखादी मूलभूत शिकवण तुम्ही दररोज वाचू शकता. या शिकवणीवर मनन केल्याने व आपल्या जीवनात ती लागू करण्याचा प्रयत्न केल्याने तुमचा आनंद वाढेल व तणाव कमी होऊ शकेल.—१२/१५, पृष्ठे १२-१४.

अधिक जबाबदाऱ्‍या हाताळण्यास सेवा सेवकांना प्रशिक्षण देण्याची कोणती तीन कारणे मंडळीच्या वडिलांकडे आहेत?

यहोवाच्या साक्षीदारांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे, बाप्तिस्मा घेणाऱ्‍या नवीन लोकांना मदत करण्यासाठी आणखी जबाबदार बांधवांची आवश्‍यकता आहे. अनेक वर्षांपासून वडील या नात्याने सेवा करणाऱ्‍यांना वयामुळे किंवा प्रकृतीच्या समस्यांमुळे इतके जमत नाही. याव्यतिरिक्‍त अनेक योग्य वडिलांना, स्थानीय मंडळीच्या जबाबदाऱ्‍यांशिवाय इतरही जबाबदाऱ्‍या असल्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांना आपल्या मंडळीचा भार उचलता येत नाही.—१/१, पृष्ठ २९.

लोक ज्या दैवतांवर विश्‍वास करतात ते कोणत्या अर्थाने खरे नाहीत?

पुष्कळ लोक, त्यांच्या धर्मांतील देवीदेवतांची भक्‍ती करतात परंतु एलीयाच्या काळात बआल देवता जसा आपल्या लोकांना वाचवू शकला नाही, त्याप्रकारे हे देवीदेवता निर्जीव आहेत. (१ राजे १८:२६, २९; स्तोत्र १३५:१५-१७) इतर लोक मनोरंजनाच्या किंवा खेळक्रीडेच्या जगातील अशा बड्या व्यक्‍तींची पूजा करतात ज्या भविष्याची कुठलीच आशा देऊ शकत नाहीत. परंतु, यहोवा खरोखर अस्तित्वात आहे आणि तो आपले उद्देश पूर्ण करतो.—१/१५, पृष्ठे ३-५.

देवाने काईनाला दिलेल्या इशाऱ्‍यावरून आपण काय शिकू शकतो?

देवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे. आपण चांगले ते करण्याची निवड केली पाहिजे; काईनाने याच्या अगदी उलट निवड केली. बायबल अहवाल हेही दाखवतो, की पश्‍चाताप न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा न्यायदंड बजावतो.—१/१५, पृष्ठे २२-३.

स्वच्छता आता इतकी महत्त्वपूर्ण का आहे?

लोकांचे राहणीमान बदलत चालल्यामुळे, पुष्कळ जण आपले घर स्वच्छ करण्यात पूर्वीसारखा वेळ घालवत नाहीत. अन्‍न व पाणी यांच्याबाबतीत स्वच्छता न राखल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. बायबल, शारीरिक स्वच्छतेसोबतच आध्यात्मिक, नैतिक व मानसिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यावर भर देते.—२/१, पृष्ठे ३-६.

ख्रिस्त-पूर्व काळातील साक्षीदारांबद्दल बोलताना पौलाने म्हटले की त्यांना ‘आपणावाचून पूर्ण केले जाणार नाही.’ हे कसे? (इब्री लोकांस ११:४०)

बायबलमध्ये सांगितलेल्या हजार वर्षांदरम्यान, ख्रिस्त आणि स्वर्गात राजे व याजक यानात्याने सेवा करणारे त्याचे अभिषिक्‍त बांधव, पुनरुत्थित लोकांना खंडणीचे लाभ मिळवून देतील. अशाप्रकारे या विश्‍वासू लोकांना, इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायातील विश्‍वासू लोकांप्रमाणे ‘पूर्ण केले जाईल.’—२/१, पृष्ठ २३.

“तुम्ही . . . रक्‍त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही” असे पौलाने इब्रीकरांना म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (इब्री लोकांस १२:४)

मृत्यूच्या घटकेपर्यंत प्रतिकार करणे असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिलेल्यांची इतिहासात उदाहरणे होती. पौलाने ज्यांना लिहिले त्या इब्रीकरांना इतक्या कडक परीक्षा आल्या नव्हत्या तरीसुद्धा त्यांना प्रौढतेप्रत प्रगती करण्याची गरज होती, त्यांच्यापुढे काहीही आले तरी ते सर्व सहन करण्यासाठी त्यांना आपला विश्‍वास वाढवण्याची गरज होती.—२/१५, पृष्ठ २९.

यहोवाची दया त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते, असे म्हणण्याचे टाळणे उचित का आहे?

काही भाषांत, ‘तीव्रता कमी करण्याचा’ अर्थ संतुलित किंवा प्रतिबंध करणे असा होऊ शकतो. यहोवा देवाजवळ न्याय आणि दया हे दोन्ही गुण आहेत आणि हे गुण तो सुसंगतपणे दाखवतो. (निर्गम ३४:६, ७; अनुवाद ३२:४; स्तोत्र ११६:५; १४५:९) यहोवाच्या न्यायाच्या तीव्रतेला किंवा प्रखरतेला दयेने कमी करण्याची गरज नाही.—३/१, पृष्ठ ३१.

ख्रिश्‍चनांकरता, शवसंवलेपनाची प्रथा उचित आहे का?

शवसंवलेपनाद्वारे शव टिकवून ठेवता येते. प्राचीन काळचे काही लोक धार्मिक कारणांस्तव ही प्रथा आचरीत होते. परंतु खरे उपासक धार्मिक कारणांसाठी करीत नसावेत. (उपदेशक ९:५; प्रेषितांची कृत्ये २४:१५) मातीला शरीर मिळणे अर्थात शेवटी जे टाळता येत नाही ते शवसंवलेपनामुळे केवळ लांबणीवर टाकले जाते. (उत्पत्ति ३:१९) शवसंवलेपन करण्याचा कायदा असेल, कुटुंबातील काही सदस्यांची ती इच्छा असेल किंवा काहींना अंत्यसंस्कारासाठी लांबून यावे लागणार असल्यामुळे ते करण्याची गरज असेल तर त्यात काही गैर नाही.—३/१५, पृष्ठे १८-२०.

बायबलमधील कोणती उदाहरणे आपल्याला शिकवतात, की देव सर्व राष्ट्रांतील लोकांचे स्वागत करतो?

निनवेकरांना इशारा देण्यासाठी यहोवाने योनाला पाठवले आणि त्यांनी दाखवलेला पश्‍चाताप स्वीकारावा असे देवाने योनाला आर्जवले. आपल्या बोलण्याद्वारे आणि आपल्या उदाहरणाद्वारे येशूने शोमरोनी लोकांबद्दल प्रेम बाळगण्याचे उत्तेजन दिले. प्रेषित पेत्र आणि प्रेषित पौल या दोघांची गैर यहुदी लोकांप्रत सुवार्ता सांगण्याची भूमिका होती. या उदाहरणांवरून आपण शिकतो, की सर्व पार्श्‍वभूमीच्या लोकांना आपण मदत केली पाहिजे.—४/१, पृष्ठे २१-४.