व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पळून जाणे शहाणपणाचे ठरते

पळून जाणे शहाणपणाचे ठरते

पळून जाणे शहाणपणाचे ठरते

आजच्या जगात आपण बहुतेकदा लोकांना, धीट होण्याचा प्रयत्न करताना किंवा शत्रुभाव बाळगताना किंवा मोहांचा सामना करताना पाहतो. पळ काढणाऱ्‍या व्यक्‍तीला दुबळी किंवा भ्याड समजले जाते. कदाचित अशा व्यक्‍तीची थट्टाही केली जाते.

परंतु बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की काही परिस्थितींमध्ये पळून जाणे केवळ शहाणपणाचेच नव्हे तर धाडसीपणाचेही ठरते. बायबलमधील या सत्याची खात्री पटवून दिल्यानंतर आपल्या शिष्यांना सेवेमध्ये पाठवण्याआधी येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितले: “एका गावात तुमचा छळ करितील तेव्हा दुसऱ्‍यात पळून जा.” (मत्तय १०:२३) होय, येशूच्या शिष्यांना त्यांचा छळ करणाऱ्‍या लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यास सांगण्यात आले होते. बळजबरीने इतरांचे परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात त्यांना कोणत्याही प्रकारचे धार्मिक युद्ध लढायचे नव्हते. त्यांच्याकडे शांतीचा संदेश होता. (मत्तय १०:११-१४; प्रेषितांची कृत्ये १०:३४-३७) यास्तव, ख्रिश्‍चनांनी क्रोधित होण्याऐवजी प्रक्षोभक परिस्थितीतून पळून अथवा दूर जायचे होते. अशाप्रकारे ते चांगला विवेक राखू शकतात आणि यहोवाबरोबर त्यांचा मौल्यवान नातेसंबंध टिकवून ठेवू शकतात.—२ करिंथकर ४:१, २.

बायबलमधील नीतिवचनांच्या पुस्तकात एक अगदी उलट उदाहरण दिलेले आहे. त्यात एका तरुणाविषयी सांगितले आहे जो मोहविणाऱ्‍या परिस्थितीतून पळून जाण्याऐवजी एका वेश्‍येच्या “तत्काळ . . . मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो.” याचा परिणाम काय होतो? मोहाला बळी पडल्यामुळे तो आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतो.—नीतिसूत्रे ७:५-८, २१-२३.

लैंगिक अनैतिक कृत्य करण्याचा मोह तुम्हाला होतो किंवा इतर संभाव्य धोकादायक परिस्थितीत सापडता तेव्हा तुम्ही काय करू शकता? अशा वेळी तेथून पळून जाणे किंवा होता होईल तितक्या लवकर तेथून निघून जाणे शहाणपणाचे ठरेल असे देवाचे वचन म्हणते.—नीतिसूत्रे ४:१४, १५; १ करिंथकर ६:१८; २ तीमथ्य २:२२.