वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
योहानाने ‘मोठ्या लोकसमुदायाला’ यहोवाच्या मंदिरात पवित्र सेवा सादर करताना पाहिले; हा मोठा लोकसमुदाय मंदिराच्या कोणत्या भागात होता?—प्रकटीकरण ७:९-१५.
मोठा लोकसमुदाय यहोवाच्या महान आत्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील एका अंगणात—खासकरून शलमोनाच्या मंदिरातील बाहेरच्या अंगणास सूचित करणाऱ्या अंगणात त्याची उपासना करत आहेत असे म्हणणे तर्कसंगत आहे.
गतकाळात असे म्हणण्यात आले होते, की मोठा लोकसमुदाय हा येशूच्या काळातील परराष्ट्रीयांच्या अंगणाच्या आत्मिक प्रतिरूपात अथवा प्रतिनमुन्यात उपासना करतो. पण अधिक संशोधन केल्यावर, ही वस्तुस्थिती नसल्याची कमीत कमी पाच कारणे आढळली आहेत. सर्वप्रथम, हेरोदच्या मंदिराच्या सर्व वैशिष्ठ्यांची प्रतिरूपे यहोवाच्या महान आत्मिक मंदिरात आढळत नाहीत. उदाहरणार्थ, हेरोदच्या मंदिरात स्त्रियांचे अंगण आणि इस्राएलाचे अंगण होते. स्त्रियांच्या अंगणात स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही प्रवेश होता पण इस्राएलाच्या अंगणात फक्त पुरुषांना प्रवेश होता. यहोवाच्या महान आत्मिक मंदिरात, उपासनेच्या बाबतीत स्त्रीपुरुषांत भेद केला जात नाही. (गलतीकर ३:२८, २९) त्याअर्थी, स्त्रियांच्या अंगणाचे आणि इस्राएलाच्या अंगणाचे आत्मिक मंदिरात प्रतिरूप नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, शलमोनाच्या मंदिराकरता देवाने दिलेल्या आराखड्यात किंवा यहेज्केलाच्या मंदिराच्या दृष्टान्तात किंवा जरुबाबेलने पुनर्बांधणी केलेल्या मंदिरातही परराष्ट्रीयांचे अंगण नव्हते. तेव्हा यहोवाच्या महान आत्मिक मंदिरात म्हणजेच उपासनेच्या व्यवस्थेत परराष्ट्रीयांच्या अंगणाचे प्रतिरूप असेल असा निष्कर्ष काढण्यास कोणताही आधार नाही. खासकरून पुढचा मुद्दा लक्षात घेतल्यावर हे स्पष्ट होते.
तिसरे कारण असे, की परराष्ट्रीयांचे अंगण हे हेरोद या एदोमी राजाने स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याकरता आणि रोमी लोकांची खुशामत करण्यासाठी बांधले होते. हेरोदने सा.यु.पू. १८ किंवा १७ साली जरुबाबेलच्या मंदिराचे नविनीकरण हाती घेतले. दी अँकर बायबल डिक्शनरी असा खुलासा करते: “पश्चिमेकडील [रोमच्या] भव्य साम्राज्याच्या पारंपारिक आवडीनिवडींचे समाधान करण्याकरता . . . पूर्वेकडील शहरांतील मंदिरांपेक्षा मोठे मंदिर बांधण्याची आवश्यकता होती.” पण खुद्द मंदिराचे सर्व मोजमाप आधीपासूनच ठरलेले होते. वर उल्लेख केलेल्या शब्दकोशात असे सांगितले आहे: “मंदिराचे मोजमाप पूर्वीच्या [शलमोनाच्या व जरुबाबेलच्या] मंदिरांइतकेच ठेवणे भाग होते, पण ज्या पर्वतावर मंदिर उभारलेले होते त्याचे क्षेत्र निश्चित नव्हते, अर्थात ते वाढवण्यास हरकत नव्हती.” त्यामुळे हेरोदने या मंदिराच्या क्षेत्राचा विस्तार करून आधुनिक काळात परराष्ट्रीयांचे अंगण म्हटलेल्या जागेचे बांधकाम केले. अशाप्रकारची पार्श्वभूमी असलेल्या बांधकामाचे यहोवाच्या आत्मिक मंदिराच्या व्यवस्थेत प्रतिरूप असण्याची अपेक्षा करता येईल का?
चवथे कारण असे की परराष्ट्रीयांच्या अंगणात अंधळे, लुळे आणि सुंता न झालेले विदेशी—अगदी कोणीही येऊ शकत होते. (मत्तय २१:१४, १५) अर्थात सुंता न झालेल्या विदेश्यांपैकी देवाला अर्पणे वाहू इच्छिणाऱ्यांकरता हे अंगण सोयीस्कर होते हे खरे आहे. शिवाय, येशूनेही काही वेळा येथे लोकांना उपदेश दिला; तसेच दोन वेळा त्याने सराफांना व व्यापाऱ्यांना माझ्या पित्याच्या घराचा अनादर करू नका असे म्हणून येथून हाकलून दिले. (मत्तय २१:१२, १३; योहान २:१४-१६) तरीसुद्धा, यहूदी विश्वकोश (इंग्रजी) यात असे म्हटले आहे: “हे बाहेरील अंगण खरे पाहता, मंदिराचा भाग नव्हते. ही जागा पवित्र नव्हती आणि यात कोणीही प्रवेश करू शकत होता.”
पाचवे कारण म्हणजे, बार्कले एम. न्यूमन आणि फिलिप सी. स्टाईन यांच्या मत्तय शुभवर्तमानावरील मार्गदर्शिका (इंग्रजी) या पुस्तकात सांगितल्यानुसार, परराष्ट्रीयांच्या अंगणाच्या संदर्भात “मंदिर” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द मत्तय २७:५, ५१; लूक १:९, २१; योहान २:२०.
(हायएरॉन) “केवळ मंदिराच्या इमारतीला नव्हे तर मंदिराच्या सबंध क्षेत्राला सूचित करतो.” दुसरीकडे पाहता योहानाच्या मोठ्या लोकसमुदायाच्या दृष्टान्तात “मंदिर” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द (नेऑस) हा खास मंदिराच्या संदर्भात वापरलेला आहे. जेरूसलेमच्या मंदिराच्या संदर्भात हा शब्द बहुतेक वेळा परमपवित्र स्थान, मंदिराची इमारत किंवा मंदिराचा परिसर यास सूचित करतो. काही ठिकाणी त्याचे ‘पवित्रस्थान’ असेही भाषांतर करण्यात आले आहे.—मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवतात. ते आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध आहेत कारण त्यांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” त्यामुळे त्यांना देवाचे मित्र बनण्याकरता आणि मोठ्या संकटातून बचावण्याकरता नीतिमान घोषित केले जाते. (याकोब २:२३, २५) बऱ्याच प्रकारे ते इस्राएलमधील यहूदी मतानुसाऱ्यांसारखे आहेत जे नियमशास्त्राचे पालन करत होते व इस्राएली लोकांसोबत उपासना करत होते.
अर्थात, ते मतानुसारी आतल्या अंगणात, जेथे याजक सेवा करत होते तेथे सेवा करत नव्हते. आणि मोठ्या लोकमुदायाचे सदस्य देखील यहोवाच्या महान आत्मिक मंदिरातील आतल्या अंगणात प्रवेश करत नाहीत; हे अंगण यहोवाच्या ‘पवित्र याजकगणातील’ सदस्य पृथ्वीवर असताना त्यांच्या परिपूर्ण, नितीमान मानवी पुत्रत्वाच्या स्थितीला सूचित करते. (१ पेत्र २:५) पण स्वर्गातील वडिलाने योहानाला म्हटल्याप्रमाणे, मोठा लोकसमुदाय खरे पाहता मंदिराच्या परिसराबाहेर असलेल्या परराष्ट्रीयांच्या अंगणाच्या आत्मिक प्रतिरूपात नव्हे, तर मंदिरातच आहे. हा किती मोठा बहुमान आहे! आणि त्याच वेळेस, प्रत्येकाने सतत आध्यात्मिक व नैतिक शुद्धता कायम ठेवण्याची गरज यामुळे किती प्रकर्षाने जाणवते!
[३१ पानांवरील रेखाचित्र/चित्र]
शलमोनाचे मंदिर
१. मंदिराची इमारत
२. आतील अंगण
३. बाहेरील अंगण
४. मंदिराच्या अंगणाकडे जाणाऱ्या पायऱ्या