व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विकलांगतेचे प्रकार असीमित

विकलांगतेचे प्रकार असीमित

विकलांगतेचे प्रकार असीमित

ख्रिस्चन एका आफ्रिकन देशात राहत होता; त्याला काही सैनिकांनी पळवून नेले आणि सैन्यात भरती होण्याची जबरदस्ती केली. पण आपल्या बायबल-प्रशिक्षित विवेकाला ते पटत नसल्यामुळे त्याने याला नकार दिला. मग सैनिकांनी त्याला एका लष्करी छावणीत नेले आणि चार दिवस चोपल्यावर एकाने त्याच्या पायावर गोळी मारली. ख्रिस्चन कसाबसा दवाखान्यात पोहंचला खरा पण गुडघ्याखालचा त्याचा पाय कापावा लागला. दुसऱ्‍या एका आफ्रिकन देशात, शस्त्रधारी बंडखोरांनी लहान लहान मुलांचेही हात-पाय कापले आहेत. कंबोडियापासून बाल्कनपर्यंत आणि अफगानिस्तानपासून अंगोलापर्यंत जमिनीत पुरलेल्या सुरुंगांमुळे तरुण तसेच वृद्ध विकृत आणि विकलांग होत आहेत.

अपघातांमुळे आणि मधुमेहासारख्या आजारांमुळेही हानी होत आहेत. वातावरणातील विषारी पदार्थांमुळे देखील विकलांगता निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, एका पूर्व युरोपीय शहरामध्ये, एकमेकांच्या शेजारी असलेल्या प्रदेशात अनेक मुलांना जन्मतः एकच हात आहे. कोपरापुढे त्यांना फक्‍त एक ठेंगणा हात आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ही जननिक विकृती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. असेही असंख्य लोक आहेत ज्यांना हात-पाय आहेत तरीही ते अर्धांगवायू किंवा इतर आजारांमुळे विकलांग झाले आहेत. खरेच, विकलांगतेचे प्रकार असीमित आहेत.

विकलांगता कसलीही असली तरी एका व्यक्‍तीचे जीवन तिच्यामुळे उद्‌ध्वस्त होऊ शकते. ज्यून्यर जेव्हा २० वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा गुडघ्याखालील भाग त्याला गमवावा लागला. तो नंतर म्हणाला: “मला पुष्कळ भावनिक मनःस्ताप झाला होता. माझा पाय मला पुन्हा कधीच मिळणार नाही यासाठी मी खूप रडलो. काय करावं तेच मला कळत नव्हतं. मी खूप गोंधळून गेलो होतो.” परंतु कालांतराने, ज्यून्यरचीही ही मनोवृत्ती पूर्णपणे बदलली. तो बायबलचा अभ्यास करू लागला आणि तो अशा गोष्टी शिकला ज्यांमुळे त्याला सहन करायची शक्‍ती तर मिळालीच शिवाय याच पृथ्वीवर आनंदी भविष्याची आशा देखील मिळाली. तुम्हालाही एखादी विकलांगता असल्यास, ती आशा जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

तसे असल्यास, पुढील लेखही कृपया वाचा. त्यात दिलेली वचने तुम्ही स्वतःच्या बायबलमध्ये पडताळून पाहावीत असे आम्ही उत्तेजन देतो म्हणजे निर्माणकर्त्याने त्याच्या उद्देशाविषयी शिकणाऱ्‍यांसाठी व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणाऱ्‍यांसाठी कोणते भवितव्य ठेवले आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकाल.