व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता

उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता

“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन”

उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता

“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. (मत्तय ११:२८) ख्रिस्ती मंडळीच्या मस्तकाकडून मिळालेले हे किती दिलासा देणारे आमंत्रण आहे. (इफिसकर ५:२३) या शब्दांचा नीट विचार केल्यास, विसावा देणाऱ्‍या एका प्रमुख स्रोताची, अर्थात, ख्रिस्ती सभांमधील आपल्या आध्यात्मिक बंधू-बहिणींच्या सहवासाची आपल्याला खरोखर कदर वाटते. स्तोत्रकर्त्याशी आपण निश्‍चितच सहमत असू ज्याने गायिले: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तोत्र १३३:१.

उपासनेच्या त्या मेळाव्यांमधील आपले सहवासी सर्वात उत्तम आहेत आणि तेथील आध्यात्मिक वातावरण सुरक्षित आणि सुखकारक असते. म्हणूनच एका ख्रिश्‍चन तरुणीने म्हटले: “मी संपूर्ण दिवस शाळेत असते तेव्हा मी एकदम थकून जाते. पण आपल्या सभा, वाळंवटात पाण्याच्या झऱ्‍यासारख्या आहेत जेथे मला तजेला मिळतो आणि शाळेच्या दुसऱ्‍या दिवसासाठी शक्‍ती मिळते.” एका नायजेरियन युवतीने म्हटले: “मला हे दिसून आले आहे की, यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत जवळीक साधल्याने मला [यहोवासोबत] जवळचा नातेसंबंध ठेवायला मदत मिळते.”

यहोवाच्या साक्षीदारांचे स्थानीय राज्य सभागृह, समाजात खऱ्‍या उपासनेचे केंद्र या नात्याने परिणामकारक ठरते. बहुतेक ठिकाणी आठवड्यातून दोनदा तरी राज्य सभागृहात सभा भरवल्या जात असतात आणि बायबल विद्यार्थ्यांना तेथील सहवासाचा फायदा व्हावा म्हणून होता होईल तितक्या लवकर त्यांना हजर राहायला उत्तेजन दिले जाते.—इब्री लोकांस १०:२४, २५.

तातडीची गरज

परंतु, एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, सर्वच यहोवाच्या साक्षीदारांकडे चांगले राज्य सभागृह नाही. जगभर, राज्य प्रकाशकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे तातडीची गरज निर्माण झाली आहे. अद्यापही हजारो राज्य सभागृहांची गरज आहे खासकरून विकसनशील देशांमध्ये.—यशया ५४:२; ६०:२२.

उदाहरणार्थ: काँगोचे प्रजासत्ताक येथील राजधानीत २९० मंडळ्यांकरता फक्‍त १० राज्य सभागृहे होती. त्या देशात अनेक राज्य सभागृहे बांधण्याची तातडीची गरज होती. अंगोलात बहुतेक मंडळ्या उघड्यावर सभा भरवतात कारण राज्य सभागृहे सीमित आहेत. इतर अनेक देशांमध्ये अशी गरज आहे.

यास्तव, १९९९ पासून, मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या देशांमध्ये राज्य सभागृहांच्या बांधकामासंबंधी संघटित प्रयत्न करण्यात आले आहेत. अशा देशांमधील बांधकाम प्रकल्पांसाठी अनुभवी साक्षीदार स्वखुशीने आपली कौशल्ये उपयोगात आणण्याकरता पुढे आले आहेत. तसेच या प्रयत्नांना स्थानीय स्वयंसेवकांच्या स्वेच्छेची आणि उपलब्धतेची जोड मिळाल्यावर प्रोत्साहनदायक परिणाम मिळतात. या उलट, स्थानीय साक्षीदारांना मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाचा लाभ होत असतो. या सर्व गोष्टींमुळे ज्याच्या त्याच्या देशात राज्य सभागृहे बांधकामाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत मिळत आहे.

अशाप्रकारे राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी स्थानीय पद्धतींचा व साहित्यांचा उपयोग करून जमेल तशी व्यावहारिक मदत दिली जाते. राज्य सभागृहांची वाढती गरज भागवणे हेच तेवढे ध्येय नाही तर स्थानीय परिस्थितींनुरूप त्यांना सुस्थितीत ठेवण्याचा कार्यक्रम विकसित करणे हे ध्येय देखील आहे.—२ करिंथकर ८:१४, १५.

उत्तेजनात्मक विकास

उपासनेसाठी ही स्थळे उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे काय परिणाम झाला? २००१ सालाच्या सुरवातीला मलावीतील एका वृत्तात असे म्हटले होते: “या देशात जे साध्य झाले आहे ते खरोखर विलक्षण आहे. पुढील दोन महिन्यात आम्ही अतिरिक्‍त राज्य सभागृहांचे बांधकाम पूर्ण करू.” (चित्रे १ आणि २) टोगो येथे अलीकडील महिन्यांमध्ये स्वयंसेवकांनी अनेक साधी राज्य सभागृहे बांधली. (चित्र ३) स्वेच्छेने काम करायला पुढे येणाऱ्‍या स्वयंसेवकांमुळे मेक्सिको, ब्राझील आणि इतर देशांमध्ये साजेशी राज्य सभागृहे उपलब्ध करून देता आली.

राज्य सभागृह बांधले जाते तेव्हा यहोवाचे साक्षीदार स्थायी आहेत अशी स्थानीय लोकांना शाश्‍वती वाटते हे मंडळ्यांच्या लक्षात आले आहे. पुष्कळजण उपासनेचे योग्य ठिकाण मिळेपर्यंत साक्षीदारांसोबत सहवास ठेवायला मागेपुढे पाहत होते. मलावीतील नाफीसी मंडळीने असे वृत्त दिले: “आता आमचे एक चांगले राज्य सभागृह झाल्यापासून लोकांना उत्तम साक्ष मिळत आहे. त्यामुळे आम्हाला बायबल अभ्यास सुरू करायला सोपे जात आहे.”

बेनिनमधील क्राक मंडळीचे गतकाळातले राज्य सभागृह काही चर्चेसच्या पुढे जुन्या पद्धतीचे वाटत असल्यामुळे त्या मंडळीच्या सदस्यांनी बराच उपहास सहन केला. (चित्र ४) आता त्यांच्याजवळ एक नवीन उत्तम राज्य सभागृह असल्यामुळे खऱ्‍या उपासनेचे सभ्य परंतु आदरणीय पद्धतीने प्रतिनिधीत्व होत आहे. (चित्र ५) या मंडळीत ३४ राज्य प्रचारक होते आणि रविवारच्या सभांकरता सरासरी उपस्थिती ७३ होती परंतु राज्य सभागृहाच्या समर्पणाला ६५१ लोक उपस्थित राहिले होते. यातील बहुतेक लोक त्याच नगरातले रहिवासी होते आणि साक्षीदारांनी इतक्या कमी वेळात एक सभागृह बांधल्याचे पाहून ते खूप प्रभावित झाले होते. यासंबंधी झालेल्या वाढीचा विचार करता झिम्बाब्वे शाखेने लिहिले: “नवीन राज्य सभागृह बांधल्यावर सहसा एका महिन्याच्या आत उपस्थिती दुप्पट झाली.”—चित्रे ६ आणि ७.

होय, नवीन राज्य सभागृहे समर्पित ख्रिश्‍चनांकरता त्याचप्रमाणे आस्थेवाईक लोकांकरता आध्यात्मिक तजेला देणारी स्थळे बनतात. युक्रेनमधील एका स्थानीय मंडळीने आपले नवीन राज्य सभागृह वापरायला सुरू केल्यानंतर एका साक्षीदार स्त्रीने म्हटले, “आमच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. यहोवा आपल्या लोकांना कशी मदत करतो हे आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.”

[१०, ११ पानांवरील चौकट/चित्रे]

सढळ हाताने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता

जगभरातील नवीन राज्य सभागृहांची तातडीची गरज पूर्ण करण्यासंबंधाने होत असलेली जलद प्रगती पाहून यहोवाच्या साक्षीदारांना अत्यानंद होत आहे. अनेक देशांमध्ये यहोवाच्या उपासकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे, भविष्यात नवीन राज्य सभागृहे बांधण्याची गरज आहे. इतकेच काय तर, २००१ सेवा वर्षात दर आठवडी सरासरी ३२ नवीन मंडळ्या निर्माण होत होत्या! अशा मंडळ्यांना एकत्र येऊन उपासना करण्यासाठी जागेची आवश्‍यकता आहे.

त्यामुळे, हा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, ‘विशेषकरून आर्थिक तंगी असलेल्या देशांमध्ये नवीन राज्य सभागृहांच्या बांधकाम प्रकल्पांना आर्थिक मदत कोठून मिळते?’ याचे उत्तर असे आहे की, हे ईश्‍वरी पाठबळ आणि लोकांची उदारता यांचा परिणाम आहे.

दिलेल्या वचनानुसार यहोवा आपल्या सेवकांना पवित्र आत्मा देतो ज्यामुळे ते ‘चांगले ते करू शकतात, सत्कर्माविषयी धनवान असू शकतात, परोपकारी व दानशूर असू शकतात.’ (१ तीमथ्य ६:१८) देवाचा पवित्र आत्मा यहोवाच्या साक्षीदारांना हरएक तऱ्‍हेने अर्थात आपला वेळ, शक्‍ती, व्यक्‍तिगत मेहनत आणि इतर साधने ख्रिस्ती कार्यहालचालींसाठी देऊन राज्याच्या प्रचारकार्याला सहयोग देण्याची प्रेरणा देतो.

साक्षीदार व इतरजण उदार मनामुळे प्रेरित होऊन आर्थिक मार्गाने विकासाला व बांधकामाला हातभार लावतात. स्थानीय मंडळीचा नियमाने होणारा खर्च भागवण्याखेरीज ते पृथ्वीच्या इतर भागांमधील बांधकाम प्रकल्पांना मदत करतात.

प्रत्येक मंडळीत, “जगभरात होणाऱ्‍या कामासाठी अनुदान—मत्तय २४:१४” असे ठळकपणे लिहिलेल्या पेट्या असतात. ज्यांना इच्छा आहे ते या पेट्यांमध्ये स्वेच्छेने अनुदान टाकू शकतात. (२ राजे १२:९) लहान मोठ्या सर्व दानांची कदर केली जाते. (मार्क १२:४२-४४) हा निधी गरजेनुसार विविध मार्गांनी तसेच राज्य सभागृहांच्या बांधकामासाठीसुद्धा वापरला जातो. या निधींचा वापर अधिकाऱ्‍यांना पगार देण्यासाठी केला जात नाही कारण यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असे अधिकारी वगैरे नाहीतच.

जागतिक कार्यासाठी मिळणारे दान खरोखर त्यासाठी उपयोगात येते का? होय. मुलकी युद्धाने ग्रस्त असलेल्या लायबेरिया देशातील शाखेने असे वृत्त दिले की, बहुतांश स्थानीय साक्षीदारांना बेकारीला व गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा देशात यहोवाच्या लोकांना योग्य उपासना स्थळांची सोय कशी करता आली? शाखा दफ्तर म्हणते, “दुसऱ्‍या देशातील बांधवांनी सढळ हाताने दिलेल्या दानांचा उपयोग या कार्यासाठी केला जाईल. किती सुज्ञ व प्रेमळ योजना!”

स्थानीय बांधव आपल्या चार पैशांतूनही दान करतात. सिएरा लोन या एका आफ्रिकेतील देशाने असे वृत्त दिले: “या प्रयत्नांमागे स्थानीय बांधवांचाही हात आहे आणि राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी ते आपल्या परीने कसलीही मदत किंवा आर्थिक साहाय्य द्यायला आनंदाने तयार असतात.”

शेवटी, या बांधकामांमुळे यहोवाची स्तुती होते. लायबेरियातील बांधव उत्साहाने असे म्हणतात: “देशभरात ठिकठिकाणी उचित उपासना स्थळे बांधून झाल्यावर लोकांना कळेल की, खरी उपासना येथे कायमची स्थापली जाणार आहे तसेच देवाच्या महान नावाची प्रतिष्ठा व महत्ताही वाढेल.”