व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या प्रेमाचे तुम्हाला आकलन होते का?

देवाच्या प्रेमाचे तुम्हाला आकलन होते का?

देवाच्या प्रेमाचे तुम्हाला आकलन होते का?

“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही,” अशा शब्दात ईयोब नावाच्या एका मनुष्याने अपरिपूर्ण मानवाच्या दशेचे वर्णन केले. (ईयोब १४:१, २) ईयोब तेव्हा ज्या परिस्थितीतून चालला होता त्यामुळे त्याचे जीवन क्लेशाने व दुःखाने भरले होते. तुम्हालाही कधी ईयोबाप्रमाणे वाटले आहे का?

आपल्यासमोर कितीही अडचणी व समस्या आल्या तरी आपल्याला एक भक्कम आशा आहे जी देवाच्या करुणेवर व प्रीतीवर आधारित आहे. सर्व प्रथम, आपल्या दयाळू स्वर्गीय पित्याने मानवजातीची तिच्या पापमय स्थितीतून सुटका करण्यासाठी खंडणी बलिदानाची योजना केली. योहान ३:१६, १७ मध्ये येशू ख्रिस्ताने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला [येशूला] जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.”

तसेच, अपरिपूर्ण मानवांप्रती देवाचा दयाळुपणा पाहा. प्रेषित पौलाने म्हटले: “त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७) यावर जरा विचार करा! आपण अपरिपूर्ण मानव असलो तरीसुद्धा आपला प्रेमळ निर्माणकर्ता यहोवा देव याच्याशी व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडू शकतो.

तेव्हा, पूर्ण भरवशाने आपण आपल्या भवितव्याला सामोरे जाऊ शकतो; यहोवाला आपली काळजी आहे आणि आपल्याला अनंतकाळ फायदा होत राहील अशी प्रेमळपणे त्याने योजना देखील केली आहे, हे आपल्याला माहीत आहे. (१ पेत्र ५:७; २ पेत्र ३:१३) त्याचे वचन, बायबल याचा अभ्यास करण्याद्वारे आपल्या प्रेमळ देवाविषयी आणखी शिकून घेण्याची तीव्र प्रेरणा आपल्याला झाली पाहिजे.