व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव कोण आहे हे आपण जाणले पाहिजे

देव कोण आहे हे आपण जाणले पाहिजे

देव कोण आहे हे आपण जाणले पाहिजे

निरभ्र आकाशात कोंदलेले असंख्य तारे पाहून तुम्ही रोमांचित होत नाही का? रंगीबेरंगी फुलांचा सुगंध आपल्याला प्रसन्‍न करीत नाही का? पक्ष्यांची मंजूळ गाणी आणि वाऱ्‍याच्या स्पर्शाने शहारून जाणाऱ्‍या पानांचा आवाज आपल्याला ऐकावासा वाटत नाही का? समुद्रात मुक्‍तविहार करणाऱ्‍या शक्‍तिशाली देवमाशांना आणि इतर प्राण्यांना पाहायाला आपल्याला किती आवडते! या शिवाय, मानव प्राण्याचा विचार करा. त्याला विवेकासहित निर्माण करण्यात आले आहे तसेच त्याचा मेंदूही अतिशय क्लिष्ट आहे. तुमच्या मते या सर्व अद्‌भुत गोष्टी कशा अस्तित्वात आल्या?

पुष्कळ लोकांचा असा विश्‍वास आहे, की हे सर्व आपोआप आले. हे जर सर्व असेच आले असेल तर मानव देवावर विश्‍वास का ठेवतो? विविध रसायनांच्या मिश्रणानंतर अचानक तयार झालेल्या प्राण्यांना अध्यात्माची गरज का वाटते?

“मानवी स्वभावात धर्म अगदी खोल मुळावला आहे व प्रत्येक आर्थिक स्थरांतील व शैक्षणिक पार्श्‍वभूमीच्या लोकांमध्ये तो आहे.” प्राध्यापक अलिस्टर हर्डी यांनी संशोधनानंतर काढलेला हा निष्कर्ष मानवाचा आध्यात्मिक स्वभाव (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात सादर केला आहे. मेंदूवर अलीकडेच केलेल्या प्रयोगांनंतर काही न्यूरोशास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे, की धर्माचे पालन करण्यासाठी मानवांची “जननिकरीत्या घडण” करण्यात आली असावी. केवळ देवच वास्तविकता आहे का? (इंग्रजी), या पुस्तकात असे म्हटले आहे: “मानवजातीची सुरवात झाल्यापासूनच्या प्रत्येक संस्कृतीत व प्रत्येक युगात . . . धर्माद्वारे जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”

सुमारे २,००० वर्षांपूर्वी एका विद्वानाने कोणता निष्कर्ष काढला ते पाहा. त्याने लिहिले: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) खरे तर, बायबलच्या सर्वात पहिल्या वचनात म्हटले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.”—उत्पत्ति १:१.

पण, हा देव कोण आहे? मानवजातीकडे या प्रश्‍नाची विविध उत्तरे आहेत. योशी नावाच्या एका जपानी किशोरवयीनाला देव कोण आहे असा प्रश्‍न विचारल्यावर तो म्हणाला: “मला नक्की माहीत नाही. मी बौद्ध आहे, आणि देव कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे असं मला आजपर्यंत कधी वाटलं नाही.” परंतु योशीने कबूल केले, की पुष्कळ लोक बुद्धालाच देव मानतात. साठीत असलेले निक, व्यवसायाने एक व्यापारी आहेत; त्यांचा देवावर विश्‍वास आहे; त्यांच्या मते देव म्हणजे एक सर्वशक्‍तिमान शक्‍ती. देवाविषयी काही स्पष्टीकरण देण्यास सांगितले असता, खूप वेळपर्यंत शांत राहिल्यावर ते म्हणाले: “हा जरा कठीणच प्रश्‍न आहे. मी फक्‍त इतकंच म्हणू शकतो, की देव आहे. कुठेतरी नक्कीच अस्तित्वात आहे.”

काही लोक ‘निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्‍ती व सेवा करतात.’ (रोमकर १:२५) देव आपल्यापासून खूप दूर आहे असा कोट्यवधी लोकांचा विश्‍वास असल्यामुळे ते मृत पूर्वजांची उपासना करतात. हिंदू धर्मात, अनेक देवी देवता आहेत. येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या दिवसांत ज्यूपिटर [झियुस], मर्क्युरी [हर्मीस] यासारख्या वेगवेगळ्या दैवतांची उपासना केली जात होती. (प्रेषितांची कृत्ये १४:११, १२) ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक चर्चेसमध्ये, त्रैक्यत्वाची शिकवण दिली जाते, ज्यात देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे तिन्ही मिळून एक आहेत, असा विश्‍वास केला जातो.

होय, बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे “बरीच दैवते व बरेच प्रभु” आहेत. परंतु ते पुढे असेही म्हणते, की “तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो.” (१ करिंथकर ८:५, ६) होय, एकच खरा देव आहे. पण तो कोण आहे? तो कसा आहे? या प्रश्‍नांची उत्तरे आपण जाणून घेणे आवश्‍यक आहे. याच देवाला प्रार्थना करताना येशू म्हणाला होता: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) देवाविषयीचे सत्य जाणून घेण्यावरच आपले चिरकालिक कल्याण निर्भर आहे असा विश्‍वास बाळगण्यासाठी आपल्याजवळ ठोस कारण आहे.

[३ पानांवरील चित्र]

या सर्व गोष्टी कशा अस्तित्वात आल्या?

[चित्राचे श्रेय]

देवमासा: Courtesy of Tourism Queensland

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: Index Stock Photography © २००२