व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“समुद्राच्या तळाशी गेले”

“समुद्राच्या तळाशी गेले”

“समुद्राच्या तळाशी गेले”

“गहिऱ्‍या जलांनी त्यांना गडप केले आहे; ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत.”

या शब्दांत, मोशेने व इस्राएली लोकांनी तांबड्या समुद्रातून मुक्‍तता मिळवल्यावर व त्यांचा पाठलाग करणाऱ्‍या इजिप्शियन शत्रूंचा सर्वनाश होताना पाहिल्यावर गीत गाऊन विजयोत्सव साजरा केला.—निर्गम १५:४, ५.

ती अनोखी घटना पाहणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला निश्‍चितच एक धडा शिकायला मिळाला असावा. कोणीही यहोवाच्या अधिकाराला ललकारून किंवा त्याचा प्रतिकार करून जिवंत राहू शकत नाही. या घटनेनंतर काही महिन्यांतच इस्राएल लोकांच्या काही प्रमुखांनी जसे की कोरह, दातान, अबीराम आणि त्यांच्या २५० समर्थकांनी मोशे व अहरोन यांनी देवाने दिलेल्या अधिकाराला ललकारले.—गणना १६:१-३.

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार, मोशेने इस्राएली लोकांना बंडखोर लोकांच्या छावण्यांपासून दूर जायला सांगितले. दातान व अबीराम आपल्या घरांतील सदस्यांसह अडेलतट्टूप्रमाणे आपल्या मनोवृत्तीत बदल करण्यास राजी नव्हते. मोशेने मग म्हटले, की यहोवा आपल्या पद्धतीने सर्वांना स्पष्टपणे दाखवून देईल की या लोकांनी “परमेश्‍वराला तुच्छ मानिले आहे.” आणि अगदी त्याच क्षणी, त्या बंडखोर लोकांच्या पायाखालची जमीन दुभंगली. “ह्‍या प्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले.” कोरह आणि इतर बंडखोरांचे काय झाले? “परमेश्‍वरापासून अग्नि निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्‍या दोनशे पन्‍नास पुरुषांना भस्म केले.”—गणना १६:२३-३५; २६:१०.

फारो आणि त्याच्या सैन्याचा तसेच अरण्यात बंड करणाऱ्‍या सर्व लोकांचा नाश झाला कारण त्यांनी यहोवाच्या अधिकाराला स्वीकारले नाही आणि यहोवाला आपल्या लोकांच्या हिताची काळजी आहे ही गोष्ट त्यांनी जाणली नाही. त्यामुळे, या कठीण काळात, ज्यांना यहोवाकडून सुरक्षा हवी आहे त्यांनी, यहोवाला ‘सर्वसमर्थ’ आणि ‘परात्पर’ म्हणून स्वीकारून त्याच्याविषयी शिकून त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना यहोवाच्या पुढील अभिवचनांतून आश्‍वासन मिळते: “तुझ्या बाजूस सहस्रावधि पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधि पडले, तरी ती तुला भिडणार नाही; मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्‍वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे.”—स्तोत्र ९१:१, ७-९.