व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेप्टुआजिंटमध्ये देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे

सेप्टुआजिंटमध्ये देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे

सेप्टुआजिंटमध्ये देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे

यहोवा हे देवाचे नाव יהוה (YHWH) या चार इब्री अक्षरांनी सूचित केले जाते. हे नाव सेप्टुअजिंट भाषांतरात आढळत नाही असा बऱ्‍याच काळापासून समज होता. त्यामुळे, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी इब्री शास्त्रवचनांतून उतारे घेतले तेव्हा त्यांनी देवाचे नाव आपल्या लिखाणात वापरले नसावे असा तर्कवाद आतापर्यंत केला जायचा.

मागच्या जवळजवळ शंभर वर्षांदरम्यान लागलेल्या निरनिराळ्या शोधांतून असे निष्पन्‍न झाले की देवाचे नाव सेप्टुअजिंटमध्ये होते. त्याविषयी एक वृत्त म्हणते: “ग्रीक भाषिक यहुद्यांना देवाचे पवित्र नाव जतन करण्याचे इतके महत्त्व वाटत होते, की इब्री बायबलचा ग्रीक भाषेत अनुवाद करताना त्यांनी ग्रीक मजकुरात देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे जशीच्या तशी उतरवली.”

डावीकडे दाखवलेला पपायरस कागदाचा तुकडा अशा कित्येक प्राप्त झालेल्या उदाहरणांपैकी केवळ एक उदाहरण आहे. ऑक्सिऱ्‍हिंकस, इजिप्त येथे सापडलेला, व ३५२२ हा क्रमांक देण्यात आलेला हा तुकडा सा.यु. पहिल्या शतकातला आहे. * त्याचा आकार २.५ बाय ४ इंच इतका असून, त्यात ईयोब ४२:११, १२ यातला एक उतारा आढळतो. देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे, ज्यांभोवती वर्तुळ केले आहे, ती प्राचीन इब्री अक्षरांपैकी आहेत. *

तर मग ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील सुरवातीच्या प्रतींत देवाचे नाव होते का? विद्वान जॉर्ज हॉवर्ड यांनी म्हटले: “आरंभीचे चर्च ज्याला पवित्र शास्त्रवचने मानत होते त्या ग्रीक बायबलच्या [सेप्टुअजिंट] प्रतींत ज्याअर्थी देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे लिहिली जात होती त्याअर्थी नव्या कराराच्या लेखकांनी शास्त्रवचनांतून उद्धृत करताना ती चार इब्री अक्षरे बायबलच्या मजकुरात ठेवली असतील असे आपण म्हणू शकतो.” पण त्यानंतर काही काळातच या नक्कलकारांनी देवाच्या नावाऐवजी कायरीओस (प्रभू) आणि थिओस (देव) यांसारखे पर्यायी शब्द वापरण्यास सुरवात केली असे दिसते.

[तळटीपा]

^ परि. 4 ऑक्सिऱ्‍हिंकस येथे सापडलेल्या पपायरस कागदांविषयीच्या अधिक माहितीकरता टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९२, (इंग्रजी) पृष्ठे २६-८ पाहा.

^ परि. 4 प्राचीन ग्रीक भाषांतरांतील देवाच्या नावाची इतर उदाहरणे पाहण्याकरता पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर—संदर्भांसहित (इंग्रजी) यातले अपेंडिक्स १ सी पाहा.

[३० पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of the Egypt Exploration Society