व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तू सद्‌गुणी स्त्री आहेस”

“तू सद्‌गुणी स्त्री आहेस”

“तू सद्‌गुणी स्त्री आहेस”

हे शब्द एका तरुण मवाबी स्त्रीला उद्देशून म्हटलेले आहेत. ती एक विधवा होती आणि तिचे नाव रूथ होते; ती नामी नावाच्या एका इस्राएली स्त्रीची सून होती. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी, ती इस्राएलमध्ये राहत होती; त्या काळी शास्त्यांचा अंमल होता; आणि रूथने एक सद्‌गुणी स्त्री म्हणून नाव कमावले होते. (रूथ ३:११) तिने हे नाव कसे कमावले होते? तिच्या उदाहरणाचा कोणाला फायदा होऊ शकतो?

रूथ, “आळशी बसून अन्‍न” खाणाऱ्‍यांपैकी नव्हती; शेतामध्ये पीक गोळा करण्याचे कष्टाचे काम करण्याच्या तिच्या कामासूपणामुळे तिने उत्तम नाव कमावले होते. तिला कमी काम करण्याचे सांगितले असताही ती कष्ट करीत राहिली; तिला जितके काम करायचे होते त्यापेक्षा अधिक तिने केले. एका प्रशंसनीय, सद्‌गुणी व परिश्रमी पत्नीचे बायबलमध्ये दिलेले वर्णन तिला अगदी पूर्णपणे शोभते.—नीतिसूत्रे ३१:१०-३१; रूथ २:७, १५-१७.

रूथच्या आध्यात्मिक गुणांमुळे—नम्रता, आत्म-त्यागी वृत्ती आणि एकनिष्ठ प्रीती यांमुळेच—तिने लोकांमध्ये उत्तम नाव कमावले होते. तिने आपले आईवडील आणि आपले गाव सोडले आणि विवाहामुळे मिळणाऱ्‍या सुरक्षिततेची काहीच आशा नसताना ती तिची सासू नामी हिच्याशी शेवटपर्यंत जडून राहिली. याशिवाय, तिने तिच्या सासूचा देव, यहोवा याची सेवा करण्याची इच्छा व्यक्‍त केली. तिच्या मोलावर भर देताना शास्त्रवचनांतील अहवाल सांगतो, की ती “[नामीला] सात पुत्रांहून अधिक” होती.—रूथ १:१६, १७; २:११, १२; ४:१५.

रूथच्या वेळेच्या लोकांमध्ये तिचा नावलौकिक होता ही कौतुकास्पद गोष्ट असली तरी, देवाला तिचे गुण पसंत पडले आणि त्याने तिला येशू ख्रिस्ताची पूर्वज होण्याचा बहुमान दिला हे जास्त महत्त्वाचे आहे. (मत्तय १:५; १ पेत्र ३:४) रूथ ही केवळ ख्रिस्ती स्त्रियांसाठीच नव्हे तर यहोवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्‍या सर्वांसाठीच किती उत्तम उदाहरण आहे!