व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवाच्या समस्या कधी संपतील का?

मानवाच्या समस्या कधी संपतील का?

मानवाच्या समस्या कधी संपतील का?

“जगाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक दारिद्र्‌यात आहेत, १३० कोटी लोक दिवसाला ५० रुपयांपेक्षा कमी उत्पन्‍नात गुजराण करतात, १०० कोटी निरक्षर आहेत, १३० कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आणि १०० कोटी दररोज उपाशी पोटी राहतात.” आयर्लंडच्या एका वृत्तात जागतिक स्थितीविषयी असे म्हटले आहे.

जगाच्या समस्यांकरता कायमस्वरूपी उपाय शोधण्यात मानव असमर्थ ठरला आहे याचे हे किती दुःखदायक विधान! त्या वृत्तान्तात वर्णन केलेल्यांपैकी बहुतांश लोक असहाय स्त्रिया व बालके आहेत हे कळल्यावर तर अधिकच मन तुटते. आज, म्हणजे या २१ व्या शतकात देखील, मानवी हक्कांपासून “असंख्य लोकांना दररोज वंचित केले जाते” ही चकित करणारी गोष्ट नाही का?—जगातील बालकांची स्थिती २००० (इंग्रजी).

“एकाच पिढीत एक नवीन जग”

संयुक्‍त राष्ट्रे बाल निधी, या संस्थेने असा आत्मविश्‍वास प्रकट केला आहे की, ‘या अत्याचारांमुळे संपूर्ण जगभर निर्माण झालेली निराशाजनक स्थिती बदलता येईल.’ या संघटनेचे असे म्हणणे आहे की, या गरीब कोट्यवधी मुलांना सहन करावी लागणारी भयंकर परिस्थिती “अनिवार्य किंवा अटळ नाही.” उलट, त्यांनी “एकाच पिढीत एक नवीन जग वास्तवात उतरवण्याचे सर्व लोकांना” आवाहान दिले आहे. हे, सर्व मानवजातीकरता “गोरगरिबी आणि भेदभाव, हिंसा आणि रोगराई यांपासून मुक्‍तता” देणारे जग असेल.

अशा भावना व्यक्‍त करणाऱ्‍यांना, “सतत चालू असलेल्या संघर्षांचे व संकटप्रसंगांचे” दुष्परिणाम काढून टाकण्यासाठी आजही काळजी करणारे लोक प्रचंड मदत करतात यातून प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, चर्नोबिल बाल प्रकल्पाने “आण्विक अवपातामुळे कर्करोग झालेल्या शेकडो बालकांची पीडा कमी करण्यास मदत केली आहे.” (दि आयरिश एक्झामिनर, एप्रिल ४, २०००) लहानमोठ्या मदत संस्थांमुळे युद्धांना व विपत्तींना बळी पडलेल्या असंख्य लोकांच्या जीवनात प्रचंड फरक पडतो.

पण असे असूनही, मदत कार्यांमध्ये गोवलेले हे लोक वास्तववादी असतात. त्यांना माहीत असते की, लोकांना सामना कराव्या लागणाऱ्‍या समस्या “दहा वर्षांआधी होत्या त्यापेक्षा अधिक व्याप्त आणि मुळावलेल्या आहेत.” आयरिश धर्मार्थ संस्थेचे मुख्य अध्यक्ष, डेव्हिड बेग म्हणतात की, मोझांबिकमध्ये पूर आला तेव्हा “कामगारांनी, समर्थकांनी आणि दान देणाऱ्‍यांनीही उत्तम साथ दिली.” पण ते पुढे म्हणतात की, “आम्ही एकट्याने या मोठमोठ्या विपत्तींमुळे होणाऱ्‍या नुकसानाची भरपाई करू शकत नाही.” आफ्रिकेतील मदत कार्याविषयी त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले: “आशा बाळगण्यासाठी असलेली एक-दोन कारणे देखील मिणमिणत्या दिव्यांसारखी आहेत.” त्यांचे हे शब्द जागतिक परिस्थितीचे योग्यपणे वर्णन करतात हे अनेकांना पटेल.

“एकाच पिढीत नवीन युग” पाहण्याची ही आशा खरी ठरेल का? सध्या मदत देण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते खरोखर प्रशंसनीय आहेत; परंतु न्यायी आणि शांतिमय नवीन जगाच्या आणखी एका शक्यतेचा विचार करणे शहाणपणाचे असेल. या शक्यतेचा उल्लेख बायबलमध्ये केला आहे; पुढील लेखात आपण त्याविषयी अधिक पाहूया.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठ ३, मुले: UN/DPI Photo by James Bu