व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची उपासना “आत्म्याने” करा

देवाची उपासना “आत्म्याने” करा

देवाची उपासना “आत्म्याने” करा

“तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?”—ययशया ४०:१८

कदाचित तुम्हाला मनापासून अशी खात्री वाटत असेल की, देवाची उपासना करण्यासाठी चित्रांचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे, अदृश्‍य तसेच निर्गुण व निराकार असलेल्या प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाशी तुमचे नाते अधिक घनिष्ठ होते असेही तुम्हाला वाटेल.

परंतु, आपल्याला वाटेल त्या पद्धतीने देवाची उपासना करायची मोकळीक आपल्याला आहे का? स्वीकारणीय आणि अस्वीकारणीय काय आहे हे ठरवणारा स्वतः देवच असू नये का? देवाला याविषयी काय वाटते त्याचे स्पष्टीकरण येशूने देत म्हटले: “मार्ग मी आहे! सत्य मी आहे! जीवन मी आहे; माझ्याद्वारे आल्याखेरीज कुणालाही पित्याकडे जाता येत नाही.” (योहान १४:६) * याच शब्दांवरून दिसून येते की, चित्रे व इतर पूज्य वस्तूंचा वापर निषिद्ध आहे.

होय, यहोवा देवाला स्वीकृत असलेली एक विशिष्ट प्रकारची उपासना आहे. आणि ती कोणती आहे? आणखी एके प्रसंगी येशूने म्हटले: “आत्मा नि सत्य यांनी युक्‍त अशी पित्याची उपासना खरे भक्‍त करतील अशी वेळ येत आहे—नव्हे आलीच आहे! अशाच भक्‍तांनी आपली उपासना करावी अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे. जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्मा नि सत्य यांनी युक्‍त अशी उपासना करायला हवी!”—योहान ४:२३, २४.

देव “आत्मा आहे” तर मग भौतिक प्रतिमेने त्याचे चित्रण करणे शक्य आहे का? नाही. एखादे चित्र मनावर कितीही छाप पाडणारे असले तरी देवाच्या वैभवाशी त्याची तुलना कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे, देवाची प्रतिमा त्याचे खरे प्रतिनिधीत्व करूच शकत नाही. (रोमकर १:२२, २३) एखाद्या व्यक्‍तीने कोणत्याही मानव-निर्मित चित्राद्वारे देवाकडे पोहंचण्याचा प्रयत्न केला तर ती ‘सत्याने उपासना’ करत आहे असे म्हणता येईल का?

बायबलची स्पष्ट शिकवण

देवाच्या नियमशास्त्रात प्रतिमांची उपासना करण्याला स्पष्टपणे मनाई आहे. दहा आज्ञांमधील दुसरी आज्ञा अशी होती: “स्वतःसाठी कोरलेली मूर्ती घडवू नकोस, वर स्वर्गातल्या, खाली जमिनीवरल्या किंवा जमिनीखालच्या पाण्यातल्या कशाचीही कोणत्याच प्रकारची प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नको, त्यांची पूजा करू नको.” (प्रयाण [निर्गम] २०:४, ५) प्रेरित ख्रिस्ती शास्त्रवचनांमध्येही अशी आज्ञा दिली आहे: “मूर्तिपूजा अजिबात टाळा.”—१ करिंथ १०:१४.

पुष्कळजण असे म्हणतात हे खरे आहे की, प्रतिमांचा उपयोग करणे मूर्तिपूजा नाही. उदाहरणार्थ, ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती सहसा मान्य करत नाहीत की, ते ज्या चित्रांपुढे नमन करतात, गुडघे टेकतात आणि प्रार्थना करतात त्यांची ते उपासना करतात. एका ऑर्थोडॉक्स पाळकाने लिहिले: “[चित्रे] पवित्र वस्तू आहेत व त्यांच्यामध्ये दाखवलेल्या गोष्टींना आम्ही पूज्य मानतो म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो.”

तरीपण प्रश्‍न येतोच की, अशा अप्रत्यक्ष पूजेकरता मूर्तींचा उपयोग करण्याला देव मान्यता देतो का? अशा प्रथेला बायबलमध्ये कोठेही संमती दिलेली नाही. इस्राएल लोकांनी वासराची प्रतिमा तयार करून ती यहोवाबद्दल आदर व्यक्‍त करण्यासाठी तयार केली असा दावा केला तेव्हा यहोवाने कडक शब्दांत नापंसती व्यक्‍त केली व तो धर्मत्याग होता असे म्हटले.—प्रयाण ३२:४-७.

दडलेला धोका

उपासनेत मूर्त वस्तूंचा उपयोग करणे धोक्याचे आहे. कारण अशाने त्या वस्तूद्वारे प्रतिनिधीत्व केल्या जाणाऱ्‍या देवाची उपासना करण्याऐवजी त्या वस्तूची उपासना करण्याच्या मोहात लोक सहजासहजी पडू शकतात. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, ते चित्रच मूर्तिपूजेचे केंद्र बनते.

इस्राएलाच्या काळात ही गोष्ट अनेक वस्तूंच्या बाबतीत खरी ठरली. उदाहरणार्थ, रानांतून प्रवास करताना मोशेने काश्‍याचा एक सर्प बनवला. सुरवातीला, खांबावरील सर्पाची प्रतिमा लोकांना बरे करण्याचे साधन होती. ज्यांना सर्पदंशाची शिक्षा झाली होती ते या काश्‍याच्या सर्पाकडे पाहून देवाची मदत मिळवू शकत होते. परंतु, वाग्दत्त देशात स्थायिक झाल्यावर, त्यांनी याची एक मूर्तीच बनवली; जणू, काश्‍याच्या सर्पाकडे बरे करण्याची शक्‍ती होती. ते त्याच्यापुढे होमहवन करू लागले आणि त्यांनी त्याला नहुश्‍तान हे नावसुद्धा दिले.—गणना २१:८, ९; २ राजे १८:४.

इस्राएलांनी शत्रुंना पराजित करण्यासाठी कराराच्या कोशाचा उपयोग केला आणि त्याचे भयंकर परिणाम घडले. (१ शमुवेल ४:३, ४; ५:११) तसेच यिर्मयाच्या दिवसांमध्ये, जेरूसलेमच्या नागरिकांना मंदिराची जास्त काळजी होती, तेथे उपासना केल्या जाणाऱ्‍या देवाची नाही.—यिर्मया ७:१२-१५.

देवाच्या ऐवजी वस्तूंची उपासना करण्याची प्रवृत्ती आजही दिसून येते. संशोधक, व्हीताली इव्हानयिच पेत्रेन्को म्हणतात: “ते चित्र . . . उपासनेची वस्तू बनते आणि त्यात मूर्तिपूजेचाही धोका असतो . . . ही मुळात मूर्तिपूजक कल्पना, प्रचलित विश्‍वासांद्वारे चित्रांची उपासना करण्यामध्ये सामील करण्यात आली आहे हे आपण कबूल केले पाहिजे.” त्याचप्रमाणे, ग्रीक ऑर्थोडॉक्स पाळक, देमेत्रिओस कोन्स्तानतलोस ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चला समजण्याचा प्रयत्न (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात: “एक ख्रिस्ती व्यक्‍ती सहजपणे चित्राला उपासनेची वस्तू बनवू शकतो.”

उपासना धार्मिक चित्रांची केली जात नसून ती चित्रे उपासनेतील केवळ साधने आहेत असे म्हणणे योग्य नाही. का? मरिया किंवा “संतांची” काही विशिष्ट चित्रे, दीर्घ काळाआधी मृत झालेल्या त्याच व्यक्‍तींच्या इतर चित्रांपेक्षा अधिक पूज्य आणि परिणामकारक मानली जात नाहीत का? उदाहरणार्थ, टीनोस, ग्रीस येथील मरियेच्या चित्राचे काही ऑर्थोडॉक्स लोक भक्‍त आहेत तर उत्तर ग्रीसच्या सुमेला येथील मरियेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या मरियेच्या चित्राचे तितकेच विश्‍वासू भक्‍त आहेत. दोन्ही गट असा विश्‍वास करतात की, त्यांचे धार्मिक चित्र श्रेष्ठ असून त्यामुळे अधिक चमत्कार घडतात; पण दोन्ही गटांची चित्रे दीर्घ काळाआधी मृत झालेल्या एकाच व्यक्‍तीचे प्रतिनिधीत्व करतात. अशाप्रकारे, विशिष्ट चित्रांना शक्‍ती असल्याचे लोक व्यवहारात खरे मानतात व त्यांची उपासना करतात.

“संत” किंवा मरियेला प्रार्थना?

परंतु, मरीया किंवा “संत” या व्यक्‍तींना पूज्य मानणे कितपत योग्य आहे? सैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूने अनुवाद ६:१३ येथील वचनाचा उल्लेख करून म्हटले: “तुझा देव प्रभू याच्याच पाया पड आणि केवळ त्याचीच सेवा कर.” (मत्तय ४:१०) पुढे त्याने असेही म्हटले की, खरे उपासक केवळ “पित्याची” उपासना करतील, इतर कोणाचीही नाही. (योहान ४:२३) प्रेषित योहान एका देवदूताची उपासना करणार होता तेव्हा देवदूताने त्याला अडवून म्हटले: “असे करू नको . . . नमन देवाला कर.”—प्रकटीकरण २२:९.

येशूची पृथ्वीवरील माता, मरीया किंवा काही विशिष्ट “संत” यांना प्रार्थना करून आपल्या वतीने देवाला विनंती करायला सांगणे उचित आहे का? याबाबतीत बायबलचे थेट उत्तर असे आहे: “देव व मानवजात यांना जोडणारे ख्रिस्त येशू हे एकच मध्यस्थ आहेत.”—१ तीमथ्य २:५.

देवासोबतच्या नातेसंबंधाचे रक्षण करा

उपासनेत चित्रांचा उपयोग करणे हे बायबलच्या शिकवणीच्या अगदी स्पष्टपणे विरोधात असल्यामुळे त्या आधारावर देवाची संमती लोकांना मिळू शकणार नाही आणि त्यांचे तारण होणार नाही. त्याउलट, एकमेव खऱ्‍या देवाचे ज्ञान घेणे, त्याच्या अतुलनीय व्यक्‍तिमत्त्वाची ओळख करून घेणे आणि त्याचे उद्देश व मानवांबरोबरील त्याचे व्यवहार जाणून घेणे या गोष्टींमुळे सार्वकालिक जीवन मिळू शकेल असे येशूने म्हटले. (योहान १७:३) ज्या चित्रांना दृष्टी नाही, स्पर्शज्ञान नाही, वाचा नाही ती देवाला जाणण्यासाठी व स्वीकारणीय पद्धतीने त्याची उपासना करण्यासाठी आपली मदत करू शकत नाहीत. (स्तोत्र ११५:४-८) हे महत्त्वपूर्ण शिक्षण, केवळ देवाचे वचन, बायबल याचा अभ्यास केल्याने मिळू शकते.

धार्मिक चित्रांची उपासना केल्याने काही फायदा प्राप्त होत नाही शिवाय ते आध्यात्मिकरित्या धोकेदायकही ठरू शकते. ते कसे? सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, यामुळे यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात फूट पडू शकते. देवाला “तिरस्कारणीय मूर्तींच्या नादाने चिडीस आणलेल्या” इस्राएलांविषयी त्याने म्हटले: “मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन.” (अनुवाद ३२:१६, २०, द न्यू अमेरिकन बायबल) देवासोबतचा नातेसंबंध पुन्हा बनवण्यासाठी त्यांना ‘पापी मूर्तींचा त्याग करावा’ लागणार होता.—यशया ३१:६, ७, एनएबी.

म्हणूनच शास्त्रवचनातील हा सल्ला किती योग्य आहे: “मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.”—१ योहान ५:२१, द होली बायबल मराठी—आर. व्ही.

[तळटीप]

^ परि. 4 अन्यथा सूचित नसल्यास येथे दिलेले सर्व उतारे मराठी कॉमन लँग्वेज बायबलमधले आहेत.

[६ पानांवरील चौकट]

“आत्म्याने” उपासना करण्यासाठी मदत केलेले

ओलिव्हेरा ही देवभक्‍त, अल्बेनियातील ऑर्थोडॉक्स चर्चची सदस्या होती. त्या देशात १९६७ साली धर्मावर बंदी आली तेव्हा ओलिव्हेरा गुप्तपणे आपले धार्मिक विधी पाळत राहिली. तिला फार कमी पगार होता तरीपण पुष्कळसा पैसा ती सोन्याचांदीच्या प्रतिमा, धूप आणि मेणबत्त्या खरेदी करण्यात घालवत असे. या गोष्टी ती आपल्या बिछान्याखाली लपवून ठेवायची आणि जवळच एका खुर्चीवर झोपायची कारण कोणी त्या वस्तू पाहील किंवा चोरील अशी तिला भीती वाटायची. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला यहोवाचे साक्षीदार तिला भेटले तेव्हा त्यांच्या संदेशात बायबलचे सत्य तिला स्पष्टपणे जाणवले. खरी उपासना ‘आत्म्याने’ करण्याविषयी बायबल काय म्हणते हे तिने पाहिले आणि धार्मिक चित्रांचा उपयोग करण्याविषयी देवाला काय वाटते हे देखील तिला कळाले. (योहान ४:२४, मराठी कॉमन लँग्वेज) तिच्यासोबत अभ्यास करणाऱ्‍या साक्षीदार स्त्रीला हे दिसू लागले की, ती ओलिव्हेराच्या घरी येत असे त्या प्रत्येक वेळी तिच्या प्रतिमा कमी होत होत्या. शेवटी असे झाले की, एकही धार्मिक चित्र तिच्याजवळ नव्हते. बाप्तिस्मा घेतल्यावर ओलिव्हेरा म्हणाली: “आज, या निरुपयोगी चित्रांपेक्षा मला यहोवाचा पवित्र आत्मा मिळाला आहे. त्या आत्म्याला माझ्यापर्यंत पोहंचण्याकरता चित्रांची गरज नाही याचा मला खूप आनंद वाटतो.”

ग्रीसमधील लेसव्होस बेटावर राहणारी अथीना, ऑर्थोडॉक्स चर्चची फार उत्साही सदस्या होती. ती गायन मंडळाची सदस्या देखील होती आणि चित्रांचा उपयोग करण्यासारख्या अनेक धार्मिक परंपरांचे काटेकोरपणे पालन करत होती. यहोवाच्या साक्षीदारांनी अथीनाला हे समजायला मदत केली की, तिला शिकवलेल्या सर्व गोष्टी बायबलनुसार नव्हत्या. यामध्ये उपासनेकरता वापरण्यात येणारी चित्रे आणि क्रॉस यांचाही समावेश होता. परंतु, या धार्मिक वस्तूंचा उगम कोठून झाला हे आपण स्वतःच शोधून काढणार असा अट्टाहास अथीनाने धरला. विविध संदर्भ ग्रंथांचा खोलवर अभ्यास केल्यावर तिला खात्री पटली की, या वस्तूंचा उगम ख्रिस्ती धर्मात नाही. ही धार्मिक चित्रे अत्यंत महाग होती, तरीसुद्धा ‘आत्म्याने’ देवाची उपासना करण्याची तिची इच्छा असल्यामुळे तिने आपल्याजवळील धार्मिक चित्रे काढून टाकली. अथीना मात्र आध्यात्मिकरित्या शुद्ध व स्वीकारणीय पद्धतीने देवाची उपासना करण्यासाठी कितीही नुकसान झेलायला आनंदाने तयार होती.—प्रेषितांची कृत्ये १९:१९.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

धार्मिक चित्रे—एक कला?

अलीकडील वर्षांमध्ये, जगभरातील लोक ऑर्थोडॉक्स चित्रे गोळा करत आहेत. त्यांचा संग्रह करणारे लोक या चित्रांकडे पवित्र धार्मिक वस्तू या दृष्टीने न पाहता बायझंटाईन संस्कृतीची कला या दृष्टीने पाहतात. स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्‍या व्यक्‍तीच्या घरात किंवा ऑफिसमध्येही अशी धार्मिक चित्रे पाहायला मिळणे असाधारण गोष्ट नाही.

परंतु, प्रामाणिक ख्रिस्ती, धार्मिक चित्रांचा मुख्य उद्देश विसरत नाहीत. ती उपासनेची एक वस्तू आहे. धार्मिक चित्रे बाळगणाऱ्‍या इतरांना ख्रिस्ती काही म्हणत नसले तरी ते स्वतः ही चित्रे बाळगत नाहीत; संग्राहक म्हणूनही नाही. ही गोष्ट, अनुवाद ७:२६, मराठी कॉमन लँग्वेजमधील तत्त्वाच्या सुसंगतेत आहे; तेथे म्हटले आहे: “अमंगल [उपासनेत वापरल्या जाणाऱ्‍या प्रतिमा] असे काही घरात आणू नका, नाहीतर त्यासारखेच तुम्हीही शापित ठराल. त्यांचा मनापासून तिटकारा येऊ द्या, अगदी वीट येऊ द्या.”

[७ पानांवरील चित्र]

देवाने त्याच्या उपासनेत प्रतिमांचा उपयोग करण्याला अनुमती दिली नाही

[८ पानांवरील चित्र]

बायबलमधील ज्ञान आपल्याला देवाची उपासना आत्म्याने करायला मदत करते