व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फसू नका

फसू नका

फसू नका

फसवेगिरी मानवजातीच्या इतिहासाइतकीच जुनी आहे. इतिहासात लिहून ठेवलेल्या घटनांपैकी पहिली घटना ही फसवेगिरीची घटना आहे. एदेन बागेत सैतानाने हव्वेला फसवल्याची ती घटना होय.—उत्पत्ति ३:१३; १ तीमथ्य २:१४.

तेव्हापासून आतापर्यंत असा काळ नव्हता जेथे फसवेगिरी नव्हती; परंतु आज तर तिने कहरच केला आहे. आधुनिक दिवसांबद्दल बायबलमध्ये असा इशारा देण्यात आला होता: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१३.

अनेक कारणांमुळे लोकांना फसवले जाते. बेईमानी व खोटी आश्‍वासने देणारे, लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसा उकळतात. काही राजकीय नेते आपल्या मतदारांना फसवतात कारण कोणत्याही किंमतीवर त्यांना आपले स्थान गमवायचे नसते. लोक स्वतःचीही फसवणूक करतात. कटू सत्याला सामोरे जाण्याऐवजी ते स्वतःची समजूत घालत असतात, की धूम्रपान, मादक औषधांचा गैरवापर किंवा लैंगिक अनैतिकता यांसारख्या घातक प्रथा आचरण्यात काहीच धोका नाही.

मग, धार्मिक गोष्टींबाबतही फसवेगिरी चालते. येशूच्या दिवसांतील धार्मिक नेत्यांनी लोकांना फसवले. या फसव्या लोकांविषयी येशूने म्हटले: “ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेहि खाचेत पडतील.” (मत्तय १५:१४) शिवाय, धार्मिक बाबतीतही लोक स्वतःची फसगत करून घेतात. नीतिसूत्रे १४:१२ म्हणते: “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.”

येशूच्या काळाप्रमाणे आजही पुष्कळ लोकांची धार्मिक गोष्टींबाबत फसगत होत आहे आणि यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही! कारण, प्रेषित पौलाने म्हटले, की सैतानाने ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.’—२ करिंथकर ४:४

आपल्याला एखाद्या भामट्याने फसवले तर आपले पैसे जातील. एखाद्या राजकीय नेत्याने आपल्याला फसवले तर आपण, आपल्याला असलेले स्वातंत्र्य काहीप्रमाणात गमावू. परंतु आपण येशू ख्रिस्ताविषयीचे सत्य नाकारावे म्हणून सैतानाने आपल्याला फसवल्यास आपण सार्वकालिक जीवन गमावू! तेव्हा, फसू नका. धार्मिक सत्याचा एकच निर्विवाद स्रोत असलेल्या बायबलचा खुल्या मनाने व अंतःकरणाने विचार करा. असे न केल्यास आपले भारी नुकसान होऊ शकते.—योहान १७:३.