व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अज्ञात देवाची वेदी

अज्ञात देवाची वेदी

अज्ञात देवाची वेदी

प्रेषित पौल सा.यु. ५० च्या सुमारास अथेन्स, ग्रीसला गेला होता. तेथे त्याने, अज्ञात देवाला अर्पिलेली एक वेदी पाहिली व नंतर यहोवाविषयी साक्ष देताना या वेदीचा उल्लेख केला.

मार्स टेकडी किंवा अरीयपगा येथे, आपल्या भाषणाच्या सुरवातीला पौल म्हणाला: “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तु पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करितो.”—प्रेषितांची कृत्ये १७:२२-३१.

ती अथेन्समधील वेदी आतापर्यंत सापडली नसली तरी, तशाप्रकारच्या वेद्या ग्रीसच्या इतर भागांमध्ये आढळल्या आहेत. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या शतकातील ग्रीक भूगोलतज्ज्ञ पॉसानियस यांनी, अथेन्सच्या जवळच असलेल्या फलिरन येथे “अज्ञात देवांसाठी” असलेल्या वेद्यांचा उल्लेख केला. (ग्रीसचे वर्णन, इंग्रजी, अटिका १, ४). याच पुस्तकात हेही म्हटले आहे, की ओलिम्पिया येथेही “अज्ञात दैवतांसाठी वेदी” होती.—इलिया १, १४, ८.

टायनाच्या अप्पोलोनियसचे जीवन (इंग्रजी), (६, ३) या आपल्या पुस्तकात ग्रीक लेखक फलॉस्ट्रटस (सा.यु. १७०-२४५ च्या सुमारास) यांनी म्हटले, की अथेन्समध्ये “अज्ञात देवांच्या आदराप्रीत्यर्थ देखील वेद्या” उभारल्या जातात. आणि, तत्त्ववेत्यांचे जीवन (इंग्रजी) (१.११०) यात, डायोजनीझ लेअरशस (सा.यु. २००-२५० च्या सुमारास) यांनी लिहिले, की “अनामिक वेद्या” अथेन्सच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात.

रोमन लोकांनीसुद्धा अज्ञात दैवतांसाठी वेद्या उभारल्या. चित्रात दाखवलेली वेदी, सा.यु.पू. पहिल्या किंवा दुसऱ्‍या शतकातील आहे आणि इटली, रोम येथील पॅलटाईन ॲन्टीक्वेरियम या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. त्यावरील लॅटिन कोरीवलेख सूचित करतो, की ही वेदी “एका देवाला अथवा देवीला” समर्पित करण्यात आली होती; हा वाक्यांश, “कोरीव तसेच वाङमयीन मजकुरांमध्ये सहसा प्रार्थनांमध्ये किंवा समर्पणाच्या लेखांत आढळून येतो.”

“ज्या देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले” त्याला अजूनही पुष्कळ लोक ओळखत नाहीत. परंतु पौलाने अथेनैकरांना सांगितल्याप्रमाणे हा देव—यहोवा, “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२४, २७.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

वेदी: Soprintendenza Archeologica di Roma