धीरात सुभक्तीची भर घाला
धीरात सुभक्तीची भर घाला
“आपल्या विश्वासात . . . धीराची, धीरात सुभक्तीची . . . भर घाला.”—२ पेत्र १:५, ६.
१, २. (अ) मुलांच्या बाबतीत कशाप्रकारची वाढ अपेक्षित असते? (ब) आध्यात्मिक वाढ कितपत महत्त्वाची आहे?
लहान मुलाची वाढ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण केवळ शारीरिक वाढ अपेक्षित नसते. त्यासोबत मानसिक आणि भावनिक विकास देखील अपेक्षित असतो. कालांतराने मूल बालिशपणे वागण्याचे सोडून प्रौढ पुरुषाप्रमाणे अथवा स्त्रीप्रमाणे वागू-बोलू लागते. यासंदर्भात प्रेषित पौलाने असे म्हटले: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”—१ करिंथकर १३:११.
२ आध्यात्मिक वाढीच्या संबंधाने पौलाच्या या शब्दांत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ख्रिस्ती लोकांनी आध्यात्मिक दृष्टीने तान्ह्या बालकाप्रमाणेच न राहता “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” होण्याइतपत प्रगती करणे गरजेचे आहे. (१ करिंथकर १४:२०) त्यांनी ‘ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत येऊन पोहंचण्याचा’ सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास ते “बाळांसारखे . . . प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे” होणार नाहीत.—इफिसकर ४:१३, १४.
३, ४. (अ) आध्यात्मिकरित्या प्रौढ होण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ब) कोणते ईश्वरी गुण आपण प्रदर्शित करणे गरजेचे आहे आणि हे गुण कितपत महत्त्वाचे आहेत?
३ आध्यात्मिकरित्या आपण प्रौढांसारखे कसे होऊ शकतो? सामान्य परिस्थितीत शारीरिक वाढ जवळजवळ आपोआपच होत असते, पण आध्यात्मिक वाढ हेतुपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय होणे शक्य नाही. आध्यात्मिक वाढीकरता पहिले पाऊल म्हणजे देवाच्या वचनातील अचूक ज्ञान घेऊन शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करणे हे आहे. (इब्री लोकांस ५:१४; २ पेत्र १:३) यामुळे आपल्याला देवाला आवडणारे गुण प्रदर्शित करणे शक्य होते. शारीरिक वाढ आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतर पैलूंच्या विकासाप्रमाणेच, सर्व ईश्वरी गुणांतील प्रगती सहसा एकाच वेळी होत असते. प्रेषित पेत्राने लिहिले: “तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनांत धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.”—२ पेत्र १:५-७.
४ यांपैकी पेत्राने उल्लेख केलेला प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे, कोणताही या यादीतून गाळता येणार नाही. पुढे पेत्र म्हणतो: “कारण हे गुण तुम्हांमध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांस करितील.” (२ पेत्र १:८) तर आता आपण आपल्या धीरात सुभक्तीची भर घालण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करू या.
धीराची गरज
५. आपल्याला धीराची गरज का आहे?
५ पेत्र व पौल या दोघांनीही सुभक्तीचा धीराशी संबंध जोडला. (१ तीमथ्य ६:११) धीर धरण्याचा अर्थ केवळ कठीण परिस्थितीत टिकून राहणे आणि आपला दृढनिश्चय कायम ठेवणे इतकाच नव्हे. तर, परीक्षा, अडचणी, मोह किंवा छळ यांना तोंड देत असताना निराश न होता सहनशीलता, धैर्य व खंबीरपणा दाखवणे हे त्यात अंतर्भूत आहे. ‘ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करणारे’ या नात्याने आपला छळ होईल हे तर अपेक्षितच आहे. (२ तीमथ्य ३:१२) पण यहोवावर आपले प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि तारणाकरता आवश्यक असलेले गुण विकसित करण्यासाठी आपण धीर धरला पाहिजे. (रोमकर ५:३-५; २ तीमथ्य ४:७, ८; याकोब १:३, ४, १२) धीराशिवाय आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकणार नाही.—रोमकर २:६, ७; इब्री लोकांस १०:३६.
६. शेवटपर्यंत धीर धरण्याचा काय अर्थ होतो?
६ आपण कितीही चांगली सुरवात केलेली असली तरीसुद्धा, धीराने टिकून राहणे हेच शेवटी सर्वात महत्त्वाचे आहे. येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” मत्तय २४:१३) होय, आपण शेवटपर्यंत धीर धरला पाहिजे; मग तो आपल्या सध्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत असो किंवा या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटापर्यंत. दोन्ही परिस्थितीत आपण शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहणे आवश्यक आहे. पण आपल्या धीरात सुभक्तीची भर न घातल्यास आपण यहोवाला संतुष्ट करू शकणार नाही आणि त्याअर्थी सार्वकालिक जीवन मिळवू शकणार नाही. पण सुभक्ती म्हणजे काय?
(सुभक्तीचा अर्थ
७. सुभक्ती म्हणजे काय आणि ती आपल्याला काय करण्याची प्रेरणा देते?
७ सुभक्ती म्हणजे यहोवा देवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला निष्ठावान असल्यामुळे त्याच्याप्रती व्यक्त केलेला वैयक्तिक भक्तिभाव, त्याची केलेली उपासना आणि सेवा. यहोवाच्या संबंधाने सुभक्तीने वागण्यासाठी आपल्याला त्याच्याविषयी व त्याच्या मार्गांविषयी अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. देवाला वैयक्तिकरित्या, अगदी जवळून ओळखण्याची इच्छा आपण बाळगली पाहिजे. यामुळे आपल्याला त्याच्याशी जिव्हाळ्याचा घनिष्ट संबंध जोडण्याची प्रेरणा होईल; आणि आपला त्याच्याशी असा संबंध आहे हे आपल्या कृतींतून, आपल्या सबंध जीवनावरून दिसून येईल. शक्य तितके यहोवासारखे होण्याची—त्याच्या मार्गांचे अनुकरण करण्याची आणि त्याचे गुण व व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करण्याची आपली इच्छा असली पाहिजे. (इफिसकर ५:१) खरोखर, सुभक्ती आपल्याला आपल्या सर्व कृतींत देवाला संतुष्ट करण्याची प्रेरणा देते.—१ करिंथकर १०:३१.
८. सुभक्ती व अनन्य भक्ती कशाप्रकारे निगडीत आहेत?
८ खरी सुभक्ती आचरण्यासाठी आपण यहोवाची अनन्य उपासना केली पाहिजे; आपल्या हृदयात त्याची जागा आणखी कोणत्याही गोष्टीला आपण घेऊ देता कामा नये. आपला निर्माणकर्ता असल्याकारणाने त्याला आपल्याकडून अनन्य उपासनेची अपेक्षा करण्याचा हक्क आहे. (अनुवाद ४:२४; यशया ४२:८) पण यहोवा आपल्याला त्याची उपासना करण्याची जबरदस्ती करत नाही. त्याला आपल्याकडून स्वेच्छेने केलेल्या उपासनेची अपेक्षा आहे. देवाविषयी अचूक ज्ञान मिळवल्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला प्रीती वाटते; आणि ही प्रीती आपल्याला कोणत्याही अटीविना स्वतःचे जीवन देवाला समर्पित करून त्या समर्पणानुसार जगण्याची प्रेरणा देते.
देवासोबत नाते जोडा
९, १०. देवासोबत एक जवळचा नातेसंबंध आपण कशाप्रकारे जोडू व टिकवून ठेवू शकतो?
९ समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण देवासोबत अधिकाधिक जवळचे नाते जोडण्याचा प्रयत्न करण्याची अद्यापही आवश्यकता आहे. असे करण्याची आणि यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्याची आपली इच्छा त्याच्या वचनाचा अभ्यास व त्यावर मनन करण्याची आपल्याला प्रेरणा देते. आपण देवाच्या आत्म्याला आपल्या मनावर व हृदयावर कार्य करू देतो तेव्हा यहोवाविषयीचे आपले प्रेम वाढते. त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून कायम राहतो. आपण यहोवाला आपला सर्वात जवळचा मित्र मानतो आणि सर्व वेळी त्याला आवडेल अशाप्रकारेच वागण्याची आपली इच्छा असते. (१ योहान ५:३) देवासोबत हे सुंदर नाते जोडल्यामुळे आपला आनंद वाढत जातो आणि तो आपल्याला प्रेमळ मार्गदर्शन देत असल्यामुळे व आवश्यक तेथे आपल्या चुका सुधारत असल्यामुळे आपण कृतज्ञ असतो.—अनुवाद ८:५.
१० यहोवासोबत आपला मोलवान नातेसंबंध दिवसेंदिवस बळकट करण्याचा आपण प्रयत्न न केल्यास तो कमकुवत होऊ शकतो. असे घडल्यास, ती देवाची चूक असणार नाही कारण, “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) यहोवाने त्याच्याकडे येण्याकरता अतिशय कठीण मार्ग सांगितलेला नाही याबद्दल आपण खरोखरच कृतज्ञ आहोत! (१ योहान ५:१४, १५) अर्थात, आपण यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध कायम ठेवण्याकरता सतत प्रयत्न केला पाहिजे. पण तो आपल्याला सुभक्तीत वाढण्याकरता व टिकून राहण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व तरतूदी पुरवण्याद्वारे त्याच्या जवळ येण्यास मदत करतो. (याकोब ४:८) या सर्व प्रेमळ तरतुदींचा आपण पुरेपूर उपयोग कशाप्रकारे करू शकतो?
आध्यात्मिकरित्या सुदृढ राहा
११. आपल्या सुभक्तीचा पुरावा देणाऱ्या काही कृती कोणत्या आहेत?
११ देवाबद्दल वाटणारे मनस्वी प्रेम आपल्याला आपल्या सुभक्तीची पातळी प्रदर्शित करण्यास प्रवृत्त करील; हे पौलाच्या पुढील सल्ल्याशी सुसंगत आहे: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला २ तीमथ्य २:१५) असे करण्याकरता नियमित बायबल अभ्यास, सभांची उपस्थिती आणि क्षेत्र सेवेतील सहभाग यांचा उत्तम नित्यक्रम असणे आवश्यक आहे. तसेच आपण ‘निरंतर प्रार्थना करण्याद्वारे’ यहोवाच्या निकट राहू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) या आपल्या सुभक्तीचा पुरावा देणाऱ्या कृती आहेत. यांपैकी एकाही गोष्टीकडे जर आपले दुर्लक्ष झाले तर आपण आध्यात्मिकरित्या रोगी बनू शकतो आणि अशा कमकुवत अवस्थेत सैतानाच्या डावपेचांना सहज बळी पडू शकतो.—१ पेत्र ५:८.
सादर करण्यास होईल तितके कर.” (१२. आपण परीक्षांना यशस्वीपणे तोंड कसे देऊ शकतो?
१२ आध्यात्मिकरित्या बळकट व सक्रिय राहिल्यामुळे आपल्यावर येणाऱ्या अनेक परीक्षांना तोंड द्यायलाही आपल्याला मदत मिळते. काही परीक्षा आपल्या सहनशक्तीचा अंत पाहतील. स्वतःच्या कुटुंबातील सदस्य, नातलग किंवा शेजारी आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात, आपला विरोध करतात किंवा आपला छळ करतात तेव्हा सहन करणे अधिकच कठीण जाते. कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत आपल्यावर ख्रिस्ती तत्त्वांशी हातमिळवणी करण्याचा अगदी बेमालूमपणे प्रयत्न केला जाऊ शकतो. निरुत्साह, आजारपण आणि निराशा यांमुळे आपण शारीरिकरित्या कमजोर होऊ शकतो आणि यामुळे विश्वासाच्या परीक्षांना तोंड देणे अधिकच कठीण होऊन बसते. पण जर आपण सातत्याने “पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत” राहिलो तर सर्व परीक्षांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. (२ पेत्र ३:११, १२) आणि असे करताना आपण आपला आनंदही टिकवून ठेवू शकतो, या आत्मविश्वासाने की देव आपल्याला आशीर्वादित करेल.—नीतिसूत्रे १०:२२.
१३. सुभक्ती आचरत राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?
१३ सुभक्तीने आचरण करणाऱ्यांना सैतान आपले खास निशाण बनवत असला तरीसुद्धा आपण घाबरू नये. का? कारण “भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) परीक्षांना तोंड देण्याकरता आणि यहोवाकडून सोडवले जाण्याकरता आपण “अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने वागावे.” (तीत २:१२, १३) ख्रिस्ती या नात्याने आपण नेहमी सतर्क राहावे जेणेकरून ऐहिक वासना किंवा कृत्यांमुळे आपल्या सुभक्तीवर घाला पडू नये आणि तिचा नाश होऊ नये. आता आपण अशा काही धोकेदायक गोष्टी विचारात घेऊ ज्यांमुळे असे घडण्याची शक्यता आहे.
सुभक्तीवर घाला घालणाऱ्या गोष्टींपासून सावध
१४. भौतिकवादाचा मोह झाल्यास आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?
१४ भौतिकवाद अनेकांकरता पाश ठरला आहे. “भक्ति हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना” करून आपण स्वतःचीही फसवणूक करण्याची शक्यता आहे. यामुळे कदाचित आपण सहविश्वासू बांधवांच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचे धाडस करू. (१ तीमथ्य ६:५) आपण कदाचित असा निष्कर्ष काढू की, कर्ज फेडण्याची आपली कुवत नसली तरीसुद्धा एखाद्या श्रीमंत बांधवाला आपल्याला कर्ज देण्याची गळ घालण्यात काही गैर नाही. (स्तोत्र ३७:२१) पण लक्षात असू द्या, की “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” हे भौतिक गोष्टींमुळे नव्हे तर सुभक्तीच्या द्वारे प्राप्त होते. (१ तीमथ्य ४:८) आपण “जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही;” त्यामुळे आपण “चित्तसमाधानासह भक्ति” आचरण्याचा निश्चय करून “अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:६-११.
१५. सुखविलासाच्या मागे लागल्यामुळे सुभक्तीच्या कार्यांकरता वेळ न उरण्याचा धोका असल्यास आपण काय करावे?
१५ सुखविलासाच्या मागे लागल्यास सुभक्तीच्या कार्यांकरता १ योहान २:२५) आज बहुतेक लोक “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी” आहेत आणि अशा लोकांपासून चार हात दूर राहणेच उचित आहे. (२ तीमथ्य ३:४, ५) जे सुभक्तीला प्राधान्य देतात ते ‘खरे जीवन बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करत’ आहेत.—१ तीमथ्य ६:१९.
वेळ उरणार नाही. याबाबतीत लगेच काही फेरबदल करण्याची गरज आहे का? शारीरिक व्यायाम व मनोरंजन यांचे काही फायदे आहेत हे कबूल आहे. पण सार्वकालिक जीवनाशी तुलना केल्यास हे फायदे नगण्य आहेत. (१६. कोणत्या पापी वासना काहीजणांना देवाच्या नीतिमान अपेक्षा पूर्ण करण्यापासून परावृत्त करतात आणि अशा अभिलाषांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो?
१६ मद्य व ड्रग्सचा दुरुपयोग, अनैतिकता आणि पापी अभिलाषा आपल्या सुभक्तीचा नाश करू शकतात. या प्रकारच्या गोष्टींच्या मोहाला बळी पडल्यास आपण देवाच्या नीतिमान अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. (१ करिंथकर ६:९, १०; २ करिंथकर ७:१) पौलालाही त्याच्या पापी शरीराशी सतत झगडावे लागले. (रोमकर ७:२१-२५) अयोग्य इच्छांवर मात करण्याकरता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सर्वप्रथम, नैतिकरित्या शुद्ध राहण्याचा आपला मनःपूर्वक निर्धार असला पाहिजे. पौल आपल्याला सांगतो: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सैकर ३:५) अशा पापी वासनांशी संबंधित असलेल्या आपल्या शारीरिक अवयवांना जीवे मारण्याकरता, अर्थात त्यांना पूर्णपणे मिटवून टाकण्याकरता दृढ निर्धाराची गरज आहे. देवाला मदतीकरता मनःपूर्वक प्रार्थना केल्यामुळे आपल्याला या दुष्ट व्यवस्थीकरणात अयोग्य इच्छांना धिक्कारून धार्मिकतेने व सुभक्तीने चालण्यास मदत मिळेल.
१७. शिक्षेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
१७ निराशा आपल्या सहनशक्तीला कमकुवत करून आपल्या सुभक्तीवर हानीकारक परिणाम करू शकते. यहोवाच्या अनेक सेवकांनी निराशा अनुभवली आहे. (गणना ११:११-१५; एज्रा ४:४; योना ४:३) आपल्याला कोणी दुखावल्यामुळे, आपली कानउघाडणी करण्यात आल्यामुळे अथवा आपल्याला वाग्दंड देण्यात आल्यामुळे जर आपल्या मनात राग असेल तर निराशेचा आपल्यावर अधिकच हानीकारक प्रभाव पडतो. पण सुधारणूक किंवा वाग्दंड हा देवाला आपल्यात रस असल्याचा, त्याला आपल्यावर प्रेम असल्याचा व आपल्याबद्दल काळजी वाटत असल्याचा पुरावा आहे. (इब्री लोकांस १२:५-७, १०, ११) वाग्दंडाला आपण केवळ शिक्षा मानू नये तर नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याचे प्रशिक्षण या दृष्टीने पाहावे. आपण नम्र असू, तर आपल्याला मिळणारा सल्ला लगेच स्वीकारू कारण “बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे,” याची आपण जाणीव ठेवू. (नीतिसूत्रे ६:२३) असे केल्याने आपल्याला सुभक्तीने सतत आचरण करण्यात उत्तम आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत मिळेल.
१८. वैयक्तिक तक्रारींच्या संबंधाने आपली कोणती जबाबदारी आहे?
१८ गैरसमज आणि वैयक्तिक तक्रारी आपल्या सुभक्तीकरता नीतिसूत्रे १८:१) पण आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे की मनात राग धरणे किंवा इतरांविषयी सतत नाराजी बाळगणे यहोवाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाकरता हानीकारक ठरू शकते. (लेवीय १९:१८) किंबहुना, “आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:२०) डोंगरावरील प्रवचनात, येशूने वैयक्तिक समस्या सोडवण्याकरता ताबडतोब पावले उचलण्याच्या गरजेवर जोर दिला. त्याने आपल्या श्रोत्यांना सांगितले: “ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्तय ५:२३, २४) क्षमा मागितल्यास, कठोर शब्दांमुळे अथवा कृतींमुळे झालेली जखम भरून निघण्यास मदत होते. आपण क्षमा मागून, आपले वागणे अयोग्य होते असे कबूल केल्यास नातेसंबंधात आलेले वितुष्ट नाहीसे होऊ शकते आणि पुन्हा एकदा शांतीचे संबंध स्थापित होऊ शकतात. समस्या सोडवण्यासंबंधी येशूने याव्यतिरिक्त आणखी मार्गदर्शन पुरवले. (मत्तय १८:१५-१७) समस्या सोडवण्याचे आपले प्रयत्न सफल होतात तेव्हा आपल्याला मनस्वी आनंद होत नाही का?—रोमकर १२:१८; इफिसकर ४:२६, २७.
एक आव्हान ठरू शकतात. यांमुळे मानसिक तणाव घडू शकतो किंवा एखादी व्यक्ती आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींशी संबंध तोडण्याचे अविचारी पाऊल उचलू शकते. (येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
१९. येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणे इतके महत्त्वाचे का आहे?
१९ परीक्षा आपल्यावर निश्चितच येतील, पण त्यांमुळे आपण सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीतून विचलित होता कामा नये. यहोवा आपल्याला परीक्षेतून सोडवू शकतो हे आपण कधीही विसरू नये. आपण ‘सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावत असताना, आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे.’ (इब्री लोकांस १२:१-३) येशूच्या उदाहरणाचे काळजीपूर्वक परीक्षण करून इतरांशी बोलताना व वागताना त्याचे अनुकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला सुभक्ती आचरण्यात उत्तरोत्तर प्रगती करण्यास मदत मिळेल.
२०. धीर धरून सुभक्ती आचरत राहिल्याने आपल्याला कोणते उत्तम प्रतिफळ प्राप्त होते?
२० आपले तारण निश्चित करण्यासाठी धीर व सुभक्ती हे दोन्ही गुण परस्परांशी निगडीत आहेत. हे बहुमोल गुण प्रदर्शित केल्यामुळे आपण देवाची पवित्र सेवा विश्वासूपणे करत राहू शकतो. परीक्षांना तोंड देतानासुद्धा, आपण धीर धरून सुभक्ती आचरत राहिल्यामुळे यहोवाची कोमल प्रीती आणि आशीर्वाद अनुभवू आणि यामुळे कठीण परिस्थितीतही आनंदी राहू. (याकोब ५:११) शिवाय, स्वतः येशू आपल्याला आश्वासन देतो: “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.”—लूक २१:१९.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• धीर धरणे महत्त्वाचे का आहे?
• सुभक्ती म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे प्रदर्शित केली जाते?
• आपण देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडून तो कसा टिकवून ठेवू शकतो?
• आपल्या सुभक्तीला हानीकारक ठरू शकणाऱ्या काही गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण त्या कशाप्रकारे टाळू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२, १३ पानांवरील चित्रे]
सुभक्ती अनेक मार्गांनी प्रदर्शित होते
[१४ पानांवरील चित्रे]
तुमच्या सुभक्तीला हानीकारक ठरू शकणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा