वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
कोणत्या परिस्थितीत एखाद्या ख्रिश्चन भगिनीने आध्यात्मिक कारणास्तव डोक्यावर पदर घ्यावा?
प्रेषित पौलाने लिहिले: “जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करिते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते.” का? कारण, “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे,” हे बायबलमधील मस्तकपदाविषयीचे तत्त्व आहे. ख्रिस्ती मंडळीत प्रार्थना करण्याची किंवा प्रचार करण्याची जबाबदारी सहसा पुरुषाची असते. यास्तव, एरवी पतीने किंवा बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषाने केल्या असत्या अशा उपासनेसंबंधी काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा ख्रिस्ती स्त्रीने डोक्यावर पदर घेतला पाहिजे.—१ करिंथकर ११:३-१०.
एखाद्या विवाहित ख्रिस्ती भगिनीला, तिच्या कुटुंबात डोक्यावर पदर घेण्याची परिस्थिती येऊ शकेल. उदाहरणार्थ, संपूर्ण कुटुंब जेव्हा बायबल अभ्यासासाठी किंवा भोजनासाठी एकत्र येते तेव्हा सहसा पती, त्यांना शिकवण्यासाठी व कुटुंबाच्यावतीने प्रार्थना करायला पुढाकार घेतो. परंतु पती जर सत्यात नसेल तर आता ही जबाबदारी पत्नीवर येऊ शकते. यास्तव, अशा ख्रिश्चन पत्नीला आपल्या पतीच्या उपस्थितीत, स्वतःसाठी आणि इतरांसाठी जेव्हा मोठ्याने प्रार्थना करावी लागते किंवा आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करावा लागतो तेव्हा तिने डोक्यावर पदर घेणे उचित ठरेल. पती जर उपस्थित नसेल तर पत्नीला डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही कारण, मुलांना शिकवण्याची तिला देवाकडून आज्ञा मिळालेली आहे.—नीतिसूत्रे १:८; ६:२०.
परंतु कुटुंबात, तिचा लहान मुलगा समर्पित १ तीमथ्य २:१२) वडील सत्यात असतील तर त्यांनी आपल्या मुलाला शिकवले पाहिजे. परंतु, पती अनुपस्थित असेल आणि पत्नीला तिच्या बाप्तिस्मा घेतलेल्या तरुण मुलाचा आणि इतर मुलांचा बायबल अभ्यास घ्यायचा असेल तर तिने डोक्यावर पदर घेणे आवश्यक आहे. अशा अभ्यासाच्या वेळी किंवा जेवणाच्या वेळी बाप्तिस्मा घेतलेल्या मुलाला प्रार्थना करायला सांगायचे की नाही हे तिने ठरवले पाहिजे. तो अद्याप इतका योग्य नाही असे तिला वाटत असल्यामुळे कदाचित तीच प्रार्थना करायचे ठरवेल. अशा वेळी तिने डोक्यावर पदर घेणे आवश्यक आहे.
व बाप्तिस्मा घेतलेला देवाचा सेवक असेल तर? तो ख्रिस्ती मंडळीचा सदस्य असल्यामुळे त्याला खरे तर मंडळीतील पुरुषांकडून शिक्षण मिळाले पाहिजे. (मंडळीच्या काही कार्यांमध्ये भाग घेत असताना ख्रिस्ती स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, आठवड्यादरम्यानच्या क्षेत्र सेवेच्या सभेसाठी कदाचित सर्व ख्रिस्ती भगिनीच उपस्थित असतील, बाप्तिस्मा घेतलेला कोणीही पुरुष उपस्थित नसेल. कधीकधी, एखाद्या मंडळीच्या सभेच्या वेळी बाप्तिस्मा घेतलेला कोणी बांधव उपस्थित नसेल. आणि एखाद्या भगिनीला जेव्हा मंडळीच्या सभा किंवा क्षेत्र सेवेच्या सभा, ज्या सहसा बांधव चालवतात त्या चालवाव्या लागल्या तर तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे.
ख्रिस्ती स्त्रियांना, बायबलच्या भाषणाचे मौखिक किंवा मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेत भाषांतर करताना अथवा मंडळीच्या एखाद्या सभेमध्ये वापरल्या जाणाऱ्या बायबल अभ्यासाच्या साधनातून सर्वांसमोर परिच्छेद वाचताना डोक्यावर पदर घेणे आवश्यक आहे का? नाही. कारण असे करताना भगिनी पुढाकार घेत नसतात किंवा शिक्षण देत नसतात. तसेच, प्रात्यक्षिके सादर करताना, अनुभव सांगताना किंवा ईश्वरशासित सेवा प्रशालेत विद्यार्थी भाषण सादर करताना भगिनींना डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही.
मंडळीमध्ये शिकवण्याचे काम हे बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांचे आहे, परंतु मंडळीच्या बाहेर प्रचार करण्याची व शिकवण्याची जबाबदारी पुरुष व स्रिया या दोघांचीही आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) यास्तव, यहोवाचा एक पुरुष साक्षीदार उपस्थित असताना एक ख्रिस्ती भगिनी, साक्षीदार नसलेल्या व्यक्तीला देवाचे वचन समजावून सांगत असते तेव्हा तिला डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही.
परंतु, समर्पित व बाप्तिस्मा घेतलेला पुरुष उपस्थित असताना नियमित व ठरलेल्या गृह बायबल अभ्यासाच्या वेळी परिस्थिती वेगळी असते. गृह बायबल अभ्यास हा आधीपासूनच योजना केलेला शिकवण्याचा कार्यक्रम असतो ज्यात अभ्यासाचे संचालन करणारी व्यक्ती पुढाकार घेत असते. अशा परिस्थितीत हा अभ्यास मंडळीचाच एक विस्तारित भाग होतो. बाप्तिस्मा घेतलेली ख्रिस्ती भगिनी, बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुष साक्षीदाराच्या उपस्थितीत अभ्यास घेणार असेल तर तिने डोक्यावर पदर घेणे उचित ठरेल. परंतु, प्रार्थना मात्र समर्पित बांधवाने केली पाहिजे. काही अपवादात्मक परिस्थिती वगळता, (जसे की बांधव मुका असेल तर) समर्पित बांधव उपस्थित असतो तेव्हा भगिनीने प्रार्थना करू नये.
एक ख्रिस्ती भगिनी कधीकधी बाप्तिस्मा न घेतलेल्या एखाद्या पुरुष राज्य प्रचारकाला आपल्याबरोबर बायबल अभ्यासाला घेऊन जाईल. ती कदाचित त्या बांधवाला अभ्यास घेण्यास सांगू शकते. परंतु त्याला बाप्तिस्मा घेतलेल्या बहिणीच्यावतीने यहोवाला योग्यरितीने प्रार्थना करता येत नसल्यामुळे, अशा वेळी त्या भगिनीने अभ्यासाच्या वेळी प्रार्थना करणे उचित ठरेल. भगिनी जर अभ्यास घेणार असेल व प्रार्थना करणार असेल तर तिने डोक्यावर पदर घ्यावा. पुरुष प्रचारकाचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नसला तरी, तो प्रचार कार्यात भाग घेत असल्यामुळे साक्षीदार नसलेले लोक त्याला मंडळीचाच एक भाग समजतात.
“देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकारांचे चिन्ह मस्तकावर धारण करावे,” असे प्रेषित पौलाने लिहिले. होय, ख्रिस्ती भगिनींना यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्या कोट्यवधी देवदूतांसमोर उत्तम उदाहरण असण्याचा बहुमान मिळाला आहे. यास्तव, भक्तिमान स्त्रियांनी परिस्थिती येते तेव्हा डोक्यावर पदर घेणे खरोखरच किती उचित आहे!
[२६ पानांवरील चित्रे]
डोक्यावर पदर घेणे मस्तकपदाबद्दल आदर व्यक्त करण्याचे एक चिन्ह आहे