व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधविश्‍वासांच्या नियंत्रणाखालील जीवन

अंधविश्‍वासांच्या नियंत्रणाखालील जीवन

अंधविश्‍वासांच्या नियंत्रणाखालील जीवन

घरातून बाहेर पडताच विशिष्ट व्यक्‍ती तुमच्यासमोर येते. तुम्ही एखाद्या दगडावर ठेचकळता. रात्री एक विशिष्ट पक्षी ओरडतो. तुम्हाला वारंवार एकच स्वप्न पडते. या घटना पुष्कळांसाठी अगदी साधारण आणि निरुपद्रवी असतात. परंतु, पश्‍चिम आफ्रिकेतील काही लोकांसाठी या घटना विशिष्ट चिन्हे, शुभाशुभ सांगणाऱ्‍या घटना किंवा आत्मिक जगातील संदेश असू शकतात. लक्षण आणि त्याचा काढलेला अर्थ यावर एकतर चांगले किंवा वाईट होण्याची शक्यता व्यक्‍त केली जाते.

आफ्रिकेच्या बाहेरही अंधविश्‍वास आहेत. चीनच्या सरकाराने तसेच भूतपूर्व सोव्हियत संघराज्याच्या प्रजासत्ताक देशांनी कित्येक वर्षे नास्तिकवादाची सक्‍ती करूनही तेथील असंख्य लोक अजूनही अंधविश्‍वास बाळगून आहेत हे आश्‍चर्यजनक आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये, अनेक लोक ग्रहताऱ्‍यांच्या स्थितीवर आधारित आपले भविष्य पाहतात, शुक्रवार १३ ची भीती बाळगतात आणि काळ्या मांजरींपासून दूर राहतात. अगदी उत्तरेकडील देशांतील काही लोक उत्तरेकडील दिव्यांना युद्ध आणि महामारीचे अशुभ चिन्ह मानतात. भारतात, ट्रक चालकांद्वारे एड्‌स रोग पसरवला जातो कारण त्यांचा असा समज आहे की, गरमीच्या दिवशी शरीर थंड ठेवण्याकरता संभोग करणे आवश्‍यक आहे. जपानमध्ये, बोगद्यांचे काम करणारे कामगार असा विश्‍वास करतात की, बोगद्याचे काम पूर्णपणे संपण्याआधी बोगद्यात एखादी स्त्री गेली तर ते अशुभ असते. खेळक्रिडेच्या दुनियेतही अंधविश्‍वास सर्रास आहेत. एका व्हॉलीबॉल खेळाडूचे म्हणणे होते की, त्याने पांढऱ्‍या मोज्यांऐवजी काळे मोजे घातल्यामुळे त्याला एकामागोमाग एक विजय मिळत राहिले. अंधविश्‍वासांची यादी न संपणारी आहे.

तुमच्याबद्दल काय? तुम्हालाही मनातल्या मनात वाटणारी किंवा स्पष्टीकरण देता न येणारी भीती वाटते का? तुमच्यावरही “एखादा विश्‍वास, अर्धा विश्‍वास, किंवा ज्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येत नाही अशा प्रथेचा” प्रभाव आहे का? या उत्तरावरून तुम्हाला तुमची स्थिती कळेल कारण ‘अंधविश्‍वास’ याचा हाच अर्थ होतो.

अंधविश्‍वासांचा आपल्या निर्णयांवर व दैनिक जीवनात परिणाम होऊ देणारी व्यक्‍ती, स्वतःला समजत नाही अशा गोष्टीला आपल्यावर नियंत्रण करू देत असते. हे शहाणपणाचे आहे का? असे गूढ आणि दुष्ट प्रभाव असण्याची शक्यता असलेल्या गोष्टीला आपण वश व्हावे का? अंधविश्‍वास एक निरुपद्रवी कमतरता आहे की धोका?