‘देवाच्या महत्कृत्यांनी’ प्रेरित
‘देवाच्या महत्कृत्यांनी’ प्रेरित
“आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगतांना ऐकतो.”—प्रेषितांची कृत्ये २:११.
१, २. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरुसलेममध्ये कोणती आश्चर्यकारक घटना घडली?
सा.यु. ३३ साली वसंत ऋतूच्या उत्तरार्धात एका सकाळी जेरुसलेम येथील एका घरात एकत्रित झालेल्या येशूच्या शिष्यांपैकी काही स्रीपुरुषांना एक अनोखा अनुभव आला. “अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व . . . ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि . . . निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.”—प्रेषितांची कृत्ये २:२-४, १५.
२ एक मोठा जमाव त्या घराबाहेर एकत्रित झाला. यात, विदेशांत जन्मलेले “भक्तिमान यहूदी” होते जे पेन्टेकॉस्टचा सण साजरा करण्याकरता जेरूसलेमला आले होते. ते आश्चर्यचकित झाले कारण त्यांपैकी प्रत्येकाने शिष्यांना आपल्या मातृभाषेत ‘देवाच्या महत्कृत्यांबद्दल’ बोलताना ऐकले. बोलणारे ते सर्व शिष्य गालीली असताना हे कसे शक्य होते?—प्रेषितांची कृत्ये २:५-८, ११.
३. प्रेषित पेत्राने पेन्टेकॉस्टकरता जमलेल्या लोकांना काय संदेश दिला?
३ त्या गालीलकरांपैकी एक होता प्रेषित पेत्र. त्याने काही आठवड्यांआधीच हे स्पष्ट केले होते की येशू ख्रिस्ताला अधार्मिक लोकांनी जिवे मारले होते. पण देवाने त्याच्या पुत्राला मृतांतून पुनरुत्थित केले होते. यानंतर येशू त्याच्या अनेक शिष्यांसमोर प्रकट झाला; पेत्र देखील त्यांच्यापैकी एक होता आणि इतर काही याप्रसंगी उपस्थित नव्हते. दहा दिवसांआधीच येशूचे स्वर्गारोहण झाले होते. प्रेषितांची कृत्ये २:२२-२४, ३२, ३३, ३८) तर मग ‘देवाच्या महत्कृत्यांबद्दल’ ऐकल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? आणि आपण यहोवाची जी सेवा करतो तिच्याविषयी हा अहवाल आपल्याला काय शिकवतो?
त्यानेच आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला होता. पेन्टेकॉस्टच्या दिवशी उपस्थित असलेल्यांकरता याचा काही विशेष अर्थ होता का? होय, निश्चितच. येशूच्या मृत्यूमुळे त्यांना आपल्या पापांची क्षमा मिळवून, त्याच्यावर विश्वास प्रकट केल्यास “पवित्र आत्म्याचे दान” प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. (कार्य करण्याकरता उत्प्रेरित!
४. योएलची कोणती भविष्यवाणी सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी पूर्ण झाली?
४ पवित्र आत्मा मिळाल्यावर जेरुसलेममधील शिष्यांनी जराही उशीर न करता इतरांना ही तारणाची सुवार्ता सांगितली. त्या सकाळी तेथे जमलेल्या लोकांपासूनच त्यांनी सुरवात केली. त्यांच्या प्रचार कार्यामुळे एका उल्लेखनीय भविष्यवाणीची पूर्णता झाली, जी पथूएलाचा पुत्र योएल याने आठ शतकांआधी अभिलिखित केली होती: ‘मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यांवरही, परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.’—योएल १:१; २:२८, २९, ३१; प्रेषितांची कृत्ये २:१७, १८, २०.
५. पहिल्या शतकातील ख्रिश्चन कोणत्या अर्थाने संदेष्टे होते? (तळटीप पाहा.)
५ याचा अर्थ परमेश्वर भविष्यातील घटना भाकीत करण्यासाठी दावीद, योएल आणि दबोरा यांच्याप्रमाणे स्त्री व पुरुष संदेष्ट्यांची एक सबंध पिढी निर्माण करणार होता का? नाही. ख्रिस्ती ‘पुत्र व कन्या, दास व दासी’ यांना यहोवाने केलेल्या आणि पुढेही तो करील अशा ‘महत्कृत्यांविषयी’ घोषणा करण्यास त्याच्या आत्म्याद्वारे प्रेरित केले जाणार होते; या अर्थाने ते संदेश देणार होते. त्याअर्थी ते परात्पर देवाच्या वतीने बोलणार होते. * पण लोकांनी त्यांच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला?—इब्री लोकांस १:१, २.
६. पेत्राचे व्याख्यान ऐकल्यानंतर, जमावांतील बऱ्याच लोकांना कोणते पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली?
६ पेत्राने दिलेले स्पष्टीकरण ऐकल्यावर बरेच लोक पुढचे पाऊल उचलण्यास प्रेरित झाले. त्यांनी “संदेशाचा [“मनापासून,” NW] स्वीकार केला” व “त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.” (प्रेषितांची कृत्ये २:४१) ते जन्माने यहुदी किंवा यहुदी मतानुसारी असल्यामुळे त्यांच्याजवळ शास्त्रवचनांचे मूलभूत ज्ञान आधीपासूनच होते. शिवाय पेत्राने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याकरता एक भक्कम आधार प्राप्त झाला. (मत्तय २८:१९) बाप्तिस्मा झाल्यानंतर ते ‘प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर होते.’ तसेच ते या नव्याने मिळालेल्या विश्वासाबद्दल इतरांनाही सांगू लागले. किंबहुना ‘ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. ते देवाची स्तुती करीत आणि सर्व लोक त्यांना प्रसन्न असत.’ परिणामस्वरूप, “प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.” (प्रेषितांची कृत्ये २:४२, ४६, ४७) हे नवे सत्य मानणारे जेथे राहात होते अशा देशांपैकी बऱ्याच देशांत ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना झाली. त्यांच्या संख्येत झालेली वाढ ही निश्चितच, काही प्रमाणात तरी, घरी परतल्यावर त्यांनी ‘सुवार्तेची’ आवेशाने घोषणा करण्याकरता परिश्रम घेतल्यामुळेच घडून आली.—कलस्सैकर १:२३.
देवाचे वचन सक्रिय आहे
७. (अ) सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाच्या संस्थेकडे का आकर्षित होतात? (ब) सबंध जगातील क्षेत्रात आणि तुमच्या स्थानिक क्षेत्रात आणखी कितपत वाढ होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटते? (तळटीप पाहा.)
७ आज देवाचे सेवक बनू इच्छिणाऱ्यांविषयी काय? त्यांनी देखील देवाच्या वचनाचा लक्षपूर्वक अभ्यास करण्याची गरज आहे. या अभ्यासातून त्यांना कळून येते की यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६; प्रेषितांची कृत्ये १३:४८) तसेच, ज्याच्या सांडलेल्या रक्तामुळे सर्व पाप धुऊन निघू शकते त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे यहोवाने दिलेल्या खंडणीच्या दयाळू तरतुदीविषयी देखील त्यांना कळून येते. (१ योहान १:७) यासोबतच “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान” करण्याच्या यहोवाच्या उद्देशाविषयी जाणून ते कृतज्ञता व्यक्त करतात. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) ही ‘महत्कृत्ये’ करणाऱ्याविषयीचे प्रेम त्यांना या मोलवान सत्यांविषयी प्रचार करण्यास प्रवृत्त करते. मग ते देवाचे समर्पित बाप्तिस्मा घेतलेले सेवक बनतात आणि ‘देवाच्या पूर्ण ज्ञानात’ उन्नती करत राहतात. *—कलस्सैकर १:१०ब; २ करिंथकर ५:१४.
८-१०. (अ) देवाचे वचन ‘सक्रिय’ आहे हे एका ख्रिस्ती स्त्रीच्या अनुभवावरून कसे कळून येते? (ब) या अनुभवातून तुम्हाला यहोवाविषयी आणि त्याच्या सेवकांशी त्याच्या व्यवहाराविषयी काय शिकायला मिळाले? (निर्गम ४:१२)
८ देवाच्या सेवकांना त्यांच्या बायबल अभ्यासातून मिळणारे ज्ञान केवळ वरकरणी नाही. हे ज्ञान त्यांच्या अंतःकरणावर कार्य करते, त्यांच्या विचारसरणीत बदल करते आणि त्यांच्या व्यक्तित्वात सामावले जाते. (इब्री लोकांस ४:१२) उदाहरणार्थ, कमील नावाच्या एका स्त्रीची नोकरी वयोवृद्धांची काळजी घेण्याची होती. तिला ज्यांची काळजी घेण्याचे काम सोपवण्यात आले होते त्यांत मार्था नावाची एक स्त्री होती. ती यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक होती. मार्थाचे मानसिक संतुलन पार बिघडल्यामुळे सतत तिच्याजवळ कोणाला तरी राहावे लागत होते. तिला जेवण्याची—इतकेच काय, तर तोंडात घातलेला घास गिळण्याचीही आठवण करून द्यावी लागत होती. पण एक गोष्ट मात्र मार्थाच्या मनावर कायमची कोरली गेली होती, ज्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत.
९ एके दिवशी कमील आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे दुःखी होऊन रडत असताना मार्थाने पाहिले. मार्थाने कमीलला जवळ घेतले आणि तिला आपल्यासोबत बायबल अभ्यास करायला आवडेल का असे विचारले. पण मार्थाच्या दशेत असलेली व्यक्ती बायबल अभ्यास घेऊ शकत होती का? होय, घेऊ शकत होती! तिला बऱ्याच अंशी स्मृतीभ्रंश झाला असला तरीसुद्धा महत्कृत्ये करणाऱ्या आपल्या देवाला मात्र ती विसरली नव्हती; तसेच, बायबलमधून शिकलेली मोलवान सत्ये देखील ती विसरली नव्हती. अभ्यासादरम्यान मार्था कमीलला प्रत्येक परिच्छेद वाचायला, परिच्छेदात उल्लेख केलेली वचने उघडून पाहायला, आणि मग पानाच्या शेवटी दिलेला प्रश्न वाचून त्याचे उत्तर द्यायला सांगायची. असेच काही काळ चालले; मार्थाला बऱ्याच मर्यादा असूनही कमील बायबलच्या ज्ञानात वृद्धी करू लागली. मार्थाला जाणीव झाली, की कमीलने देवाची सेवा करू इच्छिणाऱ्या इतरांसोबत सहवास राखणे गरजेचे आहे. त्यामुळे तिने आपल्या विद्यार्थिनीला एक ड्रेस आणि बूट दिले जेणेकरून पहिल्यांदा राज्य सभागृहातील सभेला जाताना तिला नीटनेटका पेहराव करून जाता यावे.
१० मार्थाची ही कळकळ, तिचा उत्तम आदर्श आणि विश्वास पाहून कमीलचे अंतःकरण भरून आले. तिला कळले की ज्याअर्थी मार्था जवळजवळ सर्वकाही विसरली पण शास्त्रवचनांतून शिकलेल्या गोष्टी विसरली नाही, त्याअर्थी ती आपल्याला जे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ते नक्कीच अतिशय महत्त्वाचे असावे. नंतर कमीलची बदली दुसऱ्या ठिकाणी झाल्यावर तिला जाणीव झाली की आता तिने पाऊल उचललेच पाहिजे. पहिली संधी मिळताच ती मार्थाने दिलेला ड्रेस व बूट घालून राज्य सभागृहात गेली आणि तिथे तिने बायबल अभ्यासाकरता विनंती केली.
कमीलने उत्तम प्रगती केली व कालांतराने तिचा बाप्तिस्मा झाला.यहोवाच्या दर्जांनुसार वागण्याची प्रेरणा
११. प्रचार कार्यात आवेशी असण्याव्यतिरिक्त, राज्याच्या संदेशाने आपल्या अंतःकरणास प्रेरित केले आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
११ आज, ६० लाखांपेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आहेत जे मार्थाप्रमाणे आणि आता कमीलप्रमाणे सबंध जगात ‘राज्याच्या सुवार्तेची’ घोषणा करत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणे ‘देवाच्या महत्कृत्यांनी’ त्यांच्यावर गहिरा प्रभाव केला आहे. यहोवाचे नाव धारण करण्याचा विशेषाधिकार त्यांना मिळाल्याबद्दल आणि यहोवाने त्यांच्यावर आपला आत्मा ओतला आहे याबद्दल ते कृतज्ञ आहेत. म्हणूनच ते जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत यहोवाच्या दर्जांचे अनुसरण करण्याद्वारे, ‘सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागण्याचा’ सदोदित प्रयत्न करतात. इतर गोष्टींव्यतिरिक्त, यात पेहराव व शृंगाराविषयी देवाच्या दर्जांचा आदर करणेही समाविष्ट आहे.—कलस्सैकर १:१०अ; तीत २:१०.
१२. पेहराव व शृंगार याविषयी १ तीमथ्य २:९, १० यात आपल्याला कोणता सुस्पष्ट सल्ला मिळतो?
१२ होय, यहोवाने आपल्या वैयक्तिक स्वरूपाविषयीही काही दर्जे स्थापित केले आहेत. प्रेषित पौलाने यासंबंधात देवाच्या काही अपेक्षा सूचित केल्या आहेत. “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे.” * या शब्दांवरून आपण काय शिकतो?—१ तीमथ्य २:९, १०.
१३. (अ) ‘स्वतःला साजेल असा वेष’ म्हणजे काय? (ब) यहोवाचे दर्जे वाजवी आहेत असे आपण का म्हणू शकतो?
१३ पौलाचे शब्द दाखवून देतात की ख्रिस्ती लोकांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने” स्वतःला शोभवावे. त्यांचा
पेहराव गबाळा, गचाळ किंवा अव्यवस्थित असू नये. जवळजवळ सर्वजण, अगदी गरीब असणारे देखील आपले कपडे स्वच्छ व नीटनेटके आहेत की नाही याची खात्री करून या वाजवी अपेक्षा पूर्ण करू शकतात. उदाहरणार्थ, दर वर्षी दक्षिण अमेरिकेतील एका देशात साक्षीदार प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता कितीतरी किलोमीटर जंगलातून चालत जातात आणि मग कित्येक तास बोटीने प्रवास करतात. प्रवासात कधीकधी एखादा जण नदीत पडतो, तर एखाद्याचे कपडे झुडुपांत अडकून फाटतात. त्यामुळे, अधिवेशनाच्या ठिकाणी पोचेपर्यंत त्यांचा पेहराव काहीसा अव्यवस्थित झालेला असतो. मग ते तुटलेले बटन, चेन इत्यादी लावण्यासाठी, आणि अधिवेशनाला घालायचे कपडे धुऊन इस्त्री करण्याकरता काही वेळ खर्च करतात. यहोवाच्या मेजावरील अन्न ग्रहण करण्याचे निमंत्रण ते अतिशय बहुमोल समजतात आणि त्यामुळे त्यांना सुयोग्य पेहराव करणे महत्त्वाचे वाटते.१४. (अ) “भिडस्तपणाने व मर्यादेने” पेहराव करण्याचा काय अर्थ होतो? (ब) ‘देवभक्ती स्वीकारलेल्यांप्रमाणे’ पेहराव करण्यात काय सामील आहे?
१४ पौलाने पुढे “भिडस्तपणाने व मर्यादेने” पेहराव करण्याविषयी सूचित केले. याचा अर्थ, आपले स्वरूप दिखाऊ, विक्षिप्त, उत्तेजक, अंगप्रदर्शक किंवा अतिशय फॅशनेबल असू नये. शिवाय, आपण ‘देवभक्तिला’ अनुसरून पेहराव करावा. हे शब्द आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात, नाही का? याचा अर्थ आपण केवळ मंडळीच्या सभांना उपस्थित राहतेवेळी योग्य पेहराव करावा आणि इतर वेळी आपल्या पेहरावाविषयी बेफिकीर राहावे असा नाही. आपल्या वैयक्तिक पेहरावावरून नेहमी एक भक्तिपूर्ण, आदरयुक्त मनोवृत्ती दिसून आली पाहिजे कारण आपण २४ तास ख्रिस्ती व सेवक आहोत. आपण कामाच्या ठिकाणी किंवा शाळाकॉलेजात घालतो ते कपडे अर्थातच आपण जे काम करणार आहोत त्याला साजेसे असतात यात शंका नाही. पण तरीसुद्धा आपण भिडस्तपणाने व आदरयुक्त पद्धतीने पेहराव करण्याची नेहमी काळजी घेतली पाहिजे. आपला पेहराव नेहमी आपल्याला देवावर असलेला विश्वास प्रतिबिंबित करत असल्यास, आपल्याला कधीही आपल्या कपड्यांमुळे अनौपचारिक साक्ष देण्यास मागेपुढे पाहावे लागणार नाही.—१ पेत्र ३:१५.
‘जगावर प्रीति करू नका’
१५, १६. (अ) पेहरावाच्या बाबतीत आपण जगाचे अनुकरण न करणे का महत्त्वाचे आहे? (१ योहान ५:१९) (ब) कोणत्या व्यावहारिक कारणामुळे आपण पेहरावाच्या बाबतीत लोकप्रिय पद्धतींचे अनुकरण करू नये?
१५ पहिले योहान २:१५, १६ येथे केलेला बोध पेहराव व शृंगाराच्या बाबतीतही मार्गदर्शन पुरवतो. तेथे आपण असे वाचतो: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.”
१६ हा सल्ला खरोखर किती समयोचित आहे! आजच्या जगात आपल्या बरोबरीच्या लोकांचे अनुकरण करण्याचा दबाव अत्यंत तीव्र आहे, पण आपण कधीही या रोमकर १२:२; तीत २:१०.
जगाला पेहरावाविषयीच्या आपल्या निर्णयांवर प्रभाव करू देता कामा नये. अलीकडील वर्षांत पेहरावाचा दर्जा बराच खालावला आहे. व्यावसायिकांच्या पेहरावपद्धतीवरून नेहमीच ख्रिस्ती लोकांकरता कशाप्रकारचा पेहराव योग्य ठरेल हे ठरवता येत नाही. म्हणूनच आपण या “युगाबरोबर समरूप” न होण्याविषयी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. तरच आपण देवाच्या दर्जांनुसार जगून “सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणू शकू.—१७. (अ) कपड्यांची खरेदी करताना किंवा विशिष्ट स्टाईल निवडताना आपण कोणते प्रश्न विचारात घेतले पाहिजेत? (ब) कुटुंब प्रमुखांना कुटुंबातील सदस्यांच्या पेहराव शृंगाराकडे का लक्ष दिले पाहिजे?
१७ कपडे विकत घेताना स्वतःला पुढचे प्रश्न विचारणे शहाणपणाचे ठरेल: ‘ही विशिष्ट स्टाईल मला का आवडली? हिचा संबंध कोणा लोकप्रिय कलाकारासोबत, मला आवडणाऱ्या एखाद्या लोकप्रिय व्यक्तिसोबत जोडला जातो का? ही स्टाईल, स्वैराचारी, बंडखोर प्रवृत्तीला बढावा देणाऱ्या एखाद्या गटाचे ओळखचिन्ह बनली आहे का?’ तसेच आपण जे कपडे विकत घेऊ इच्छितो त्यांकडेही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. तो ड्रेस अथवा स्कर्ट असल्यास त्याची लांबी किती आहे? त्याच्या आकाराविषयी काय? ते वस्त्र सभ्य, प्रसंगाला अनुरूप, आदरपूर्ण आहे का की ते घट्ट बसणारे, उत्तेजक किंवा गबाळे आहेत? स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘हे कपडे घातल्यामुळे कोणाला अडखळण्याचे कारण मिळेल का?’ (१ करिंथकर ६:३, ४) याचा विचार करणे का आवश्यक आहे? कारण बायबल म्हणते: “ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोमकर १५:३) ख्रिस्ती कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या पेहरावाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण ज्या महिमावान देवाची उपासना करतो त्याच्याबद्दल आदर दाखवण्याकरता कुटुंब प्रमुखांनी गरज भासल्यास कडक, पण प्रेमळ मार्गदर्शन देण्यास कचरू नये.—याकोब ३:१३.
१८. तुमच्या पेहरावाकडे लक्ष देण्यास कोणती गोष्ट तुम्हाला प्रवृत्त करते?
१८ आपला संदेश यहोवाकडून येतो, जो आदरपूर्णतेचा आणि पवित्रतेचा उगम आहे. (यशया ६:३) बायबल आपल्याला “प्रिय मुले” या नात्याने त्याचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देते. (इफिसकर ५:१) आपला पेहराव व शृंगार आपल्या स्वर्गीय पित्याची एकतर चांगली किंवा वाईट ओळख करून देतो. आपण निश्चितच त्याला संतुष्ट करू इच्छितो!—नीतिसूत्रे २७:११.
१९. ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ इतरांना सांगितल्यामुळे कोणते लाभ होतात?
१९ तुम्हाला शिकायला मिळालेल्या ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ तुमच्या कशा भावना आहेत? खरोखर आपण किती आशीर्वादित आहोत की आपल्याला सत्य शिकायला मिळाले! येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्तावर आपण विश्वास प्रकट करत असल्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. (प्रेषितांची कृत्ये २:३८) यामुळे, आपण देवासमोर येऊन मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करू शकतो. आपल्याला कोणतीही आशा नसलेल्या लोकांप्रमाणे मृत्यूची भीती वाटत नाही. उलट आपल्याला येशूने आश्वासन दिले आहे, की एक दिवस असा येईल जेव्हा “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) यहोवाची आपल्यावर अगाध कृपा असल्यामुळेच त्याने या सर्व गोष्टी आपल्याला कळवल्या आहेत. शिवाय, त्याने आपल्यावर त्याचा आत्मा ओतला आहे. या सर्व उत्तम दानांबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेने आपल्याला त्याच्या अत्युच्च दर्जांचा आदर करण्यास आणि त्याची आवेशाने स्तुती करण्यास व या ‘महत्कृत्यांविषयी’ इतरांनाही सांगण्यास प्रेरित केले पाहिजे.
[तळटीपा]
^ परि. 5 यहोवाने मोशे व अहरोन यांना आपल्या लोकांच्या वतीने फारोशी बोलण्याकरता नियुक्त केले, तेव्हा त्याने मोशेला सांगितले: “तुला मी फारोचा देव करितो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.” (तिरपे वळण आमचे.) (निर्गम ७:१) अहरोन एक संदेष्टा होता, भविष्य भाकीत करण्याच्या अर्थाने नव्हे तर मोशेचा प्रवक्ता म्हणून तो कार्य करत होता या अर्थाने.
^ परि. 7 मार्च २८, २००२ रोजी प्रभूच्या सांज भोजनाच्या वार्षिक विधीला उपस्थित राहिलेल्या बहुसंख्य लोकांपैकी लाखो लोक अद्याप यहोवाची सक्रिय सेवा करत नाहीत. या आस्था बाळगणाऱ्यांपैकी अधिकाधिक लोकांचे अंतःकरण त्यांना सुवार्तेचे प्रचारक बनण्याचा विशेषाधिकार मिळवण्यास प्रवृत्त करो अशीच आपली प्रार्थना आहे.
^ परि. 12 पौलाचे शब्द खासकरून ख्रिस्ती स्त्रियांना उद्देशून लिहिलेले असले तरीसुद्धा त्यातील तत्त्वे ख्रिस्ती पुरुषांना आणि तरुणांनाही लागू होतात.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी लोकांनी कोणत्या ‘महत्कृत्यांविषयी’ ऐकले आणि त्यांनी कसा प्रतिसाद दिला?
• एक व्यक्ती येशू ख्रिस्ताचा शिष्य कशाप्रकारे बनते आणि येशूचे शिष्य होण्यात कशाचा समावेश आहे?
• आपल्या पेहरावाकडे व शृंगाराकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?
• एखादे वस्त्र घेण्याजोगे किंवा एखादी स्टाईल अनुकरण करण्याजोगी आहे किंवा नाही हे ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
पेत्राने येशू मृतांतून उठला असल्याची घोषणा केली
[१७ पानांवरील चित्रे]
तुमचा वैयक्तिक पेहराव तुम्ही ज्याची उपासना करता त्या देवाविषयी उत्तम साक्ष देतो का?
[१८ पानांवरील चित्रे]
ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांच्या पेहरावाविषयी अभिरूची दाखवली पाहिजे