व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बलाक शिकवतो धडा

बलाक शिकवतो धडा

बलाक शिकवतो धडा

“आकाशातील करकोची [“बलाक,” NW] आपला नेमिलेला समय जाणते; . . . पण माझे लोक परमेश्‍वराचा निर्णय ओळखीत नाहीत.” (यिर्मया ८:७) या शब्दांत यिर्मया संदेष्ट्याने यहुदाच्या धर्मत्यागी लोकांविरुद्ध यहोवाचा न्याय सुनावला ज्यांनी त्यांच्या यहोवा देवाला सोडून दिले होते आणि अन्य देवतांची उपासना करायला सुरवात केली होती. (यिर्मया ७:१८, ३१) यिर्मयाने अविश्‍वासू यहूद्यांना धडा शिकवण्यासाठी बलाक पक्ष्याचा उपयोग का केला?

इस्राएली लोकांकरता बलाक आणि विशेषकरून श्‍वेतबलाक अत्यंत परिचयाचा होता कारण हे पक्षी बायबल प्रदेशांमधून स्थलांतरण करत. या मोठ्या, लांब पायांच्या पाणपक्ष्याचे इब्री नाव, “एकनिष्ठ; प्रेमदया असलेला” या अर्थाच्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. हे नाव अगदी साजेसे आहे कारण श्‍वेतबलाकाचे नर-मादी आजीवन सोबती राहतात; इतर बहुतेक पक्ष्यांत हे अभावानेच आढळते. उष्ण ठिकाणी हिवाळा घालवल्यानंतर बलाक प्रत्येक वर्षी त्याच घरट्यात पुन्हा येत असतात.

बलाकाचे आणखी एक उपजत वर्तन, एकनिष्ठपणाच्या गुणाचे इतर असाधारण मार्गांनी वर्णन करते. नर-मादी दोघेही अंडी उबवतात व पिलांना खाऊ घालतात. आपले अद्‌भुत वन्यजीवन (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले आहे: “बलाकाची जोडपी अत्यंत विश्‍वासू असतात. जर्मनीत एक नर बलाक विद्युत तारांमध्ये अडकून विद्युत झटक्याने ठार झाला. त्याची सोबतीण ३ दिवस एकटी अंडी उबवत राहिली, यादरम्यान तिने अन्‍नाच्या शोधात एकदाच घरटे सोडले. . . . दुसऱ्‍या एका प्रसंगी, एक मादी बलाक ठार मारल्यावर नराने पिलांची काळजी घेतली.”

आपल्या जीवनसाथीबद्दल उपजत विश्‍वासूपणा दाखवून व पिलांची काळजी घेऊन बलाक आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे “एकनिष्ठ” असतो. त्यामुळे, बलाक पक्षी अविश्‍वासू आणि हट्टी इस्राएलांकरता एक जबरदस्त धडा ठरले.

आज अनेक लोकांना वाटते की एकनिष्ठा आणि विश्‍वासूपणा या सगळ्या जुन्या कल्पना आहेत—त्या प्रसंशनीय आहेत पण व्यावहारिक नाहीत. घटस्फोट, सोडून जाणे, हडप करणे आणि इतर प्रकारच्या फसवणुकीवरून एकनिष्ठेला मूल्य राहिलेले नाही असे दिसते. याच्या अगदी उलट, प्रीती आणि चांगुलपणाने प्रेरित असलेल्या एकनिष्ठपणाचा बायबल गौरव करते. त्यात ख्रिश्‍चनांना असे आर्जवले आहे की, “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिसकर ४:२४) होय, नवा मनुष्य आपल्याला एकनिष्ठ असायला मदत करतो परंतु बलाक पक्ष्याच्या एकनिष्ठपणावरूनही आपण धडा घेऊ शकतो.