व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकनिष्ठपणाबद्दल विकृत दृष्टिकोन बाळगणारे जग

एकनिष्ठपणाबद्दल विकृत दृष्टिकोन बाळगणारे जग

एकनिष्ठपणाबद्दल विकृत दृष्टिकोन बाळगणारे जग

तेल अव्हीह, इस्राएल येथे, एका शुक्रवारी संध्याकाळी एका नाईटक्लबच्या बाहेर काही तरुण उभे असताना आणखी एक तरुण त्यांच्यात सामील झाला. काही क्षणांनंतर अचानक स्फोट झाला.

आणखी एका मानवी बॉम्बने स्वतःबरोबर १९ इतर तरुणांचाही हिसंकरित्या जीव घेतला होता. “सगळीकडे शरीराचे तुकडे फेकले गेले; सगळी अगदी तरुण मुले होती—माझ्या आयुष्यातली ही सर्वात भयंकर घटना आहे,” असे एका वैद्यकीय कर्मचाऱ्‍याने पत्रकारांना नंतर सांगितले.

‘एकनिष्ठपणासारख्या गुणांची सर्वजण प्रशंसा करतात पण तेच गुण सहसा युद्धे सुरू होण्यास कारणीभूत ठरतात आणि ती संपुष्टात येऊ देत नाहीत,’ असे थर्स्टन ब्रुअन यांनी द लॅन्सेट यात म्हटले. होय, ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मयुद्धांपासून नात्सी जर्मनीच्या सामूहिक हत्यांपर्यंतचा मानवी इतिहास एकनिष्ठपणाच्या नावाखाली केलेल्या कत्तलीने रक्‍तरंजित आहे.

बेइमानपणाचे वाढते बळी

अंधळा एकनिष्ठपणा नाशकारक असू शकतो यात काहीच शंका नाही, पण एकनिष्ठपणाचा अभाव देखील समाजाकरता नाशकारक ठरू शकतो. वेबस्टर्स न्यू एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी यात दिल्यानुसार, एकनिष्ठ असणे म्हणजे ‘व्यक्‍तीला किंवा एखाद्या कार्याला विश्‍वासू असणे’ आणि यातून “त्यागण्याचा किंवा विश्‍वासघाती होण्याचा कितीही मोह झाला तरी खंबीर राहण्याचा अर्थ सुचवला जातो.” अशाप्रकारचा एकनिष्ठपणा बहुतांश लोकांना प्रशंसनीय वाटत असला तरी समाजातील सर्वात मूलभूत स्तरावर अर्थात कौटुंबिक वर्तुळातच एकनिष्ठपणाचा अभाव फार दिसून येत आहे. घटस्फोटाचे प्रमाण एकदम वाढले आहे आणि याला, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा अट्टहास, दररोजच्या जीवनातील ताणतणाव आणि पतीपत्नींमधील अविश्‍वासूपणा कारणीभूत ठरला आहे. आणि तेल अव्हीहमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेप्रमाणे सहसा तरुण लोक निर्दोष बळी ठरतात.

“घटस्फोट, विभक्‍त होणे आणि एकटे पालकत्व यांमुळे निर्माण होणाऱ्‍या कुटुंबातील अस्थिरतेचा दुष्परिणाम सहसा मुलांच्या शिक्षणावर होतो,” असे एका वृत्तात म्हटले होते. विशेषकरून, एकटी आई असलेल्या कुटुंबातील मुलगे अपुरे शिक्षण, आत्महत्या आणि बालगुन्हेगारीला बळी पडतात. अमेरिकेत, दरवर्षी दहा लाख मुले आपल्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला पाहतात; आणि कोणत्याही वर्षी, विवाहित जोडप्यांना जन्मलेल्या मुलांपैकी निम्मी मुले १८ वर्षांची होईपर्यंत पालकांच्या घटस्फोटाला बळी पडलेले असतील. आकडेवारींवरून असे दिसते की, जगाच्या इतर भागांतील बहुतेक तरुणांच्या वाट्याला देखील हीच हृदयद्रावक कहाणी येणार आहे.

एकनिष्ठपणा—फार उदात्त दर्जा?

सध्या पारंपरिक एकनिष्ठपणाच्या अभावामुळे राजा दाविदाचे शब्द आज अधिक लागू होतात: “हे परमेश्‍वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्‍तिमान [“एकनिष्ठ,” NW] उरला नाही; मानवजातीतले विश्‍वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.” (स्तोत्र १२:१) एकनिष्ठपणाचा सगळीकडेच असा अभाव का? टाईम मासिकात लेखन करणारे रॉजर रोसनब्लॅट म्हणतात: “एकनिष्ठपणा हा उदात्त दर्जा आहे; परंतु भितरेपणा, कमीपणाची भावना, संधीसाधूपणा आणि महत्त्वाकांक्षीपणा हे [गुण] आपल्यात स्वाभाविक असल्यामुळे आपल्यासारख्या दुबळ्या लोकांना हा दर्जा अवलंबणे शक्य नाही.” आपल्या काळाचे वर्णन करत बायबल स्पष्टपणे म्हणते: “माणसे स्वार्थी, . . . बेइमान, निर्दयी . . . अशी होतील”—२ तीमथ्य ३:१-५, NW.

एकनिष्ठपणाचा—किंवा त्याच्या अभावाचा एखाद्या व्यक्‍तीच्या विचारसरणीवर व कृतींवर पडणाऱ्‍या जबरदस्त प्रभावाचा विचार करता आपण असे विचारू, ‘आपला एकनिष्ठपणा कोणाला मिळायला हवा?’ या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात काय दिले आहे ते पाहा.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरचा फोटो: © AFP/CORBIS