तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• सहानुभूती म्हणजे काय आणि ख्रिश्चनांनी ती का विकसित केली पाहिजे?
सहानुभूती म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याची क्षमता; जसे की दुसऱ्याचे दुःख जणू काय आपण आपल्या काळजात अनुभवतो. ख्रिश्चनांना, “समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू” होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (१ पेत्र ३:८) सहानुभूती दाखवण्यात यहोवाने सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले. (स्तोत्र १०३:१४; जखऱ्या २:८) लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे, पाहण्याद्वारे आणि कल्पना करण्याद्वारे आपण, इतरांच्या गरजांची आणि भावनांची जाणीव वाढवू शकतो.—४/१५, पृष्ठे २४-६.
• खरा आनंद मिळवण्यासाठी, शारीरिक दुर्बलतांवर कायमचा तोडगा मिळण्याआधी आध्यात्मिकरीत्या निरोगी होणे महत्त्वाचे का आहे?
शारीरिकरित्या सुदृढ असलेले अनेक लोक दुःखी आहेत. पण, शारीरिक दुर्बलता असलेले अनेक ख्रिस्ती आज यहोवाची सेवा करत असल्यामुळे आनंदी आहेत. आध्यात्मिकरीत्या निरोगी झाल्याने लाभ मिळालेल्या लोकांना नवीन जगात शारीरिक दुर्बलतांपासून मुक्त होण्याचा अनुभव मिळणार आहे.—५/१, पृष्ठे ६-७.
• इब्री लोकांस १२:१६ मध्ये एसावाच्या कृत्यांची तुलना जारकर्माशी का करण्यात आली?
बायबल अहवाल दाखवतो, की एसावाने अशी मनोवृत्ती दाखवली जी फक्त लगेच मिळणाऱ्या प्रतिफळांवर केंद्रित होती आणि पवित्र गोष्टींविषयी त्याला कदर नव्हती. आजही कोणी अशाप्रकारची मनोवृत्ती दाखवत असेल तर त्याच्या हातून जारकर्मासारखी गंभीर पापे घडण्याची शक्यता आहे.—५/१, पृष्ठे १०-११.
• टर्टुलियन कोण होता आणि तो कशासाठी नावाजलेला होता?
टर्टुलियन एक लेखक व तत्त्ववेत्ता होता व तो सा.यु. दुसऱ्या व तिसऱ्या शतकात हयात होता. तथाकथित ख्रिस्ती धर्माचे समर्थन करणारी अनेक लिखाणे तयार केल्याबद्दल तो नावाजलेला होता. समर्थन करता करता त्याने अशा नवीन कल्पनांची व तात्त्विक सिद्धान्तांची सुरवात केली ज्या सैद्धान्तिक भ्रष्टतेचा पाया ठरल्या; जसे की त्रैक्याचा सिद्धान्त.—५/१५, पृष्ठे २९-३१.
• मानवी आजार, वर्तन आणि मरण यासाठी जनुके पूर्णपणे कारणीभूत का नाहीत?
शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे, की विविध मानवी आजारांसाठी एक जनुकीय कारण निश्चितच आहे आणि काहींचा तर असाही विश्वास आहे, की मानवी वर्तनही जनुकेच ठरवतात. पण, बायबल मानवाच्या उगमाविषयी सूक्ष्मदृष्टी देते; शिवाय, मानवजात पापी आणि अपरिपूर्ण कशी झाली हेही सांगते. व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत जनुकांची भूमिका असली तरी, आपल्या अपरिपूर्णता आणि आपले वातावरण यांचा बराच प्रभाव आहे.—६/१, पृष्ठे ९-११.
• ऑक्सिऱ्हिंकस, ईजिप्त येथे सापडलेल्या एका पपायरस कागदाच्या तुकड्यामुळे देवाच्या नावाच्या वापराविषयी कोणती माहिती उजेडात आली?
या तुकड्यावर, ग्रीक बायबलमधील [सेप्टुअजिंट] ईयोब ४२:११, १२ यातील देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे आहेत. हा आणखी एक पुरावा आहे, की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी सर्रास ज्यातून उद्धृत केले त्या सेप्टुअजिंटमध्ये इब्री भाषेत देवाचे नाव आहे.—६/१, पृष्ठ ३०.
• रोमी साम्राज्यातील हिंसक व घातक असिक्रीडकांची तुलना आजच्या दिवसांतील कोणत्या सामन्यांशी करण्यात आली आहे?
अलीकडेच इटली, रोममधील कोलसियममध्ये एक प्रदर्शन (सँग ई अरीना, “रक्त व वाळू”) भरवण्यात आले होते. या प्रदर्शनातील काही गोष्टी आधुनिक प्रतिरूपे असल्याचा भास झाला; खासकरून यात बैलाची झुंज, व्यावसायिक मुष्टियुद्ध, मोटारींच्या व मोटरसायकलींच्या स्पर्धा आणि इतर खेळांदरम्यान प्रेक्षकांची आपसातील दंगलीच्या स्वरूपाची भांडणे दाखवण्यात आली. प्राचीन काळच्या ख्रिश्चनांनी ओळखले होते, की यहोवा, हिंसेवर आणि हिंसा करणाऱ्यांवर प्रेम करत नाही आणि आजच्या ख्रिश्चनांनीही करू नये. (स्तोत्र ११:५)—६/१५, पृष्ठ २९.
• परिणामकारक शिक्षक होण्याचा प्रयत्न करताना आपण एज्राच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?
एज्राने केलेल्या चार गोष्टींवर एज्रा ७:१० जोर देते; आपणही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू शकतो. नवे जग भाषांतरात म्हटले आहे, की एज्राने [१] आपल्या मनाची तयारी केली. हे त्याने परमेश्वराच्या नियमशास्त्रातून [२] सल्ला घेण्याकरता [३] त्याप्रमाणे चालण्याकरता आणि [४] इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याकरता केले.—७/१, पृष्ठ २०.
• कोणत्या दोन प्रसंगी एका ख्रिस्ती स्त्रीने डोक्यावर पदर घेणे उचित आहे?
एक प्रसंग आहे, कुटुंबात असताना. डोक्यावर पदर घेण्याद्वारे ती दाखवून देते, की प्रार्थनेसाठी व बायबल शिक्षणासाठी पुढाकार घेण्याची पतीची जबाबदारी ती मान्य करते. दुसरा प्रसंग आहे, मंडळीच्या कार्यांत. बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांना शास्त्रवचनांनुसार शिकवण्याचा व मार्गदर्शन पुरवण्याचा अधिकार आहे हे ती मान्य करते. (१ करिंथकर ११:३-१०)—७/१५, पृष्ठे २६-७.
• योग केवळ व्यायाम नाही व घातकही आहे, हे ख्रिस्ती का मान्य करतात?
योगशास्त्राचा उद्देश एका व्यक्तीला एका अलौकिक आत्म्याशी ‘जुळण्याचा’ आध्यात्मिक अनुभव घडवून देणे. देवाच्या मार्गदर्शनाच्या अगदी उलट योगशास्त्रात, स्वाभाविक मानसिक क्रिया (मुद्दामहून) थांबवणे समाविष्ट आहे. (रोमकर १२:१, २) योगामुळे एखादी व्यक्ती भूतविद्या व पिशाच्चवाद यातील धोक्यांच्या संपर्कात येण्याची भीती आहे. (अनुवाद १८:१०, ११)—८/१, पृष्ठे २०-२.