तुम्ही तुमची सचोटी टिकवून ठेवाल का?
तुम्ही तुमची सचोटी टिकवून ठेवाल का?
काल किती चिमण्या मृत्यूमुखी पडल्या? कोणालाच ठाऊक नाही आणि कदाचित फार कमी लोक याची दखल घेतील कारण असे कितीतरी पक्षी आहेत. पण, यहोवाला काळजी आहे. या क्षुल्लक वाटणाऱ्या पक्ष्यांचा उल्लेख करून येशूने आपल्याला शिष्यांना म्हटले: “तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही.” तो पुढे म्हणाला: “म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”—मत्तय १०:२९, ३१.
शिष्यांना नंतर स्पष्टपणे समजले, की यहोवा त्यांना खरोखरच किती मोलाचे समजतो. त्यांतील एक जण, प्रेषित योहान याने असे लिहिले: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली.” (१ योहान ४:९) यहोवा फक्त खंडणीचीच व्यवस्था करत नाही तर आपल्या प्रत्येक सेवकाला ही हमी देतो, की “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.
यावरून हे स्पष्ट होते, की आपल्या लोकांबद्दल यहोवाला असलेले प्रेम हे चिरस्थायी आहे. पण मग प्रश्न असा उद्भवतो, की ‘यहोवावरचे आपले प्रेम, आपण त्याला कधीही सोडणार नाही इतके चिरस्थायी आहे का?’
आपली सचोटी तोडण्याचे सैतानाचे प्रयत्न
यहोवाने ईयोबाच्या सचोटीकडे सैतानाचे लक्ष वेधले तेव्हा सैतान म्हणाला: “ईयोब [तुझे] भय काय फुकट बाळगितो?” (ईयोब १:९) सैतानाच्या म्हणण्याचा असा अर्थ होता की, मानव देवाला फक्त लाभ मिळेपर्यंतच सचोटी दाखवतात. हे खरे असेल, तर कोणीही ख्रिस्ती व्यक्ती, एखादा प्रसंग बऱ्याच प्रमाणात मोहक असतो तेव्हा हातमिळवणी करेल.
ईयोबाच्या बाबतीत, सैतानाने पहिल्यांदा असा दावा केला, की ईयोबाने संपादन केलेली त्याची सर्वात प्रिय मालमत्ता गमावली तर त्याची सचोटी नाहीशी होईल. (ईयोब १:१०, ११) पण हा दावा खोटा ठरल्याने अपमानीत होऊन सैतानाने आरोप केला: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) काहींच्या बाबतीत सैतानाचा हा दावा खरा ठरला असला तरी, ईयोबाने मात्र हातमिळवणी केली नाही. इतिहास साक्ष देतो, की ईयोबाने आपली सचोटी टिकवली. (ईयोब २७:५; ४२:१०-१७) तुम्ही देखील असेच एकनिष्ठ आहात का? सैतानाला तुम्ही तुमच्या सचोटीचा भंग करू द्याल का? आपण काही सत्यांचे परीक्षण करून पाहू या ज्यात प्रत्येक ख्रिश्चन गोवलेला आहे; आणि असे परीक्षण करत असताना तुम्ही स्वतःचा विचार करा.
प्रेषित पौलाचा असा विश्वास होता, की खरी ख्रिस्ती एकनिष्ठा अतिशय बळकट असू शकते. त्याने लिहिले: “माझी खात्री आहे की, मरण, जीवन, . . . वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, . . . कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.” (रोमकर ८:३८, ३९) यहोवावरील आपले प्रेम असेच गाढ असेल तर आपणही असा आत्मविश्वास बाळगू शकतो. अशा प्रकारचे प्रेम एक अविनाशी बंधन असते जे मृत्यूने देखील तुटत नाही.
देवाबरोबर आपले नाते असे अतूट असेल तर आपण केव्हाही असा विचार करणार नाही, की ‘काय सांगता येते, आणखी काही वर्षांनी मी यहोवाची सेवा करत असेन की नाही?’ अशा अनिश्चित मनोवृत्तीवरून हेच सूचित होते, की २ करिंथकर ४:१६-१८) आपण पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करत असू तर आपण केव्हाही त्याला निराश करणार नाही.—मत्तय २२:३७; १ करिंथकर १३:८.
देवाला आपण दाखवत असलेली सचोटी ही, आपल्या जीवनात पुढे काय होईल त्यावर अवलंबून आहे. मनापासून असलेल्या खऱ्या सचोटीवर बाहेरील परिस्थितीचा कसलाही प्रभाव पडत नाही. आपण आतून कोणत्या प्रकारची व्यक्ती आहोत यावर हे अवलंबून असते. (पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे, आपल्या सचोटीचा भंग करण्याचे सैतानाचे सतत प्रयत्न चालू असतात. आपण शरीराच्या अभिलाषा, समवयस्कांचा दबाव यांच्या आहारी जावे म्हणून तो आपल्याला मोहात पाडू शकतो किंवा एखाद्या संकटामुळे सत्य सोडून द्यायला तो आपल्याला प्रवृत्त करू शकतो. अशा प्रकारचा हल्ला करण्यात देवापासून दुरावलेले जग सैतानाचा प्रमुख साथीदार आहे; शिवाय, आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णता देखील सैतानाचे काम आणखी सोपे बनवतात. (रोमकर ७:१९, २०; १ योहान २:१६) पण, या युद्धात आपल्याकडे पुष्कळ जमेच्या बाजू आहेत; एक जमेची बाजू जी क्षुल्लक नाही ती म्हणजे, सैतानाच्या युक्तींविषयी आपण अजाण नाही.—२ करिंथकर २:११.
सैतानाच्या कुयुक्त्या कोणत्या आहेत? इफिसकरांना पत्र लिहिताना पौलाने त्यांचे वर्णन ‘डावपेच’ किंवा ‘कपटयुक्त्या’ असे केले. * (इफिसकर ६:११; पं.र.भा.) आपली सचोटी भंग करण्याकरता सैतान धूर्तपणे कुयुक्त्या लढवतो. पण आपण या डावपेचांना ओळखू शकतो, कारण आपल्या माहितीकरता दियाबलाच्या पद्धतींविषयी देवाच्या वचनात लिहून ठेवण्यात आले आहे. येशू आणि ईयोब यांची सचोटी तोडण्यासाठी सैतानाने जे प्रयत्न केले होते त्यावरून आपण समजू शकतो, की आपली ख्रिस्ती सचोटी तोडण्यासाठी तो कोण-कोणत्या पद्धतींचा अवलंब करतो.
येशूची सचोटी भंग करता आली नाही
येशूच्या सेवेच्या सुरवातीलाच, सैतानाने देवाच्या पुत्राला मोहात पाडण्याचे धाडस केले; धोंड्याची भाकर बनवून दाखवण्याचे त्याने त्याला आव्हान केले. किती हा धूर्तपणा! येशूने ४० दिवस काही खाल्ले नव्हते; त्यामुळे त्याला नक्कीच खूप भूक लागलेली असावी. (लूक ४:२, ३) सैतान येशूला सुचवू पाहत होता, की येशू आपली भूक लगेच मिटवू शकत होता; पण सैतानाने सुचवलेला मार्ग यहोवाच्या इच्छेच्या विरुद्ध होता. तसेच आजही जगाचा मतप्रसार, आपल्यावर होणाऱ्या परिणामांचा जराही विचार करू न देता आपल्या अभिलाषा लगेचच पूर्ण करण्याचे उत्तेजन देतो. ‘तुम्हाला हे हवेच आहे,’ किंवा ‘बिनधास्त करा,’ हा त्यामागचा संदेश असतो.
परिणामांचा कसलाही विचार न करता, येशूने सपाटून लागलेली भूक शमवली असती तर येशूची सचोटी तोडण्यात सैतानाला यश आले असते. परंतु येशूने यहोवाला संतुष्ट करणारा दृष्टिकोन बाळगला व तो खंभीरपणे सैतानाला म्हणाला: “‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”—लूक ४:४; मत्तय ४:४.
सैतानाने मग दुसऱ्या पद्धतीचा उपयोग केला. येशूने ज्याचा उल्लेख केला त्या शास्त्रवचनांचा चुकीचा अर्थ लावून त्याने येशूला मंदिराच्या शिरोभागाहून खाली उडी टाकण्याचे उत्तेजन दिले. सैतान म्हणाला, की त्याने उडी टाकल्यास, ‘एक दूत त्याला हातावर झेलेल.’ स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याकरता आपल्या पित्याकडून चमत्कारिकरीत्या संरक्षण मागण्याचा येशूचा मुळीच हेतू नव्हता. तो म्हणाला: “परमेश्वर मत्तय ४:५-७; लूक ४:९-१२.
जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.”—सैतानाचा तिसरा धूर्त प्रयत्न जरा धाडसी म्हणावा लागेल. उपासनेच्या केवळ एका कृत्याच्या मोबदल्यात जग आणि त्याचे वैभव मिळवता येईल असा सौदा त्याने येशूसोबत करायचा प्रयत्न केला. सैतानाकडे जितके होते ते सर्वकाही तो देऊ इच्छित होता. पण येशू, आपल्या पित्याच्या प्रमुख शत्रूला नमन करून त्याची उपासना कशी करेल? येशूने असे करण्याचे स्वप्नात देखील पाहिले नसेल! येशूने सैतानाला उत्तर दिले: “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”—मत्तय ४:८-११; लूक ४:५-८.
सैतानाचे हे तिन्ही प्रयत्न हाणून पडल्यानंतर तो “संधि मिळेपर्यंत [येशूला] सोडून गेला.” (तिरपे वळण आमचे.) (लूक ४:१३) यावरून हे सूचित होते, की सैतान येशूच्या सचोटीची परीक्षा घेण्यासाठी सतत संधीच्या शोधात होता. अडीच वर्षांनंतर त्याला उचित संधी मिळाली; येशूच्या मृत्यूची घटिका जवळ आली असल्यामुळे तो आपल्या शिष्यांचा योग्य दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांना मदत करू लागला होता. तेव्हा प्रेषित पेत्र येशूला म्हणाला: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”—मत्तय १६:२१, २२.
हा सद्हेतुपूर्ण परंतु चुकीचा सल्ला, आपल्याच एका शिष्याकडून आल्यामुळे येशूला तो पटला का? येशूने लगेच ओळखले की या सल्ल्याच्या शब्दांना, यहोवाच्या नव्हे तर सैतानाच्या विचारांची झाक होती. ख्रिस्ताने अगदी ठामपणे म्हटले: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”—मत्तय १६:२३.
येशूचे यहोवावर अखंड प्रेम असल्यामुळे सैतान येशूची सचोटी तोडू शकला नाही. दियाबलाने येशूला काहीही देऊ केले किंवा त्याच्यावर कठीणातल्या कठीण परीक्षा आणल्या तरीसुद्धा आपल्या स्वर्गीय पित्याप्रती येशूची सचोटी कमजोर झाली नाही. काही परिस्थितींमुळे आपल्याला सचोटी टिकवायला कठीण जाते तेव्हा आपलाही असा दृढनिश्चय असेल का? आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांची चांगल्याप्रकारे समज मिळावी म्हणून ईयोबाचे उदाहरण आपल्याला मदत करू शकेल.
संकटाच्या वेळी एकनिष्ठपणा
ईयोबाला अनुभव आल्याप्रमाणे संकटे आपल्यावर केव्हाही कोसळू शकतात. दहा मुले असलेला तो एक सुखी विवाहित मनुष्य होता आणि आध्यात्मिक गोष्टींनाही त्याच्या जीवनात प्रथम स्थान होते. (ईयोब १:५) पण ईयोबाच्या नकळत, त्याची सचोटी ही स्वर्गीय न्यायालयात वादाचा विषय बनली आणि कसेही करून त्याची सचोटी तोडण्याचा सैतानाने चंग बांधला.
बघता बघता ईयोबाने त्याची सर्व मालमत्ता गमावली. (ईयोब १:१४-१७) तरीपण, ईयोब आपल्या सचोटीच्या परीक्षेत टिकून राहिला कारण, त्याने पैशावर भरवसा ठेवला नाही. श्रीमंत असतानाच्या काळाची आठवण करीत ईयोब म्हणाला: “जर मी सुवर्णावर भरवसा ठेविला असता, . . . जर माझे धन बहुत आहे . . . याचा मी आनंद केला असता, तर हाहि . . . गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकीच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.”—ईयोब ३१:२४, २५, २८.
आजही, एका रात्रीत आपण होतोचे नव्हतो होऊ शकतो. यहोवाचा साक्षीदार असलेल्या एका व्यापाऱ्याची खूप मोठ्या रक्कमेने फसवणूक झाली; यामुळे तो जवळजवळ दिवाळखोर झाला. तो उघडपणे कबूल करतो: “मला हार्टअटॅक येता येता राहिला. खरं तर, देवाबरोबर माझं नातं नसतं तर मला हार्टअटॅक नक्कीच आला असता. पण या अनुभवाने माझे डोळे उघडले, की माझ्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान नव्हते. माझ्यात पैसा कमावण्याचे भूत शिरले होते, त्यामुळे बाकीच्या कुठल्याही गोष्टी मला दिसत नव्हत्या.” तेव्हापासून, या साक्षीदाराने आपल्या व्यापाराचा व्याप कमी केला, नियमितरीत्या साहाय्यक पायनियरींग सुरू केली व दर महिन्याला तो ५० किंवा त्यापेक्षा अधिक तास सेवेत खर्च करतो. परंतु, इतर समस्या, एखाद्याची मालमत्ता गमावल्याने होणाऱ्या आघातापेक्षा अधिक क्लेशदायक असू शकतात.
ईयोब आपली मालमत्ता गमावल्याची बातमी ऐकतो न ऐकतो तोच त्याला आपल्या दहा मुलामुलींच्या मृत्यूची बातमी कळते. इतके सर्व होऊनसुद्धा तो म्हणतो: “धन्य परमेश्वराचे नाम!” (ईयोब १:१८-२१) आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्यास आपणही आपली सचोटी टिकवून ठेवू का? स्पेनमधील फ्रान्सीस्को नावाचे एक ख्रिस्ती पर्यवेक्षक, यांची दोन मुले बसच्या एका दुःखद दुर्घटनेत मरण पावली. परंतु यहोवाच्या समीप आल्याने व ख्रिस्ती सेवेत अधिक भाग घेतल्याने त्यांना सांत्वन मिळाले.
ईयोबाने आपली मुले गमावली; पण एवढ्यावरच त्याची परीक्षा थांबली नाही. सैतानाने त्याला एका किळसवाण्या व वेदनादायक आजाराने पीडिले. त्या वेळेला ईयोबाच्या पत्नीने ईयोब २:९, १०) त्याची सचोटी ही त्याच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या भावनिक पाठिंब्यावर नव्हे तर यहोवाबरोबर असलेले त्याचे व्यक्तिगत नाते यावर आधारित होती.
त्याला चुकीचा सल्ला दिला. ती त्याला म्हणाली: “देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” पण ईयोबाने तिच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही व “आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (दहा पेक्षा अधिक वर्षांआधी, फ्लोराच्या पतीने व मोठ्या मुलाने सत्य सोडून दिले; त्यामुळे ईयोबाच्या भावना ती समजू शकते. ती कबूल करते: “अचानक आपल्या कुटुंबाचा आधार गमावल्याने मानसिक आघात होऊ शकतो. पण मला खात्री होती, की यहोवाच्या संस्थेबाहेर मला आनंद मिळणार नव्हता. त्यामुळे मी खंबीर राहिले आणि चांगली पत्नी व आई होण्याचा प्रयत्न करत असताना नेहमी यहोवाला प्रथम स्थान दिलं. मी सतत यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवानं मला बळकट केलं. माझ्या नवऱ्याचा सतत विरोध असूनही मी आनंदी आहे कारण मी पूर्णपणे यहोवावर विसंबून राहायला शिकले आहे.”
ईयोबाची सचोटी तोडण्याचा सैतानाचा दुसरा डावपेच म्हणजे त्याचे तीन सोबती. (ईयोब २:११-१३) या तिघांनी ईयोबाची टीका केली तेव्हा ईयोबाला किती वाईट वाटले असावे. त्याने त्यांच्या टीकांवर विश्वास ठेवला असता तर यहोवा देवावरचा त्याचा भरवसा उडाला असता. निरुत्साहित करणाऱ्या त्यांच्या सल्ल्यामुळे निराश होऊन त्याने आपली सचोटी भंग होऊ दिली असती; आणि सैतान तर याचीच वाट पाहत होता.
पण ईयोब अटळ राहिला; तो म्हणत राहिला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [“सचोटी,” NW] सोडणार नाही.” (ईयोब २७:५) तो असे म्हणाला नाही, की ‘मी तुम्हाला माझ्या सचोटीचा भंग करू देणार नाही!’ कारण ईयोबाला माहीत होते, की सचोटी टिकवणे हे त्याच्या स्वतःवर आणि यहोवावर असलेल्या त्याच्या प्रेमावर आधारित होते.
नवीन सावजासाठी जुना पाश
सैतान अजूनही, मित्रांकडून व सहविश्वासू बांधवांकडून आलेल्या चुकीच्या सल्ल्याचा किंवा अविचारी बोलण्याचा उपयोग करतो. मंडळीच्या बाहेरून येणाऱ्या छळापेक्षा मंडळीतील लोकांच्या बोलण्यामुळे आलेली निराशा, सहजरीत्या आपला भरवसा कमकुवत करू शकते. एका ख्रिस्ती वडिलांनी, पूर्वी सैन्यात असताना अनुभवलेले युद्ध आणि काही सहख्रिश्चनांच्या अविचारी बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे त्यांना झालेल्या मानसिक वेदना यांत तुलना केली. ते म्हणाले, की युद्धापेक्षा “मला बांधवांच्या अविचारीपणामुळे आलेला वाईट अनुभव अधिक यातनामय वाटला.”
दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, कधीकधी आपण आपल्या बांधवांच्या अपरिपूर्णतांमुळे इतके अस्वस्थ होतो, की आपण त्यांच्याबरोबर बोलायचे सोडून देतो किंवा ख्रिस्ती सभांनाही जायचे सोडून देतो. आपल्या जखमी भावना बऱ्या करणे हा तेव्हा आपल्याकरता सर्वात महत्त्वाचा विषय होऊन जातो. परंतु पायापुरते पाहण्याचा असा दृष्टिकोन बाळगल्याने, इतरांनी आपल्याला काय म्हटले किंवा इतर आपल्याशी कसे वागले यामुळे आपण आपल्याकडे असलेला सर्वात मौल्यवान बहुमान अर्थात यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध हळूहळू गमावत असतो. असे जर आपण होऊ दिले तर आपण सैतान वापरत असलेल्या डावपेचांपैकी एका जुन्या पाशाला बळी पडू.
कबूल आहे, की आपण ख्रिस्ती मंडळीत उच्च दर्जांची अपेक्षा करतो. पण, आपण जर अपरिपूर्ण असलेल्या आपल्या सहउपासकांकडून अवास्तव किंवा अवाजवी अपेक्षा करत असू तर आपण निश्चितच निराश होऊ. उलट, यहोवा आपल्या सेवकांकडून वाजवी अपेक्षा करतो. आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास आपणही इतरांच्या अपरिपूर्णता सहन करण्यास शिकू. (इफिसकर ४:२, ३२) प्रेषित पौलाने असा सल्ला दिला: “तुम्हाला राग आला असेल, तर मनातील आकसाचे पोषण करून पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका; रागावर त्वरित विजय मिळवा. कारण तुम्ही रागावता, तेव्हा तुम्ही सैतानाला कार्य करण्यास जागा देता.”—इफिसकर ४:२६, २७, सुबोध भाषांतर.
बायबल स्पष्टपणे शिकवते, की एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीची सचोटी तोडण्यास वाव मिळतो की नाही हे पाहण्यासाठी सैतान सतत पाळतीवर राहून वेगवेगळ्या धूर्त डावपेचांचा उपयोग करतो. त्याचे काही डावपेच मर्त्य शरीराला अतिशय आकर्षक वाटतात; तर काही डावपेचांमुळे खूप वेदना होतात. तेव्हा, आताच्या या चर्चेत तुम्हाला समजले असेल, की आपण बेसावध का राहता कामा नये. तुमच्या अंतःकरणात खोलवर मुळावलेल्या यहोवाबद्दलच्या प्रेमाच्या आधारावर दियाबलाला खोटे ठरवून यहोवाचे मन आनंदित करा. (नीतिसूत्रे २७:११; योहान ८:४४) लक्षात ठेवा, आपल्या समोर कोणत्याही परीक्षा आल्या तरी खरी सचोटी केव्हाही त्यागू नका.
[तळटीप]
^ परि. 11 बायबल विद्वान डब्ल्यू. ई. वाईन म्हणतात, की मूळ ग्रीक शब्दाचे भाषांतर ‘धूर्त डावपेच’ असेही केले जाऊ शकते.