व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी तुमचे पैसे परत का करत आहे माहीत आहे?”

“मी तुमचे पैसे परत का करत आहे माहीत आहे?”

“मी तुमचे पैसे परत का करत आहे माहीत आहे?”

“मला पैशांची अत्यंत गरज होती,” असे नाना नावाच्या एका एकट्या मातेने लिहिले; ती जॉर्जियाचे प्रजासत्ताक येथील कॅस्पी जिल्ह्यात आपल्या तीन मुलांबरोबर राहते. एके सकाळी तिचे स्वप्न पूर्ण झाले. एका पोलिस स्टेशन जवळ तिला ३०० लारी (सुमारे ७,००० रूपये) सापडले. आजूबाजूला कोणी नव्हते. तिला मिळालेली रक्कमही बरीच होती. लारी हे राष्ट्रीय चलन बनल्यापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांत नानाने १०० लारीच्या नोटा पाहिल्या नव्हत्या. कित्येक वर्षे काबाडकष्ट करूनही स्थानीय व्यापारी इतका पैसा मिळवू शकत नव्हते.

नानाने स्वतःशी विचार केला: ‘हे पैसे घेतल्यावर माझा विश्‍वास, देवाबद्दल माझ्या मनात असलेले भय आणि माझी आध्यात्मिकता मी गमावून बसले तर या पैशाचा काही उपयोग होईल का?’ नानाने अशा प्रकारचे ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व विकसित केले होते; यासाठी तिला कडक छळ आणि मार सहन करावा लागला होता.

पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर तिने पाहिले, की पाच पोलिस अधिकारी हताश होऊन काहीतरी शोधत होते. तिने ओळखले, की ते कदाचित पैसेच शोधत असतील; ती त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली: “तुमचं काही हरवलं आहे का?”

“हो, पैसे हरवलेत,” ते तिला म्हणाले.

“किती पैसे?”

“तीनशे लारी!”

नाना म्हणाली: “मला सापडलेत तुमचे पैसे. मी तुमचे पैसे परत का करत आहे माहीत आहे?” त्यांना माहीत नव्हते.

नाना म्हणाली: “कारण, मी एक यहोवाची साक्षीदार आहे. नसते तर मी तुमचे पैसे परत दिले नसते.”

ज्या पोलिस अधिकाऱ्‍याचे ते पैसे होते त्याने नानाच्या प्रामाणिकतेबद्दल तिला २० लारी बक्षीस दिले.

बघता बघता ही बातमी अख्या कॅस्पी जिल्ह्यात पसरली. दुसऱ्‍या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्‍या एका बाईने नानाला म्हटले: “ते [अधिकारी] नेहमीच तुमची प्रकाशनं त्यांच्या टेबलावर ठेवतात. आता कदाचित त्यांना त्यांची किंमत समजेल.” एका पोलिस अधिकाऱ्‍याने तर असेही बोलून दाखवले: “सगळेच यहोवाचे साक्षीदार असते तर गुन्हे करणारे कोण राहिले असते?”