“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे”
“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे”
“इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता.”—इब्री लोकांस ५:१२.
१. इब्री लोकांस ५:१२ येथील शब्द वाचल्यावर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला काळजी का वाटू शकते?
यालेखाच्या मुख्य शास्त्रवचनातील ईश्वरप्रेरित शब्द वाचल्यावर तुम्ही स्वतःविषयी थोडे काळजीत पडला का? पडला असाल, तर तुम्ही एकटे नाहीत. ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे आपण शिक्षक झालो पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. (मत्तय २८:१९, २०) या काळात तर आपल्याला जमेल तितक्या निपुणतेने शिकवणे अत्यावश्यक झाले आहे. आणि ज्यांना आपण शिकवतो त्यांचे जगणे-मरणे यावर अवलंबून आहे हे देखील आपल्याला माहीत आहे! (१ तीमथ्य ४:१६) म्हणूनच आपल्या मनात असा विचार येतो, की ‘मी हवा तसा चांगला शिक्षक आहे का? मला कशाप्रकारे सुधारणा करता येईल?’
२, ३. (अ) एका शिक्षकाने परिणामकारक रितीने शिकवण्यासंबंधी काय स्पष्टीकरण दिले? (ब) शिकवण्यासंबंधी येशूने आपल्याकरता कोणता कित्ता घालून दिला आहे?
२ पण निरुत्साहित होण्याचे कारण नाही. परिणामकारकपणे शिकवण्याकरता, काही खास कौशल्ये आत्मसात करण्याच्या दृष्टीनेच केवळ आपण विचार केला तर कदाचित हे अतिशय कठीण आहे, आपल्याला जमणार नाही असे वाटू शकते. पण परिणामकारक रितीने शिकवणे हे कौशल्यावर नव्हे तर दुसऱ्या एका गोष्टीवर अवलंबून आहे; आणि ही गोष्ट कितीतरी पटीने महत्त्वाची आहे. या विषयावरील एका पुस्तकात एका अनुभवी शिक्षकाने काय लिहिले ते पाहा: “उत्तम अध्यापन विशिष्ट तंत्रांवर किंवा शिक्षणपद्धतीवर, योजनांवर किंवा त्यांच्या अंमलबजावणीवर अवलंबून नाही. . . . अध्यापन मुळात प्रेमाचा मामला आहे.” अर्थात, वरील लेखकाने सर्वसामान्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ही टिप्पणी केली. पण हाच मुद्दा, आपण ख्रिस्ती या नात्याने देत असलेल्या शिक्षणाविषयी अधिकच समर्पक ठरतो. तो कसा?
३ शिकवण्याच्या बाबतीत आपला आदर्श अर्थातच येशू ख्रिस्त आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले: “मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१५) या ठिकाणी, तो नम्रता दाखवण्याच्या बाबतीत स्वतःचे उदाहरण देत होता, पण त्याने घालून दिलेला कित्ता निश्चितच, या पृथ्वीवर मनुष्य रूपात असताना त्याने केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कार्यालाही लागू होतो; आणि ते म्हणजे लोकांना देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी शिकवणे. (लूक ४:४३) येशूच्या सेवाकार्याचे वैशिष्ठ्य एका शब्दात सांगायचे असल्यास कदाचित तुम्हीही “प्रीती” हा शब्द निवडाल, नाही का? (कलस्सैकर १:१५; १ योहान ४:८) येशूची सर्वाधिक प्रीती आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यावर होती. (योहान १४:३१) पण एक शिक्षक या नात्याने त्याने आणखी दोन मार्गांनी प्रीती प्रदर्शित केली. ज्या सत्यांविषयी तो शिकवत होता त्यांवर आणि ज्या लोकांना तो शिकवत होता त्यांच्यावर त्याला प्रीती होती. त्याने आपल्याला कशाप्रकारे कित्ता घालून दिला आहे याविषयी पाहताना या दोन गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करू या.
ईश्वरी सत्यांविषयी पुरातन काळापासून प्रीती
४. येशूने कशाप्रकारे यहोवाच्या शिकवणीविषयी प्रेम कशाप्रकारे विकसित केले?
४ शिक्षकाची त्याच्या विषयाप्रती असलेली मनोवृत्ती त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवर बराच परिणाम करते. त्याला त्याच्या यशया ५०:४, ५ येथील शब्द अगदी उचित आहेत: “शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोजरोज सकाळी मला जागे करितो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. प्रभु परमेश्वराने माझे कान उघडिले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.”
विषयात तितकासा रस नसेल तर हे त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीत चटकन दिसून येईल आणि मुलांमध्येही तीच वृत्ती निर्माण होईल. येशूने यहोवाविषयी आणि त्याच्या राज्याविषयी जी मोलवान सत्ये शिकवली त्यांच्याप्रती त्याची अशी थंड मनोवृत्ती नव्हती. उलट हा विषय येशूला अतिशय प्रिय होता. हे प्रेम तो स्वतः विद्यार्थी असताना त्याने विकसित केले होते. त्याच्या मानवपूर्व अस्तित्वाच्या असंख्य युगांत देवाच्या या एकुलत्या एका पुत्राने मोठ्या उत्सुकतेने देवाकडून शिक्षण घेतले. म्हणूनच५, ६. (अ) येशूला त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी कोणता अनुभव आला आणि याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला? (ब) देवाच्या वचनाचा उपयोग करण्यासंबंधी येशू व सैतान यांच्यात आपल्याला कोणता फरक दिसून येतो?
५ पृथ्वीवर मानवरूपात वाढत असताना येशूने देवाच्या बुद्धीविषयी तीच उत्सुकता सातत्याने दाखवली. (लूक २:५२) मग त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला एक अद्भुत अनुभव आला. लूक ३:२१ सांगते, “आकाश उघडले गेले.” याचा अर्थ, त्या वेळेपासून येशूला त्याच्या मानवपूर्व अस्तित्वाविषयी सर्वकाही आठवू लागले. यानंतर त्याने ४० दिवस अरण्यात उपवास करत घालवले. स्वर्गात खुद्द यहोवाकडून त्याला शिक्षण मिळाल्याचे सर्व प्रसंग आठवताना व त्यांवर मनन करताना त्याला पराकोटीचा आनंद झाला असेल. पण लवकरच देवाच्या सत्यांविषयीच्या त्याच्या प्रेमाची परीक्षा झाली.
६ येशू थकला व भुकेने व्याकूळ झाला तेव्हा सैतानाने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. देवाच्या या दोन पुत्रांत किती फरक होता! दोघांनीही इब्री शास्त्रवचनांतून वचने उद्धृत केली; पण दोघांची मनोवृत्ती किती वेगळी होती. सैतानाने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवाच्या वचनाचा आदर न करता त्यातील वचनांचा विपर्यास केला. खरोखर विद्रोही सैतानाच्या मनात देवाच्या सत्यांविषयी केवळ तिरस्कार होता. पण तेच दुसरीकडे येशूला शास्त्रवचनांवर प्रीती होती, म्हणूनच त्याने प्रत्येक वेळी सैतानाला उत्तर देताना विचारपूर्वक देवाच्या वचनाचा उपयोग केला. ही प्रेरित वचने लिहिली जाण्याच्या कितीतरी काळाआधीपासूनच येशू अस्तित्वात होता, पण तरीही त्याने या वचनांचा आदर केला. ही त्याच्या स्वर्गीय पित्याकडील मोलवान सत्ये होती! त्याने सैतानाला सांगितले, की यहोवाची ही वचने अन्नापेक्षाही अधिक गरजेची होती. (मत्तय ४:१-११) होय यहोवाने शिकवलेली सर्व सत्ये येशूला प्रिय होती. पण शिक्षकाच्या भूमिकेत त्याने ही प्रीती कशाप्रकारे व्यक्त केली?
शिकवत असलेल्या सत्यांविषयी प्रीती
७. येशूने स्वतःचे विचार का पुढे केले नाहीत?
७ येशू जी सत्ये लोकांना शिकवत होता त्यांविषयी त्याला वाटणारे प्रेम नेहमीच दिसून येत असे. तसे पाहिल्यास, तो सहज स्वतःच्या कल्पनांचा पुरस्कार करू शकला असता. त्याच्याजवळ ज्ञान व बुद्धीचे विस्तृत भांडार होते. (कलस्सैकर २:३) पण त्याने आपले ऐकणाऱ्यांना वारंवार आठवण करून दिली, की जे तो शिकवत होता ते त्याचे स्वतःचे नसून त्याच्या स्वर्गीय पित्याचे होते. (योहान ७:१६; ८:२८; १२:४९; १४:१०) देवाच्या सत्यांवर त्याला इतकी प्रीती होती की त्यांच्याऐवजी स्वतःच्या विचारांना बढावा देण्याचा त्याने विचारही केला नाही.
८. आपल्या सेवाकार्याच्या सुरवातीलाच येशूने देवाच्या वचनावर विसंबून राहण्याच्या बाबतीत कशाप्रकारे कित्ता घालून दिला?
८ येशूने आपली सार्वजनिक सेवा सुरू केली तेव्हाच त्याने एक कित्ता घालून दिला. प्रतिज्ञा केलेला मशीहा आपणच आहोत हे त्याने देवाच्या लोकांपुढे पहिल्यांदा कशाप्रकारे घोषित केले याचा विचार करा. सरळ लोकांपुढे जाऊन, आपण ख्रिस्त असल्याचे घोषित करून हे सिद्ध करण्यासाठी चमत्कार करण्यास त्याने सुरवात केली का? नाही. तर जेथे शास्त्रवचनांचे वाचन करण्याकरता एकत्रित होण्याची लोकांची प्रथा होती तेथे, अर्थात, सभास्थानात तो गेला. तेथे त्याने यशया ६१:१, २ येथील भविष्यवाणी मोठ्याने वाचली आणि ही भविष्यसूचक सत्ये कशाप्रकारे आपल्यालाच लागू होतात हे त्याने लोकांना समजावून सांगितले. (लूक ४:१६-२२) यहोवा त्याच्या पाठीशी होता हे दाखवून देण्याकरता त्याचे चमत्कार सहायक ठरले. पण लोकांना शिकवण्याकरता तो नेहमी देवाच्या वचनाचाच आधार घेत असे.
९. परूशांशी व्यवहार करताना येशूने देवाच्या वचनावरील आपली एकनिष्ठ प्रीती कशाप्रकारे व्यक्त केली?
९ धर्मपुढाऱ्यांनी येशूचा विरोध केला, त्याला आव्हान केले तेव्हा त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न केला नाही; खरे पाहता असा सामना झाला असता, तर तो त्यांच्याविरुद्ध सहज जिंकला असता. पण त्याने देवाच्या वचनालाच या विरोधकांचे खंडन करू दिले. उदाहरणार्थ, येशूच्या अनुयायांनी शब्बाथाच्या दिवशी शेतातून जाताना कणसे तोडून खाल्ली तेव्हा त्यांनी शब्बाथाचा नियम मोडला असा परूशांनी मत्तय १२:१-५) अर्थातच या फाजील धार्मिक माणसांनी १ शमुवेल २१:१-६ येथील प्रेरित अहवाल वाचला असेलच. पण त्यातील महत्त्वाचा धडा त्यांना समजला नव्हता. पण येशूने हा अहवाल केवळ वाचला नाही. त्याने त्यावर विचार केला होता आणि त्यातील संदेश मनःपूर्वक स्वीकारला होता. यहोवाने त्या वृत्तान्तातून शिकवलेली तत्त्वे त्याला प्रिय वाटू लागली. म्हणूनच त्याने या अहवालाचा, तसेच मोशेच्या नियमशास्त्रातील एका उदाहरणाचा उपयोग करून नियमशास्त्रामागील संतुलित मनोवृत्तीवर प्रकाश टाकला. त्याचप्रकारे, स्वतःचे स्वार्थी हेतू साधण्याकरता शास्त्रवचनांचा विपर्यास करणाऱ्या व मानवी परंपरांच्या ढिगाऱ्याखाली देवाच्या वचनाला दाबू इच्छिणाऱ्या धर्मपुढाऱ्यांच्या दुष्ट प्रयत्नांपासून देवाच्या वचनाचे रक्षण करण्याकरता येशूच्या एकनिष्ठ प्रीतीने त्याला प्रेरित केले.
आरोप केला तेव्हाचा प्रसंग आठवा. येशूने त्यांना उत्तर दिले: “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले?” (१०. येशूने त्याच्या शिकवण्याच्या उत्तम पद्धतीविषयी केलेल्या भविष्यवाण्यांची कशाप्रकारे पूर्तता केली?
१० येशूला आपला शिकवण्याचा विषय प्रिय असल्यामुळे त्याने कधीही यांत्रिक पद्धतीने केवळ कर्तव्याच्या भावनेतून शिकवले नाही. देवाने प्रेरित केलेल्या भविष्यवाण्यांनी आधीच सूचित केले होते की मशीहाच्या ‘मुखात प्रसाद भरलेला’ असेल व तो “सुंदर भाषणे” करेल. (स्तोत्र ४५:२; उत्पत्ति ४९:२१) येशूला मनापासून प्रिय वाटणारी सत्ये शिकवताना त्याने “कृपावचने” वापरून आपला संदेश सजीव व उत्साहपूर्ण ठेवला आणि अशाप्रकारे या भविष्यवाण्यांची पूर्तता केली. (लूक ४:२२) त्याचा उत्साह साहजिकच त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांतून दिसून आला असेल आणि त्याला त्याच्या विषयात असलेल्या मनःपूर्वक अभिरूचीमुळे त्याच्या डोळ्यांत एकप्रकारची चमक आली असावी. त्याच्या श्रोत्यांना त्याचे बोलणे ऐकताना किती आनंद वाटला असेल; आपल्याला शिकायला मिळालेल्या गोष्टींविषयी इतरांशी बोलताना आपणही अनुकरण करावा असा उत्तम कित्ता येशूने आपल्याकरता घालून दिला आहे!
११. एक शिक्षक या नात्याने येशूजवळ असलेल्या नैपुण्याने त्याला गर्विष्ठ का बनवले नाही?
११ देवाच्या सत्यांविषयी असलेली पूर्ण समज आणि आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकण्याची कुवत असल्यामुळे येशू गर्विष्ठ बनला का? मानवी शिक्षकांच्या बाबतीत सहसा असे घडते. पण येशूजवळ देवाची बुद्धी होती हे आठवणीत असू द्या. ही बुद्धी गर्विष्ठपणाला थारा देत नाही कारण “नम्र जनांच्या ठायी ज्ञान [“बुद्धी,” NW] असते.” (नीतिसूत्रे ११:२) आणखी एक गोष्ट होती जिच्यामुळे येशू गर्वाने फुगला नाही.
शिकवत असलेल्या लोकांवर प्रीती
१२. येशूने कशाप्रकारे दाखवले की आपल्या अनुयायांनी त्याचे भय बाळगावे अशी त्याची इच्छा नव्हती?
१२ येशूला लोकांविषयी असलेले मनःपूर्वक प्रेम त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीतून नेहमीच दिसून येत असे. गर्विष्ठ मानवांप्रमाणे, त्याची शिकवण्याची पद्धत कधीही लोकांना तुच्छ लेखणारी नव्हती. (उपदेशक ८:९) येशूचा एक चमत्कार पाहिल्यानंतर पेत्र इतका अचंबित झाला की तो येशूच्या पाया पडला. पण आपल्या अनुयायांनी आपले असे अवास्तव भय बाळगावे अशी येशूची इच्छा नव्हती. त्याने प्रेमाने म्हटले, “भिऊ नको” आणि त्यानंतर त्याने पेत्राला शिष्य बनवण्याच्या रोमांचक कार्याविषयी सांगितले ज्यात पेत्र पुढे सहभाग घेणार होता. (लूक ५:८-१०) आपल्या शिष्यांनी आपल्या शिक्षकाच्या भीतीने नव्हे, तर देवाविषयीच्या मोलवान सत्यांबद्दल त्यांना वाटणाऱ्या वैयक्तिक प्रेमाने प्रेरित होऊन कार्य करावे अशी येशूची इच्छा होती.
१३, १४. येशूने कशाप्रकारे लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली?
१३ येशूला लोकांबद्दल वाटणारे प्रेम, त्यांच्याबद्दल त्याला वाटणाऱ्या सहानुभुतीतूनही दिसून आले. “लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) त्यांची दयनीय अवस्था पाहून त्याला त्यांची कीव आली आणि त्यामुळे त्यांना मदत करण्यास तो प्रवृत्त झाला.
१४ दुसऱ्या एका प्रसंगी येशूने कशाप्रकारे सहानुभूती दाखवली याकडे लक्ष द्या. रक्तस्राव होत असलेल्या एका स्त्रीने गर्दीत येशूजवळ येऊन त्याच्या वस्त्राचे टोक शिवले तेव्हा ती चमत्कारिकरित्या बरी झाली. येशूला आपल्या शरीरातून शक्ती बाहेर पडल्याचे जाणवले, पण कोण बरे झाले हे त्याला दिसले नाही. तेव्हा त्याने त्या स्त्रीला पाहण्याचा आग्रह धरला. का? तिने नियमशास्त्रातील आज्ञेचे उल्लंघन केले किंवा शास्त्री व परूशी यांचा नियम तोडला म्हणून त्याला तिची कानउघाडणी करायची नव्हती; कदाचित त्या स्त्रीलाही अशी भीती वाटली असावी. पण येशूने तिला म्हटले: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” (मार्क ५:२५-३४) येशूच्या त्या शब्दांत किती कळवळा होता. त्याने केवळ “बरी हो” असे म्हटले नाही. तर त्याने म्हटले, “तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” मार्कने या ठिकाणी वापरलेला शब्द ‘फटके मारण्याच्या’ अर्थात यातना देण्याकरता चाबकाने मारण्याच्या प्रथेला सूचित करतो. त्याअर्थी, या स्त्रीच्या आजारामुळे तिला किती त्रास झाला असेल, किती शारीरिक व मानसिक यातना सोसाव्या लागल्या असतील याची येशूला जाणीव होती. तिचे दुःख तो समजू शकला.
१५, १६. येशूच्या सेवाकार्यातील कोणत्या घटनांवरून लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याची त्याची वृत्ती दिसून येते?
१५ येशूने आणखी एका मार्गाने लोकांबद्दल प्रीती व्यक्त केली आणि तो म्हणजे त्यांच्यातल्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याद्वारे. नथनेलाशी (जो नंतर एक प्रेषित झाला) त्याची भेट झाली तेव्हाचा प्रसंग आठवा. “नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, ‘पाहा हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्याठायी कपट नाही!’” येशूने चमत्कारिकपणे नथनेलाच्या अंतःकरणात डोकावून पाहिले होते आणि त्याकरवी त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेतले होते. अर्थातच नथनेल परिपूर्ण नव्हता. आपल्या सर्वांप्रमाणे त्याच्यातही काही उणिवा होत्या. किंबहुना, येशूविषयी ऐकल्यावर त्याने लगेच टोमणा मारला, “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” (योहान १:४५-५१) अर्थातच नथनेलाविषयीही नकारात्मक असे बरेच काही बोलता आले असते पण येशूने त्याच्या प्रशंसास्पद गुणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले; त्याने त्याच्या निष्कपट वृत्तीबद्दल त्याची प्रशंसा केली.
१६ त्याचप्रकारे, कदाचित विदेशी किंवा रोमी असणाऱ्या एका सेनाधिपतीने येशूजवळ येऊन त्याच्या एका आजारी पडलेल्या दासाला बरे करण्याची विनंती केली तेव्हा या सैनिकाच्या अपरिपूर्णतांची देखील येशूला जाणीव होती. त्या काळातील एका सेनाधिपतीने गत जीवनात हिंसाचाराची, रक्तपाताची आणि खोट्या उपासनेची असंख्य कृत्ये केली असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तरीसुद्धा, येशूने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या चांगल्या बाजूकडे, त्याच्या उल्लेखनीय विश्वासाकडे लक्ष दिले. (मत्तय ८:५-१३) नंतर वधस्तंभावर खिळले असताना त्याच्या शेजारी असलेल्या अपराध्याशी बोलताना येशूने त्याच्या गतकाळातील अपराधी कृत्यांविषयी त्याचे ताडन केले नाही तर भविष्याकरता एक आशा देऊन त्याला दिलासा दिला. (लूक २३:४३) इतरांविषयी नकारात्मक, टीकात्मक दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपण केवळ त्यांना निरुत्साहित करू शकतो हे येशूला चांगल्याप्रकारे माहीत होते. पण नेहमी इतरांत चांगले गुण शोधण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे नक्कीच बऱ्याच जणांना स्वतःत सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली असावी.
लोकांची सेवा करण्याची तयारी
१७, १८. पृथ्वीवर येण्याची नेमणूक स्वीकारताना येशूने इतरांची सेवा करण्याची तयारी कशाप्रकारे दाखवली?
१७ येशू ज्यांना शिकवत होता, त्या लोकांबद्दल त्याला वाटणाऱ्या प्रेमाचा आणखी एक स्पष्ट पुरावा म्हणजे त्यांची सेवा करण्याची त्याची तयारी. मानवपूर्व अस्तित्वादरम्यान देवाच्या पुत्राला नेहमीच मनुष्यजातीविषयी प्रीती वाटत होती. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) यहोवाचा “शब्द” किंवा प्रवक्ता या नात्याने त्याने बऱ्याचदा मानवांशी व्यवहार केला असावा. (योहान १:१) पण इतर कारणांसोबतच, मानवजातीला अधिक प्रत्यक्षपणे शिकवण्याकरता स्वर्गातील आपले गौरवी स्थान त्यागून “त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पैकर २:७; २ करिंथकर ८:९) पृथ्वीवर असताना, इतरांनी आपल्या पुढेपुढे करावे, आपली सेवा करावी अशी येशूने अपेक्षा केली नाही. उलट त्याने म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) येशू नेहमी या शब्दांनुसारच जगला.
१८ लोकांना शिकवताना येशूने नम्रपणे त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, स्वेच्छेने त्यांच्याकरता तो खपला. त्याने वाग्दत्त देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पायीच प्रवास केला; जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचण्याकरता त्याने शेकडो किलोमीटर चालून प्रचार यात्रा केल्या. गर्विष्ठ परूशी व शास्त्री यांच्यासारखा तो नव्हता; तो नम्र होता आणि कोणीही निःसंकोचपणे त्याच्याजवळ येऊ शकत होता. सर्व प्रकारचे लोक—वरिष्ठ पदाधिकारी, सैनिक, वकील, स्त्रिया, मुले, गोरगरीब, रोगी इतकेच काय तर समाजातील बहिष्कृत देखील त्याच्याजवळ उत्कंठेने, बेधडकपणे येत असत. परिपूर्ण असूनही, मानवसुलभ भावना येशूलाही होत्या; त्यालाही थकवा येत असे, भूक लागत असे. पण कितीही थकलेला असला, विश्रांती घेण्याकरता किंवा प्रार्थना करण्याकरता एकांतात राहू इच्छित असला तरीसुद्धा तो नेहमी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य देत असे.—मार्क १:३५-३९.
१९. शिष्यांशी नम्रतेने, सहनशीलतेने आणि प्रेमाने व्यवहार करण्यासंबंधी येशूने कशाप्रकारे कित्ता घालून दिला?
१९ स्वतःच्या शिष्यांची सेवा करण्याचीही येशूने तितकीच तयारी दाखवली. त्याने त्यांना प्रेमाने आणि सहनशीलतेने शिकवले. काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला त्यांना वेळ लागला पण येशूने कधीही आशा सोडली नाही, त्यांच्यावर तो रागावला नाही किंवा त्यांना तुच्छ लेखले नाही. तर त्यांना समजायला सोपे जावे म्हणून त्याने नवनवीन मार्गांनी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, आपल्यापैकी सर्वात मोठा कोण याविषयी शिष्य कित्येकदा भांडत. पण येशूने पुन्हा पुन्हा, अगदी त्याला मृत्यूदंड होण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांना एकमेकांशी नम्रपणे वागायला वेगवेगळ्या मार्गांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, या नम्रतेच्या बाबतीतही येशू म्हणू शकला: “मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहान १३:५-१५; मत्तय २०:२५; मार्क ९:३४-३७.
२०. शिकवण्याच्या कोणत्या पद्धतीने येशूला परूशांपेक्षा वेगळे असल्याचे दाखवले आणि त्याची ही पद्धत परिणामकारक का होती?
२० येशूने आपल्या शिष्यांना कसे वागावे हे केवळ सांगितले नाही, तर त्याने “कित्ता घालून दिला.” त्याने स्वतःच्या उदाहरणावरून त्यांना शिकवले. आपण फारच श्रेष्ठ आहोत, किंवा ज्या गोष्टी त्यांना करायला सांगितल्या त्या आपल्याला लागू होत नाहीत या अविर्भावात तो त्यांच्याशी कधीही बोलला नाही. ही परूश्यांची वागण्याची पद्धत होती. येशूने त्यांच्याविषयी म्हटले: “ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.” (मत्तय २३:३) येशूने नम्रपणे आपण शिकवलेल्या गोष्टींनुसार स्वतः वागून त्यांचा खरा अर्थ आपल्या विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केला. त्यामुळे त्याने आपल्या अनुयायांना साधे जीवन, भौतिकवादापासून मुक्त असे जीवन जगण्याचा बोध केला तेव्हा त्यांना याचा काय अर्थ असावा असा प्रश्न पडला नाही. “खोकडांस बिळे व आकाशातील पांखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही,” या शब्दांची सत्यता ते प्रत्यक्षात पाहू शकत होते. (मत्तय ८:२०) येशूने नम्रपणे आपल्या शिष्यांकरता कित्ता घालून देण्याद्वारे त्यांची सेवा केली.
२१. पुढील लेखात कशाविषयी विचार केला जाईल?
२१ येशू आजपर्यंत या पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ शिक्षक होता यात वाद नाही! त्याने शिकवलेल्या गोष्टींवर आणि ज्यांना त्याने शिकवले त्या लोकांवर त्याला असलेली प्रीती, त्याला पाहणाऱ्या आणि त्याचे ऐकणाऱ्या सर्व प्रामाणिक लोकांना दिसून आली. आज आपण त्याने घालून दिलेल्या कित्त्याचे परीक्षण करतो तेव्हा आपल्यालाही ती प्रीती दिसून येते. पण आपण ख्रिस्ताच्या परिपूर्ण आदर्शाचे कसे पालन करू शकतो? पुढील लेखात या प्रश्नावर विचार केला जाईल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• चांगल्याप्रकारे शिकवणे कशावर आधारित आहे आणि हे कोणाच्या उदाहरणावरून दिसून येते?
• येशूने ज्या सत्यांविषयी शिकवले ती त्याला प्रिय होती हे त्याने कोणकोणत्या मार्गांनी दाखवले?
• येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांच्याविषयी त्याने प्रेम कसे प्रदर्शित केले?
•येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांची सेवा करण्याची नम्र तयारी त्याने कशाप्रकारे दाखवली?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चित्र]
देवाच्या वचनातील तत्त्वे आपल्याला प्रिय आहेत हे येशूने कशाप्रकारे दाखवले?