व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगले शेजारी, एक वरदान

चांगले शेजारी, एक वरदान

चांगले शेजारी, एक वरदान

“दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा.”—नीतिसूत्रे २७:१०.

सामान्य युग पहिल्या शतकातील एका विद्वानाने येशूला विचारले: “माझा शेजारी कोण?” येशूने उत्तरात, खरा शेजारी कोण नव्हे तर कसा असतो हे समजावून सांगितले. येशूचा दृष्टान्त तुम्हाला बऱ्‍यापैकी माहीत असेलच. चांगला शोमरोनी या नावाने ओळखला जाणारा तो दृष्टान्त आहे आणि लूकच्या शुभवर्तमानात तो आपल्याला वाचायला मिळतो. येशूने सांगितलेली गोष्ट अशी:

“एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात असतांना लुटारुंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीहि त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्‍या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्‍याची काळजी घ्या; आणि ह्‍यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”—लूक १०:२९-३६.

विद्वानाला मुद्दा लगेच समजला. त्या जखमी व्यक्‍तीचा खरा शेजारी कोण याचे अचूक उत्तर त्याने लगेच दिले की, “त्याच्यावर दया करणारा तो.” मग येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूहि असेच कर.” (लूक १०:३७) खरा शेजारी असण्याचा काय अर्थ होतो हे या दाखल्यातून किती प्रभावीपणे स्पष्ट झाले! येशूचा दृष्टान्त आपल्याला हा प्रश्‍न विचारण्यासही प्रवृत्त करील: ‘मी कितपत चांगला शेजारी आहे? माझ्या जातीनुसार आणि राष्ट्रीय पार्श्‍वभूमीनुसार मी आपले शेजारी ठरवतो का? या कारणांमुळे संकटात असलेल्या सहमानवाला मी मर्यादित मदत करतो का? चांगला शेजारी होण्यासाठी मी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न करायला तयार असतो का?’

कोठून सुरवात करावी?

या बाबतीत आपल्याला सुधारण्याची गरज आहे असे वाटत असल्यास, आपण आपल्या मनोवृत्तीपासून सुरवात करावी. एक चांगला शेजारी बनण्यावर आपण लक्ष केंद्रित करावे. अशाने आपल्यालाही चांगले शेजारी लाभतील. जवळजवळ दोन हजार वर्षांआधी, येशूने आपल्या सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात मानवी नातेसंबंधांबद्दलच्या महत्त्वपूर्ण तत्त्वावर जोर दिला. त्याने म्हटले: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) इतरांना आदर, सन्मान आणि नम्रतेने वागवल्यास, तुम्हालाही तशीच वागणूक देण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते.

द नेशन सिन्स १८६५ या पत्रिकेतील “शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम” या लेखात पत्रकार आणि लेखिका लिझा फुन्डरबर्ग यांनी शेजाऱ्‍यांमध्ये ज्यामुळे प्रेम वाढू शकेल अशा काही साध्या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यांनी लिहिले: “शेजाऱ्‍यांनी एकमेकांकरता पेपर देणे, मुलांवर लक्ष ठेवणे, दुकानातून काही वस्तू आणणे यांसारखे लहानमोठे उपकार करून व्यक्‍तिगत संपर्क निर्माण केला पाहिजे. एकमेकांपासून दुरावलेल्या जगात, भीती आणि गुन्हेगारीने कमकुवत झालेल्या समाजांमध्ये ही जवळीक असली पाहिजे.” त्या पुढे म्हणतात: “कोठेतरी सुरवात केली पाहिजे. तुमच्या शेजाऱ्‍यापासून का होईना.”

कनेडियन जिओग्रॅफिक या पत्रिकेत एक मदतदायी मुद्दा सांगितला होता ज्यामुळे एकमेकांबद्दल हितकर मनोवृत्ती निर्माण करायला शेजाऱ्‍यांना मदत मिळेल. लेखिका मार्नी जॅकसन यांचे असे निरीक्षण आहे: “कुटुंबातल्या लोकांप्रमाणेच शेजारी असतात; आपल्याला कोण हवेत आणि कोण नकोत अशी निवड प्रत्येक वेळी करता येत नाही. ही नाती जोपासण्यासाठी कुशलता, काही प्रमाणात विनयशीलता आणि सहनशीलता यांची गरज असते.”

चांगले शेजारी—परोपकारी

हे खरे की, आपल्यापैकी बहुतेकांना शेजाऱ्‍यांशी कसे वागायचे हे कळत नसेल. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क टाळणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे हे जास्त सोपे जात असेल. परंतु, बायबल म्हणते की, “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) त्यामुळे, चांगला शेजारी आपल्या भोवतालच्या लोकांशी परिचय करून घेण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांच्याशी अगदीच जवळीक साधणार नाही पण निदान दोन-चार शब्द बोलण्याची किंवा साधेसे स्मित अथवा मैत्रीपूर्ण हावभाव करण्याची तसदी घेईल.

आधी सांगितल्याप्रमाणे, शेजारी एकमेकांकरता करत असलेल्या ‘असंख्य लहानमोठ्या उपकारांमुळेच’ आपापसांत चांगले संबंध निर्माण करून ते टिकवणे शक्य होते. त्यामुळे शेजाऱ्‍यांसाठी असेच लहानसहान परोपकार करण्याची संधी शोधल्याने सहकार्य करण्याची मनोवृत्ती आणि परस्परांबद्दल आदरभाव निर्माण होतो. शिवाय, असे केल्याने आपण बायबलमधील या सल्ल्याचे पालन करत असतो: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.”—नीतिसूत्रे ३:२७; याकोब २:१४-१७.

चांगले शेजारी—कृतज्ञ

प्रत्येकाने मिळणाऱ्‍या मदतीबद्दल किंवा बक्षीसाबद्दल कदर दाखवली तर किती चांगले झाले असते. पण हे नेहमीच घडत नाही. पुष्कळदा चांगल्या हेतूने केलेल्या मदतीबद्दल किंवा दिलेल्या बक्षीसांबद्दल अशी कृतघ्नता दाखवण्यात आली आहे की, देणाऱ्‍याला वाटते, ‘यापुढे मी कधीही मदत करणार नाही!’ काही वेळा, शेजाऱ्‍यांना कितीही मैत्रीपूर्ण रीतीने स्मित केले किंवा अभिवादन केले तरीही शेजाऱ्‍यांकडून तितक्याच उत्सुकतेने प्रतिसाद मिळणार नाही.

तरीही, जिला अभिवादन केले जाते ती व्यक्‍ती अनेक बाबतीत कृतघ्न नसते—ती वरवरून तशी दिसत असली तरीही. कदाचित पार्श्‍वभूमीमुळे ती लाजऱ्‍या स्वभावाची असेल आणि त्यामुळे तिचा प्रतिसाद तितकासा मैत्रिपूर्ण वाटत नसेल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, या कृतघ्न जगात असल्यामुळे काही लोकांना तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव विचित्र वाटेल किंवा तुमच्या हेतूंबद्दल ते शंकाही करतील. त्यांना आश्‍वासनाची गरज असेल. अशाप्रकारे, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास वेळ लागू शकतो आणि त्यामुळे आपल्याला धीर धरावा लागेल. तथापि, चांगले दाते आणि कृतज्ञ ग्राहक असण्याची कला शिकणारे शेजारी आपल्या परिसरात शांतीपूर्ण व आनंदी वातावरण ठेवण्यास हातभार लावतील.

संकटकाळी

संकटकाळी चांगला शेजारी विशेषकरून मोलाचा ठरतो. संकटात खरा शेजारधर्म दिसून येतो. अशा वेळी शेजाऱ्‍यांनी केलेल्या निःस्वार्थ कृत्यांचे अनेक अहवाल आहेत. जेव्हा सर्वांवर एखादी विपत्ती येते तेव्हा शेजारी आपणहूनच सहयोग देऊ लागतात आणि एकमेकांना मदत करायला पुढे येतात. सहसा ज्यांचे पटत नाही ते देखील अशा वेळी एकत्र येतात.

उदाहरणार्थ, द न्यूयॉर्क टाईम्स यात दिलेल्या वृत्तानुसार, १९९९ साली टर्की येथे एका भयंकर भूकंपाचा धक्का बसला तेव्हा पिढ्यान्‌पिढ्यांपासून असलेले हाडवैरी एकमेकांच्या मदतीला धावून आले. ग्रीक स्तंभलेखिका ॲना स्टारयेऊ हिने अथेन्सच्या एका वृत्तपत्रात लिहिले की, “आम्हाला तुर्क लोकांचा द्वेष बाळगायला शिकवले गेले आहे. पण त्यांना भयंकर दुःखात पाहून आम्हाला काही आनंद होत नाही. लहान लहान बाळे मेलेली पाहून आमचे हृदय पिळवटून निघाले, आम्ही रडलो; वर्षानुवर्षांपासून आमच्यातले वैर जणू नाहीसे झाले.” सरकारने मदतकार्य थांबवले पण ग्रीक मदत गटांनी जिवंत राहिलेल्यांचा शोध थांबवला नाही.

एखाद्या आपत्ती नंतर मदतकार्यात भाग घेणे निश्‍चितच उदात्त आणि वीरपणाचा शेजारधर्म आहे. परंतु, आपत्ती आधी इशारा देऊन एखाद्या शेजाऱ्‍याचा जीव वाचवणे हा अधिक मोलाचा शेजारधर्म मानला जाईल. दुःखाची गोष्ट म्हणजे, इतिहास दाखवतो की, येणाऱ्‍या आपत्तीची सूचना देणाऱ्‍यांना चांगला प्रतिसाद मिळत नाही कारण इशारा दिला जातो त्या वेळी आपत्ती स्पष्टपणे दिसत नसते. त्यामुळे इशारा देणाऱ्‍यांवर सहसा विश्‍वास केला जात नाही. आपल्यावर बेतणार असलेल्या धोकादायक परिस्थितीविषयी अजाण असलेल्यांना जे मदत करायचा प्रयत्न करतात त्यांना धीर धरण्यास व आत्म-त्यागी मनोवृत्ती दाखवण्याची गरज असते.

सर्वात महान शेजारधर्म

आज, मानवजातीवर कोणत्याही नैसर्गिक विपत्तीपेक्षा जास्त संस्मरणीय ठरणारी घटना गुदरणार आहे. हे सर्वशक्‍तिमान देवाचे पूर्वभाकीत कार्य असेल ज्याकरवी तो पृथ्वीवरील गुन्हेगारी, दुष्टाई आणि त्यासोबतच्या समस्यांचा अंत करील. (प्रकटीकरण १६:१६; २१:३, ४) ही संस्मरणीय घटना एखादी यत्किंचित शक्यता नसून निश्‍चित घडणारी घटना आहे! जगाला हादरवून टाकणाऱ्‍या या घटनेतून वाचण्यासाठी आवश्‍यक असलेले ज्ञान होता होईल तितक्या लोकांना सांगण्यासाठी यहोवाचे साक्षीदार उत्सुक आहेत. त्यामुळे जगभरात सुप्रसिद्ध असलेले त्यांचे प्रचारकार्य ते अतिशय चिकाटीने करतात. (मत्तय २४:१४) हे काम ते स्वच्छेने करतात; देवाबद्दल आणि शेजाऱ्‍याबद्दल प्रेम असल्यामुळे.

त्यामुळे, साक्षीदार तुमच्या घरी येतात किंवा इतर ठिकाणी तुम्हाला भेटतात तेव्हा पूर्वग्रहामुळे किंवा त्यांच्याबद्दल राग असल्यामुळे त्यांना टाळू नका. ते चांगले शेजारी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून बायबल अभ्यास करण्याविषयी ते तुम्हाला सांगतील तेव्हा तो स्वीकारा. शेजारी आपसांत प्रेमाने राहतील त्या लवकरच येणाऱ्‍या काळाविषयी देवाचे वचन कशाप्रकारे हमी देते ते शिकून घ्या. त्या वेळी, आपल्यातील बहुतेकांना हवा असलेला प्रेमपूर्ण नातेसंबंध, कसल्याही जातीय, धार्मिक किंवा वर्ग भेदाने नष्ट होणार नाही.

[६, ७ पानांवरील चित्रे]

आपल्या शेजाऱ्‍यांप्रती सत्कृत्ये करणे प्रशंसास्पद आहे

[चित्राचे श्रेय]

पृथ्वी: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.