तजेला देणाऱ्या दहिंवरांसारखे तरुण
“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”
तजेला देणाऱ्या दहिंवरांसारखे तरुण
“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन,” असे येशू ख्रिस्ताने म्हटले तेव्हा त्याने लहान वयाच्या त्याच्या अनुयायांचा देखील विचार केला. (मत्तय ११:२८) लोक आपली मुलेबाळे येशूजवळ आणत होती तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण येशू म्हणाला: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” इतकेच नव्हे तर “त्याने [मुलांना] कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१४-१६) यात काही शंका नाही, की येशूने देखील मुलांना मौल्यवान लेखले.
बायबलमध्ये आपल्याला अनेक विश्वासू तरुण-तरुणींचा तसेच लहान मुलामुलींचा उल्लेख आढळतो ज्यांनी देवाची सेवा करण्यात उत्कृष्ट उदाहरण मांडले. स्तोत्राच्या पुस्तकात तजेला देणाऱ्या दहिंवरांसारख्या ‘तरुणांबद्दल’ भाकीत केले आहे. यहोवाच्या नावाची स्तुती करणाऱ्या “कुमार” व ‘कुमारींविषयी’ देखील ते आपल्याला सांगते.—स्तोत्र ११०:३; १४८:१२, १३.
तरुणांची भरभराट होईल असे ठिकाण
दहिंवरांबरोबर तरुणांची केलेली तुलना ही अतिशय उचित आहे, कारण दहिंवराचा संबंध वैपुल्य आणि आशीर्वाद यांच्याशी लावला जातो. (उत्पत्ति २७:२८) दहिंवर कोमल, तजेला देणारे असतात. ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या या काळात, बहुसंख्य तरुण ख्रिस्ती स्वेच्छेने व उत्सुकतेने देवाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. तजेला देणाऱ्या दहिंवरासारखे पुष्कळ युवक व युवती आनंदाने देवाची सेवा करत आहेत आणि आपल्या सहउपासकांना मदत करत आहेत.—स्तोत्र ७१:१७.
ख्रिस्ती युवक केवळ इतरांसाठी तजेला ठरत नाहीत तर देवाची सेवा करताना त्यांना स्वतःला देखील तजेला मिळतो. देवाच्या संस्थेतील वातावरण त्यांच्या भरभराटीस पोषक आहे. उच्च नैतिक दर्जा राखून हे युवक व युवती देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध राखतात. (स्तोत्र ११९:९) मंडळीतही ते हितकारक कार्यांत भाग घेतात आणि मंडळीत त्यांना चांगले मित्र मिळतात—ही सर्व कारणे समाधानकारक व अर्थपूर्ण जीवनात भर टाकतात.
‘आरोग्य व सत्व’
ख्रिस्ती तरुणांना स्वतःला “दहिंवरासारखे” वाटते का? तान्या ही मंडळीच्या कार्यात सक्रिय व दर महिन्याला सेवेमध्ये आनंदाने ७० पेक्षा अधिक तास खर्च करणारी एक तरुणी आहे. तिला काय वाटते? ती म्हणते: “मला ताजेतवाने व उभारी मिळाल्यासारखी वाटते. माझ्या जीवनात यहोवा आणि त्याची संघटना असल्यामुळे मला जणू काय ‘आरोग्य व सत्व’ मिळाले आहे.”—नीतिसूत्रे ३:८.
एरियल नावाची आणखी एक पूर्ण वेळेची तरुण सेविका मंडळीतून मिळणाऱ्या आध्यात्मिक पोषणाबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. ती याकोब २:२३.
म्हणते: “मी ख्रिस्ती सभांना, अधिवेशनांना, संमेलनांना जाते तेव्हा यहोवाने वाढून ठेवलेले आध्यात्मिक अन्न मी खाऊ शकते व यामुळे खरोखरच मला आध्यात्मिक अर्थाने ताजेतवाने वाटते. शिवाय, संपूर्ण जगभरात माझे सहकर्मी आहेत हे समजल्यामुळे मला उभारी मिळते.” तजेला देणाऱ्या एकमात्र उगमाचे वर्णन करताना ती म्हणते: “या जगाचा लोकांवर किती भयंकर परिणाम होत आहे हे मी पाहते व ऐकते तेव्हा, यहोवा माझा मित्र आहे ही गोष्टच किती तजेलादायक वाटते.”—वीस वर्षांचा अभिशाय पूर्ण वेळेचा सुवार्तिक व मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करतो. तो आपला अनुभव पुढील शब्दांत सांगतो: “आज तरुणांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण या समस्यांना तोंड कसे द्यायचे हे मला माहीत असल्यामुळे मला ताजेतवाने वाटते. बायबलमधल्या सत्यानं मला, यहोवाची सेवा पूर्ण मनाने करण्यासाठी मी काय केले पाहिजे यावर माझे लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत केली आहे.”
किशोर असताना, ॲन्ट्वान रागीट स्वभावाचा होता. एकदा त्याने आपल्यासोबतच्या एका विद्यार्थ्याला खुर्ची फेकून मारली होती आणि भोसकायला पेन्सिलीचा वापर केला. तो कोणालाही आवडत नव्हता! पण बायबलमधील प्रशिक्षणामुळे त्याचा संपूर्ण स्वभावच बदलला. आता तो १९ वर्षांचा आहे आणि मंडळीमध्ये सेवा सेवक व पूर्ण वेळेचा सेवक म्हणून कार्य करतो; तो म्हणतो: “यहोवानं मला त्याचं ज्ञान घेऊ दिल्याबद्दल व आत्म-संयम बाळगण्यास तसेच माझा स्वभाव बदलण्याची का गरज आहे हे पाहण्यास माझे डोळे उघडल्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानतो. यामुळे मी पुष्कळ समस्या टाळू शकलो.”
तरुण ख्रिश्चनांची तजेला देणारी मनोवृत्ती ही इतरांपासून लपून राहत नाही. मॅटिओ हा इटलीतील एक तरुण साक्षीदार आहे. त्याच्या शिक्षिकेने सांगितले, की वर्गात कोणीही शिवी दिली तर त्याला दंड भरावा लागेल. काही काळानंतर, मुलांनी हा नियम काढून टाकण्यासाठी विनंती केली; कारण, “शिवी न देता बोलणे अशक्य आहे,” असे त्यांचे म्हणणे होते. मॅटिओ म्हणतो: “पण, शिक्षिकेने म्हटले, की हे मुळीच अशक्य नाही. तिने वर्गाला माझं उदाहरण दिलं. मी यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे माझी भाषा कशी शुद्ध आहे म्हणून तिनं वर्गासमोर माझी प्रशंसा केली.”
थायलंडमधील एका बेशिस्त वर्गात, एका शिक्षिकेने ११ वर्षांच्या रात्याला वर्गासमोर येऊन उभे राहायला सांगितले आणि त्याच्या वर्तनाची प्रशंसा करीत म्हटले: “तुम्ही सर्व याच्यासारखे का होत नाही? तो अभ्यासही किती मन लावून करतो आणि त्याचे वर्तनही किती चांगले आहे.” नंतर त्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या: “तुमचं वागणं सुधारण्यासाठी तुम्हाला रात्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार व्हावं लागेल, असं मला वाटतं.”
यहोवाला ओळखण्याचा व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो ख्रिस्ती युवकांना पाहून मन किती आनंदाने भरून येते. ही तरुणपिढी, वृद्धांमध्ये सहसा दिसणारी बुद्धी दाखवत आहे. सध्याचे जीवन यशस्वी बनवण्यासाठी देव त्यांना मदत करू शकतो आणि येणाऱ्या नवीन जगात वैभवी भवितव्य देऊ शकतो. (१ तीमथ्य ४:८) सध्याच्या आध्यात्मिकरीत्या नापीक भूमीतील सुकून व कोमेजून गेलेल्या असंख्य तरुणांसमोर हे ख्रिस्ती युवक किती टवटवीत दिसतात बरे!