“तारण यहोवाच्या हातून होते”
“तारण यहोवाच्या हातून होते”
राष्ट्रीय संकटाच्या व आंतरराष्ट्रीय तणावाच्या परिस्थितीत, लोक आपल्या सरकारकडून सुरक्षेची अपेक्षा करतात. लोकांमध्ये एकी राहावी म्हणून सरकार जोरदारपणे विविध उपाययोजना करू लागतात. या उपाययोजनांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला जितका बढावा दिला जातो तितक्याच उत्साहाने व वारंवार राष्ट्रीय कार्यक्रम केले जातात.
अशा राष्ट्रीय तातडीच्या वेळेस, राष्ट्रीयतेच्या उत्साहामुळे लोकांमध्ये एकीची व बळाची भावना जागृत होते आणि यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांना सहकार्य देण्याची, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव वाढू शकते. पण, “राष्ट्राभिमान हा कोणत्याही भावनेसारखाच स्फोटक आहे; तो व्यक्त केला जात असताना विकृत रूपही धारण करू शकतो,” असे द न्यू यॉर्क टाईम्स मॅग्झीनमध्ये म्हटले होते. राष्ट्राभिमानाची अशी वक्तव्ये, नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि एखाद्या राष्ट्रातील विशिष्ट नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू शकतात. खऱ्या ख्रिश्चनांवर खासकरून आपल्या विश्वासांशी हातमिळवणी करण्याचा दबाव येतो. असे वातावरण असलेल्या जगात राहत असताना ख्रिश्चन आपले आचरण कसे ठेवतात? कोणती शास्त्रवचनीय तत्त्वे त्यांना सूक्ष्मबुद्धीने व देवाबरोबर सचोटी राखून कार्य करण्यास मदत करतात?
“त्यांच्या पाया पडू नको”
कधीकधी, एखाद्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन करणे हे राष्ट्राभिमानाचे एक वक्तव्य बनते. पण ध्वजांवर सहसा आकाशातील गोष्टींची चित्रे जसे की तारे किंवा पृथ्वीवरील गोष्टींची चित्रे असतात. अशा चित्रांना नमन करण्याविषयी आपला काय दृष्टिकोन आहे हे देवाने आपल्या लोकांना आज्ञा देताना अशा प्रकारे व्यक्त केले: “आपल्यासाठी कोरीव मूर्ति करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.”—निर्गम २०:४, ५.
राज्याचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करणे किंवा त्याच्यासमोर गुडघे टेकणे हे यहोवा देवाला अनन्य भक्ती देण्याच्या आज्ञेच्या खरोखरच विरुद्ध आहे का? प्राचीन इस्राएली लोकांकडे, ‘निशाणी’ किंवा ध्वज होते ज्याच्याभोवती तीन गोत्र विभागांनी रानात असताना वस्ती केली. (गणना २:१, २) अशा ध्वजांना निर्देश करणाऱ्या इब्री शब्दांवर विवेचन मांडताना मॅक्लिंटॉक ॲण्ड स्ट्राँग्स सायक्लोपिडिआ म्हणतो: “‘ध्वज’ म्हटल्यावर ज्याचे चित्र आपल्या मनात येते म्हणजे झेंडा, असा अर्थ, या इब्री शब्दांपैकी एकाही शब्दाचा होत नाही.” शिवाय, इस्राएलचे ध्वज पवित्र समजले जात नसत किंवा त्या संबंधाने कोणतेही विधी केले जात नसत. निशाणींचा ज्या उद्देशासाठी वापर केला जातो त्याच कामासाठी अर्थात लोकांना एकत्र बोलावण्यासाठी ते फडकवले जात असत.
निवासमंडपातील आणि शलमोनाच्या मंदिरातील करूब देखील, खासकरून स्वर्गीय करूबांना चित्रित करत होते. (निर्गम २५:१८; २६:१, ३१, ३३; १ राजे ६:२३, २८, २९; इब्री लोकांस ९:२३, २४) या करूबांच्या प्रतिकांची उपासना केली जात नव्हती या वस्तुस्थितीचा पुरावा यावरून मिळतो, की सर्वसामान्य लोक त्यांना पाहू शकत नव्हते आणि स्वर्गदूतांची उपासना केली जात नव्हती.—कलस्सैकर २:१८; प्रकटीकरण १९:१०; २२:८, ९.
इस्राएली लोक रानांत असताना संदेष्टा मोशेने तांब्याचा साप बनवला होता, याची देखील आठवण करा. तो गणना २१:४-९; योहान ३:१४, १५) त्याची पूजा करून उपासना करायची नव्हती. परंतु, मोशेच्या दिवसांनंतरच्या अनेक शतकांनंतर, इस्राएली लोक त्याची उपासना करू लागले, त्याच्यासमोर धूप जाळू लागले. म्हणूनच यहुदी राजा हिज्किया याला तो तांब्याचा साप फोडून त्याचे तुकडे तुकडे करावे लागले.—२ राजे १८:१-४.
बनवलेला साप फक्त एक चिन्ह होता आणि त्याचा भविष्यसूचक अर्थ होता. (राष्ट्रीय झेंडे फक्त काही उपयुक्त कार्ये साध्य करण्याकरता आहेत का? ते कशाला चित्रित करतात? “ध्वज हा राष्ट्राभिमानाच्या विश्वासाचे प्रमुख चिन्ह आणि उपासनेची केंद्रीय वस्तू आहे,” असे लेखक जे. पॉल विल्यम्स यांनी म्हटले. द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना म्हणतो: “क्रूसाप्रमाणेच ध्वज देखील पवित्र आहे.” ध्वज हा राज्याचे प्रतीक आहे. त्यामुळे, ध्वजासमोर दंडवत घालणे किंवा त्याला वंदन करणे हा एक धार्मिक विधी आहे ज्याद्वारे राज्याला आदर दिला जातो. अशा कृत्यामुळे असे दर्शवले जाते, की राज्याकडून तारण मिळेल व ही गोष्ट मूर्तीपूजेविषयी बायबल जे म्हणते त्याच्याशी मुळीच जुळत नाही.
शास्त्रवचनांत स्पष्टपणे म्हटले आहे, की “तारण परमेश्वराच्या [“यहोवाच्या,” NW] हातून होते.” (स्तोत्र ३:८) तारण कोणत्याही मानवी संघटनांकडून किंवा त्यांच्या निशाणींकडून मिळणार नाही. प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “माझ्या प्रिय बंधूनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.” (१ करिंथकर १०:१४) आरंभीच्या ख्रिश्चनांनी राज्याच्या कोणत्याही उपासना कार्यांत भाग घेतला नाही. मरणाच्या उंबरठ्यावर (इंग्रजी), या पुस्तकात डॅनियल पी. मॅनीक्स म्हणतात: “ख्रिश्चनांनी . . . [रोमन] सम्राटाच्या संरक्षक आत्म्याला बलिदान अर्पण करण्यास नकार दिला—हे जवळजवळ आज ध्वजाला वंदन करण्यास नकार देण्यासारखेच होते.” तेव्हा आजच्या ख्रिश्चनांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. यहोवाला अनन्य भक्ती देण्याकरता ते कोणत्याही राष्ट्राच्या ध्वजाला वंदन करत नाही. अशी भूमिका घेण्याद्वारे ते देवाला आपल्या जीवनात प्राधान्य देतात आणि त्याचबरोबर सरकारे आणि त्यांचे शासक यांना आदर देतात. होय, सरकारी “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या” अधीन राहण्याची आपली जबाबदारी हे ते ओळखतात. (रोमकर १३:१-७) पण मग, देशभक्तीची गीते जशी की राष्ट्रगीते गाण्याच्याबाबतीत शास्त्रवचनांचा काय दृष्टिकोन आहे?
राष्ट्रगीत म्हणजे काय?
“राष्ट्रगीतांद्वारे राष्ट्राभिमानाच्या भावना व्यक्त केल्या जातात आणि त्यात बहुतेकदा त्या राष्ट्राच्या लोकांना व त्यांच्या शासकांना मार्गदर्शन व संरक्षण मिळावे म्हणून देवाकडे विनंती केली जाते,” असे द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना म्हणतो. राष्ट्रगीत म्हणजे, एक स्तोत्र किंवा प्रार्थना असते जी राष्ट्रासाठी केली जाते. त्यात न चुकता अशी विनवणी केलेली असते, की राष्ट्राला भौतिक समृद्धी व आयुष्य लाभो. अशा प्रार्थनांमध्ये खऱ्या ख्रिश्चनांनी भाग घ्यावा का?
संदेष्टा यिर्मया अशा लोकांमध्ये राहत होता जे देवाची सेवा करण्याचा दावा करत होते. तरीसुद्धा यहोवाने त्याला आज्ञा दिली: “तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको, आरोळी व विनंती करू नको, मजजवळ मध्यस्थी करू नको; कारण मी ऐकावयाचा नाही.” (यिर्मया ७:१६; ११:१४; १४:११) यिर्मयाला अशी आज्ञा का देण्यात आली होती? कारण त्यांच्या समाजातील लोक, चोरी, खून, व्यभिचार, खोटी शपथ आणि मूर्तीपूजा या कार्यांत पूर्णपणे बुडालेले होते.—यिर्मया ७:९.
“मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी,” असे म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्यापुढे एक उदाहरण मांडले. (योहान १७:९) शास्त्रवचने म्हणतात, की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” व ते ‘नाहीसे होत आहे.’ (१ योहान २:१७; ५:१९) असे असताना, खरे ख्रिस्ती या युगाच्या समृद्धीसाठी व आयुष्यासाठी जाणीवपूर्वक प्रार्थना कशी काय करू शकतील?
अर्थात, सर्वच राष्ट्रगीतांमध्ये देवाला विनंती केलेली नसते. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो: “राष्ट्रगीतांच्या भावना या वेगवेगळ्या असू शकतात; सम्राटांसाठी प्रार्थनांपासून ते राष्ट्रीय दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण असलेली युद्धे किंवा बंड किंवा . . . राष्ट्राभिमानाच्या भावनांपर्यंतचे कोणतेही विषय या राष्ट्रगीतांमध्ये असू शकतात.” पण देवाला संतुष्ट करू पाहणारे कोणत्याही राष्ट्राच्या युद्धांबद्दल व क्रांत्यांबद्दल आनंद व्यक्त करतील का? खऱ्या उपासकांविषयी यशयाने भाकीत केले: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या यशया २:४) प्रेषित पौलाने लिहिले: “आम्ही देहात चालणारे असूनहि आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत.”—२ करिंथकर १०:३, ४.
कोयत्या करितील.” (राष्ट्रगीतांमध्ये सहसा, राष्ट्राबद्दल अभिमानाच्या किंवा श्रेष्ठत्वाच्या भावना व्यक्त केल्या जातात. पण याला शास्त्रवचनांमध्ये आधार नाही. अरीयपगात भाषण देताना प्रेषित पौलाने म्हटले: “[यहोवा देवाने] एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६) प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
बायबलची समज मिळाल्यामुळे पुष्कळ लोक झेंडा वंदनाच्या समारंभात व राष्ट्रगीते गाण्यात भाग न घेण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतात. असे वादविषय त्यांच्यासमोर येतात तेव्हा ते कसे वागतात?
सहभाग घेण्यास आदरपूर्वक नकार
आपल्या साम्राज्याची एकी आणखी मजबूत करण्यासाठी प्राचीन बॅबिलोनच्या राजा नबुखद्नेस्सरने दूरा नामक मैदानात एक प्रचंड सोन्याची मूर्ती उभी केली. या मूर्तीच्या उद्घाटन समारंभाची त्याने व्यवस्था केली तेव्हा त्याने त्याचे क्षत्रप, व्यवस्थापक अधिकारी, शासक, सल्लागार आणि इतर उच्च अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. संगीताचा आवाज येताच जमलेल्या सर्वांना मूर्तीपुढे दंडवत करून तिची उपासना करायची होती. जमलेल्या लोकांमध्ये, शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे तीन इब्री तरुण होते. ते या धार्मिक विधीत सहभागी नव्हते हे त्यांनी कसे दाखवले? संगीताची सुरवात होताच जमलेल्या सर्वांनी मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातला पण हे तिघे इब्री तरुण तसेच उभे राहिले.—दानीएल ३:१-१२.
आज, सहसा हात सरळ करून, माथ्याजवळ नेऊन किंवा छातीवर ठेवून ध्वजवंदन केले जाते. कधीकधी, शरीराची एक विशिष्ट स्थिती धारण करावी लागते. काही देशांत, शाळेत मुलांकडून ध्वजापुढे गुडघे टेकून त्याचे चुंबन घेण्याची अपेक्षा केली जाते. दुसरे लोक ध्वजाला वंदन करत असताना खरे ख्रिस्ती शांत उभे राहून दाखवून देतात, की ते आदरपूर्वक निरीक्षण करणारे आहेत.
पण समजा, झेंडा वंदनाचा कार्यक्रम अशा पद्धतीने आहे, की त्यात फक्त शांत उभे राहिल्यानेसुद्धा भाग घेत असल्याचे सूचित होत असल्यास काय करावे? उदाहरणार्थ,
समजा, एखाद्या शाळेतील एका विद्यार्थ्याला संपूर्ण शाळेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते आणि तो शाळेच्या अंगणातील ध्वजाला वंदन करतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच सावधान स्थितीत उभे राहावे लागते. अशा वेळी, फक्त उभे राहिल्यानेसुद्धा आपण, आपल्या वतीने ध्वजाला वंदन करणाऱ्या बाहेरच्या विद्यार्थ्याशी सहमत आहोत हे दर्शवत असतो. केवळ उभे राहणेसुद्धा कार्यक्रमात भाग घेणे सूचित करते. अशा वेळी, प्रत्यक्ष भाग न घेता आदरपूर्वक निरीक्षण करू इच्छिणारे शांतपणे बसून राहतील. पण समजा असा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वर्ग उभा असेल तर? त्यावेळी, आपण उभे राहिलो तर याचा अर्थ आपण कार्यक्रमात भाग घेत आहोत असे सूचित होणार नाही.समजा, एखाद्याला ध्वजवंदन करण्यास सांगितले जात नाही पण परेडच्या वेळी, वर्गात किंवा इतर ठिकाणी फक्त ध्वज धरून उभे राहायला सांगितले जाते जेणेकरून इतरांना त्याला वंदन करता येईल. अशावेळी, शास्त्रवचनांत आज्ञा दिल्याप्रमाणे तो ‘मूर्तिपूजेपासून दूर पळत’ नसतो तर थेट कार्यक्रमातच उपस्थित असतो. राष्ट्रीय कवाईतींच्या बाबतीतही हे खरे आहे. असे करणे म्हणजे, कवाईतीमध्ये ज्याला आदर दिला जातो त्याला आपण पाठिंबा देतो, असा अर्थ होत असल्यामुळे, खरे ख्रिस्ती जाणीवपूर्वक असे करण्याचे टाळतात.
राष्ट्रगीते लावली जातात तेव्हा, त्या गीतातील भावनांशी आपणही सहमत आहोत हे दाखवण्याकरता एका व्यक्तीला केवळ उभे राहायचे असते. अशा वेळी, खरे ख्रिस्ती बसून राहतात. पण ते आधीपासूनच उभे असताना राष्ट्रगीत चालू झाल्यास, त्यांनी बसण्याची गरज नाही. कारण ते राष्ट्रगीतासाठी म्हणून खास उभे राहिले नव्हते. दुसरीकडे, जर एखादा गट उभे राहून राष्ट्रगीत गात असेल, तर एखादी व्यक्ती केवळ आदर दाखवण्याकरता राष्ट्रगीत न गाता केवळ उभी राहिल्यास, ती त्या गीताच्या भावनांशी सहमत आहे असा अर्थ होणार नाही.
“आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा”
मानव-निर्मित पूज्य वस्तूंच्या व्यर्थतेचे वर्णन केल्यावर स्तोत्रकर्त्याने म्हटले: “त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव स्तोत्र ११५:४-८) तेव्हा, पूज्य वस्तू आणि राष्ट्रीय ध्वज बनवण्याशी थेटपणे संबंधित असलेली नोकरी यहोवाचे उपासक स्वीकारणार नाहीत हे स्पष्ट आहे. (१ योहान ५:२१) कामाच्या ठिकाणी असे इतर प्रसंगही येतील जेव्हा ख्रिश्चन अगदी आदरपूर्वक दाखवून देतील की ते यहोवा व्यतिरिक्त ध्वजाची किंवा त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कशाचीही उपासना करत नाहीत.
ठेविणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.” (उदाहरणार्थ, एक मालक आपल्या कर्मचाऱ्याला इमारतीवर ध्वज चढवण्यास किंवा उतरवण्यास सांगेल. ख्रिश्चनाने हे काम करावे की नाही हे, त्या परिस्थितीविषयी त्याचे व्यक्तिगत मत काय आहे यावर आधारित असेल. सर्व लोक सावधान स्थितीत उभे राहिलेले किंवा ध्वजाला वंदन करत असताना ध्वज वर चढवणे किंवा उतरवणे हा एखाद्या खास विधीचा भाग असेल तर मग असे करणे म्हणजे त्या विधीत भाग घेणे असे होईल.
पण, कोणताही कार्यक्रम नसताना ध्वज चढवणे किंवा उतरवण्याचे काम सांगितले जाते तेव्हा ते, त्या इमारतीचा वापर करण्याची तयारी करण्यासारखे असेल; जसे की दारे-खिडक्या बंद करणे व उघडणे यांसारखेच काम असेल. अशा परिस्थितीत, ध्वज हा केवळ राज्याचे प्रतीक असतो आणि दररोजच्या इतर कामांप्रमाणेच ध्वज चढवायचा किंवा उतरवायचा हे एखाद्या बायबल प्रक्षिशित विवेकाच्या आधारावर घेतलेल्या व्यक्तिगत निर्णयावर अवलंबून असेल. (गलतीकर ६:५) एखाद्या ख्रिश्चनाचा विवेक कदाचित आपल्या मालकाला असे सांगण्यास प्रवृत्त करेल की ध्वज चढवण्याचे किंवा उतरवण्याचे काम कोणा दुसऱ्या कामगाराला सांगावे. किंवा दुसऱ्या ख्रिश्चनाचा विवेक त्याला, कोणताही विधी नसल्यास, ध्वज चढवण्यास किंवा उतरवण्यास परवानगी देईल. खरे उपासक जो काही निर्णय घेतील त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवतील: देवासमोर त्यांनी ‘आपली विवेकबुद्धी शुद्ध राखावी.’—१ पेत्र ३:१६.
नगरपालिकेची कार्यालये, शाळा यांसारख्या सार्वजनिक इमारती जेथे ध्वज फडकवला जातो तेथे काम करण्यास किंवा उपस्थित असण्यास शास्त्रवचनांमध्ये कसलेही बंधन नाही. पोस्टाच्या तिकिटावर, वाहनाच्या परवाना पाटीवर किंवा सरकार-निर्मित कोणत्याही वस्तूवर ध्वजाचे चित्र असू शकते. अशा वस्तूंचा आपण वापर करतो याचा अर्थ आपण भक्तीच्या कार्यांत भाग घेतो असा होत नाही. ध्वजाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे अस्तित्व हे महत्त्वाचे नाही तर त्याच्याप्रती एखाद्याची कृती महत्त्वाची आहे.
खिडक्यांवर, दारांवर, मोटारगाड्यांवर, टेबलांवर किंवा इतर वस्तूंवर सहसा ध्वज असतात. ध्वजाचा छाप असलेले वस्त्र विकत घेतले जाऊ शकते. काही देशांत असे वस्त्र घालणे बेकायदेशीर आहे. आणि समजा असे केल्याने नियमाचा भंग होत नसला तरी त्यावरून, जगाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीची काय भूमिका आहे यासंबंधाने काय सूचित होईल? आपल्या अनुयायांविषयी येशू ख्रिस्ताने म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) अशा कार्यामुळे सहख्रिश्चनांवर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे काहींच्या विवेकाला ठेच पोहंचू शकते का? विश्वासात दृढ उभे राहण्याचा त्यांनी केलेला निश्चय कमकुवत होऊ शकतो का? पौलाने ख्रिश्चनांना सल्ला दिला: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; . . . तुम्ही . . . निर्मळ व कोणाला अडखळण होणार नाही असे असावे.”—फिलिप्पैकर १:१०, NW.
“सर्वांबरोबर सौम्य”
या ‘कठीण दिवसांत’ जगाची परिस्थिती जसजशी रसातळाला जात आहे तसतसे राष्ट्राभिमानाच्या भावना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (२ तीमथ्य ३:१) पण देवावर प्रेम करणाऱ्यांनी हे विसरू नये, की तारण केवळ यहोवाकडून मिळणार आहे. केवळ तोच अनन्य भक्ती प्राप्त करण्याचा हक्कदार आहे. यहोवाच्या इच्छेविरुद्ध कार्य करण्यास सांगण्यात आले तेव्हा येशूच्या प्रेषितांनी म्हटले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे. (२ तीमथ्य २:२४) यास्तव ख्रिस्ती जन, झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत गाण्याच्या संबंधाने व्यक्तिगत निर्णय घेताना आपल्या बायबल-प्रशिक्षित विवेकावर विसंबून शांतीमय, आदरणीय आणि सौम्य राहण्यास झटतात.
[२३ पानांवरील चित्र]
ठाम परंतु आदरणीय राहून तीन इब्री तरुणांनी देवाला संतुष्ट करण्याची निवड केली
[२४ पानांवरील चित्र]
एखाद्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी ख्रिश्चनांनी कसे वागले पाहिजे?