व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“संतांबद्दल” आधुनिक आकर्षण

“संतांबद्दल” आधुनिक आकर्षण

“संतांबद्दल” आधुनिक आकर्षण

“आपल्याला महात्मे नको होते तो काळ आठवतो का? पण, सप्टें. १३ रोजी मदर टेरेसाचा अंत्यविधी पाहणाऱ्‍या ४२ लाख अमेरिकन लोकांवर याचा काहीच फरक पडला नाही. सप्टें. ५ रोजी तिचा मृत्यू झाला तेव्हापासून तिला अधिकृतरित्या संत घोषित करण्यासाठी व्हॅटिकनला असंख्य विनंतीपत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे, तिला संत घोषित केले जाईल अशी पुष्कळांना शाश्‍वती वाटते.”

सन-सेन्टीनेल, अमेरिका, ऑक्टोबर ३, १९९७.

कॅथलिक मिशनरी मदर टेरेसा यांची लोकसेवा व समाजसेवा हाच खरा संतपणा आहे असे पुष्कळजण विचार करतात. इतर धर्मांतही संत मानले जातात. पण रोमन कॅथलिक चर्चमध्ये प्रथेनुसार अधिकृतरित्या घोषित केले जातात त्याप्रकारे कोणीही नाही.

पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तेदरम्यान ४५० पेक्षा अधिक व्यक्‍तींना संत म्हणून अधिकृतरित्या घोषित केले होते; संपूर्ण २० व्या शतकात इतर सर्व पोपांनी मिळून अधिकृतरित्या संत घोषित केलेल्यांपेक्षा ही संख्या जास्त आहे. * पण “संतांना,” आणि बहुतेक तर सर्वसाधारणपणे कॅथलिकांच्या परिचयाचेही नाहीत अशांना इतके पूज्य का मानले जाते?

नोटर डेम विद्यापीठातील तत्त्ववेत्ता, लॉरेन्स कनिंग्हॅम म्हणतात: “जगात पवित्रता असू शकते या कल्पनेची लोकांना उत्सुकता वाटते. संत असल्यामुळे आजही महापुरूष असू शकतात हे सिद्ध होते.” शिवाय, “संतांना” देवाजवळ पोहंचण्याची खास परवानगी असल्यामुळे जिवंत लोकांकरता ते परिणामकारक मध्यस्थ म्हणून काम करू शकतात. एखाद्या “संताच्या” वस्तू किंवा देहाचे अवशेष मिळाल्यास, ते चमत्कारिक आहेत या विश्‍वासाने त्यांची पूजा केली जाते.

सोळाव्या शतकात, कॅथलिक धर्मसिद्धान्त पुनर्स्थापित करण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेन्टच्या धर्मसभेच्या प्रश्‍नोत्तरावलीत असे घोषित करण्यात आले: “‘प्रभूमध्ये निजलेल्या’ संतांचा सन्मान करणे, त्यांच्या मध्यस्थीसाठी विनंती करणे, त्यांच्या पवित्र वस्तू आणि अस्थी पूज्य मानणे यांमुळे जसजशी एका ख्रिश्‍चनाची आशा जिवंत होऊन बळकट होते तसतसे देवाचे गौरव कमी होण्याऐवजी अधिकाधिक होत राहते, आणि तो [ख्रिस्ती] स्वतः [या संतांच्या] सद्‌गुणांचे आचरण करण्यास प्रवृत्त होतो.” (द कॅटेकिझम ऑफ द काउंन्सिल ऑफ ट्रेन्ट, १९०५) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना निश्‍चितच सद्‌गुणी जीवन जगायचे आहे, देवाकडे योग्य मार्गाने जायचे आहे आणि ईश्‍वरी मदत प्राप्त करायची आहे. (याकोब ४:७, ८) त्यामुळे, देवाच्या वचनानुसार, खरे संत कोण ठरतात? आणि त्यांची काय भूमिका आहे?

[तळटीप]

^ परि. 5 अधिकृतरित्या संत घोषित करणे म्हणजे, मृत रोमन कॅथलिक व्यक्‍तीला सार्वत्रिक आणि बंधनकारक पूजेसाठी पात्र ठरवणे.